मेडिकल उपचारासाठी तयार केलेला व्हायब्रेटर आता सेक्स टॉय झालाय.

हिस्टेरिया शब्द कधी ऐकलाय का ओ ? एकतर उत्तर नाही असेल नाहीतर मग हो असेल. पण त्याबद्दल अर्धवट माहिती असेल..कसाय न भिडू हाल्फ नॉलेज इज ऑलवेज डेंजरस..आणि मग लै शोधलं. तेव्हा हिस्टेरियाचा पण शोध लागला आणि आताच्या उपयोगी डिल्डोचा पण..अर्थात व्हायब्रेटर.

Guess what an orgasm is called in Hindi ladies …’चरम सुख’

१९ व्या शतकात या ऑर्गॅज्मच्या नादात बायका वेड्या होत होत्या.. त्यातून एक इनोव्हेशन जन्माला आलं आणि आजवरच ते सगळ्यात भारी आणि तगडं इनोव्हेशन होतं. जे एका पुरुषाने शोधलं होत. त्याचीच ही गोष्ट

पण पहिल्यांदा हिस्टेरिया या शब्दाचा अर्थ जाणून घ्यायला पाहिजे. 

गुगल केलं तर समजेल याचा अर्थ आहे ठार वेड होणं. पण साध्या सुध्या भाषेत याला म्हणतात फेफरं येणं. तर एकोणिसाव्या शतकात यरोप मध्ये या हिस्टेरिया नावाच्या रोगाचा शोध लागला. एकोणिसाव्या शतकात या हिस्टेरिया रोगाचा मोठा बोलबाला होता. हा रोग फक्त बायकांनाच व्हायचा. याची कारण पण बरीच होती.

सुरुवातीच्या टप्प्यात बायका वेड्या व्हायला लागल्या की, डॉक्टरांना समजायच नाही की हे होतंय कशामुळे. म्हणून काही नाही सापडलं म्हणून त्याला बायकांच्या गर्भाशयाशी जोडण्यात आलं. म्हणजे बायकांच्या युटेरस मध्येच काहीतरी गडबड झाली असेल म्हणून हा रोग झाला असेल असा शोध लावण्यात आला.

पण नंतर हिपोक्रेटस नावाच्या एका वैद्याने याची कारण शोधून काढली तेव्हा त्याला समजलं की हा एक सेक्सशी रिलेटेड आजार आहे. आणि त्याच्या अभ्यासामुळे लोकांनी त्याच्या नावावरूनच या रोगाचं नामकरण हिस्टेरिया असं केलं. हा एक मेंटल इलनेस होता.

या रोगामुळे काय व्हायचं ? 

या रोगाचा एकदा का दौरा पडला की बायका वेड्यासारख्या वागायच्या. त्यांना शुद्ध राहायची नाही. एकदम बेकाबु होऊन जायच्या. त्यांचं किंचाळणं इतकं असायचं की, त्या बेशुद्ध पडायच्या. कधी कधी तर त्यांना वेड्यांच्या इस्पितळात भरती करावं लागायचं. इतिहासात या रोगाचं वर्णन करताना ‘मॅड व्हुमन इन द एटिक’ म्हणजेच कोठडीत बंद असलेली वेडी महिला असं केलं जायचं.

हा रोग नक्की का व्हायचा? 

जेव्हा महिलांच्या लैंगिक भुकेचं दमन केलं जायचं तेव्हा त्यांना हिस्टेरिया व्हायचा. म्हणजे जरी पुरुषांशी लैंगिक संबंध ठेवले तरी त्या चरम सुखापर्यंत जाऊ शकायचा नाहीत तेव्हा हा रोग व्हायचा. म्हणजे महिला सेक्शुली फ्रसट्रेटेड असायच्या. आणि स्ट्रेस मध्ये येऊन त्या असं वागायच्या.

म्हणजे तेव्हाच्या काळात आत्ता इतक लैंगिक शिक्षण नव्हतं. महिलांसाठी चरमसुख ही काही कन्सेप्ट असते असं माहीतच नव्हतं पुरुषांना. पुरुषांचं झालं कि झालं. त्यानंतर जेव्हा रिसर्च केला गेला तेव्हा समजलं. जॉर्ज बियर्ड नावाच्या तज्ञाने या रोगाशी निगडित एक ७५ गोष्टींची लिस्ट बनवली. ज्यात या रोगाशी संबंधित लक्षण आणि उपाय सांगण्यात आले.

मग त्यावर उपाय म्हणून बऱ्याच गोष्टी केल्या गेल्या.

हा रोग झाल्यावर जेव्हा महिला फिजिशियन्सकडे जायला लागल्या तेव्हा, फिजिशियन्स त्यांच्या व्हजायना वर मालिश करून देत. हा मसाज तासनतास करूनही निदान काय व्हायचं नाही. महिलांना चरमसुख काही मिळायचं नाही. मग फिजिशियन्सनी त्यांना घरच्या घरीच क्लिटोरलला मसाज करायचा उपाय सांगितला. पण तरी हि काही फरक पडला नाही. त्यानंतर काही काळ पाण्याचा फवाऱ्याचा उपाय महिलांच्या व्हजायना वर करण्यात आला. पण या उपायाने पण काही फरक पडेना.

शेवटी मदतीला व्हायब्रेटर आला. 

व्हायब्रेटरचा जसा का शोध लागला तसा तसा महिलांच्या अति आक्रस्ताळेपणात फरक जाणवू लागला. सेक्सच्या पण तुलनेत हा व्हायब्रेटर अत्यंत उपयोगी ठरू लागला. महिलांच्या कामुक वासना भागवण्यासाठी कोणाचाही हात नव्हता तर व्हायब्रेटरचा रिदम होता. या रिदम मागे हात होता जोसेफ ग्रॅन्व्हिले या माणसाचा. त्याने हा व्हायब्रेटर खरं तर मसल रीलिफसाठी शोधला होता. पण मग बऱ्याच फिजिशियन्सी हा व्हायब्रेटर हिस्टेरिया या रोगावर उपचार करण्यासाठी वापरला.

पण या बाबाने आपलं इन्व्हेन्शन खरं तर यासाठी नव्हतंच असं म्हणत, आपल्या प्रोडक्टचा मिस युज झालाय म्हणून, काही फिजिशियन्सवर आरोप केला. म्हणजे बायकांना याचा उपयोग झाला पण यामुळे  ग्रॅन्व्हिलेला मात्र मोठा पश्चाताप झाल्याचं त्याने त्याच्या Nerve-Vibration and Excitation as Agents in the Treatment of Functional Disorder and Organic Disease या पुस्तकात म्हंटलंय.

असो त्याचा मनस्ताप त्याचबरोबर संपला. पण त्याच्या व्हायब्रेटरचा रिदम काही केल्या संपलेला नाही एवढं मात्र नक्की.  

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.