परीक्षेत विचारल्या जाणाऱ्या प्रश्नावरून तृणमूल आणि भाजपमध्ये राडा सुरु झालाय..
एखाद्या गोष्टीचा वचपा कसा काढावा हे ममता दीदींकडून अख्ख्या भारताने शिकावं. म्हणजे भारतातलं राजकारण सध्या एवढ्या बेकार थराला गेलंय की, पक्षांनी एकमेकांवर टीका टिप्पणी करण्यासाठी अगदी लोकसेवा आयोगाच्या पेपरला सुद्धा सोडलं नाही.
म्हणजे ज्या पद्धतीने UPSC च्या परीक्षेत बंगाल संबंधी प्रश्न विचारले, अगदी त्याच पद्धतीत बंगालच्या डब्लूबीसीएस परीक्षेत सावरकरांविषयी प्रश्न विचारण्यात आले. म्हणजे झालंय असं की, दोन दिवसांपासून ते एका पेपरचा स्क्रिनशॉट खूप व्हायरल झाला होता.
त्यात,
‘तुरुंगात असताना ब्रिटिश प्रशासनाकडे दयेचा अर्ज करणारा स्वातंत्र्यसैनिक कोण?’
असा प्रश्न विचारण्यात आला होता. या प्रश्नाचा रोख स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकरांकडे होता. स्वातंत्र्यवीर सावरकरांना भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आदर्शस्थानी मानतो. अत्यंत जहाल आणि देशासाठी त्याग करताना मागेपुढे न पाहणारे क्रांतिकारक, अशी सावरकारांची प्रतिमा अधिक प्रकर्षाने सर्वांसमोर आणण्याचे भाजपचे प्रयत्न आहेत.
पण याआधी झालेल्या ‘यूपीएससी’च्या परीक्षेत,
पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणुकीनंतर झालेल्या हिंसाचाराबाबत मतप्रदर्शन करण्यास परीक्षार्थींना सांगण्यात आले होते.
बहुदा हे प्रश्न पश्चिम बंगाल सरकारला झोंबले असावे. कारण, ‘डब्लूबीसीएस’च्या परीक्षेत राष्ट्रीय नागरीक नोंदपुस्तिकेची (एनआरसी) सध्याची स्थिती आणि टूलकिट याबाबत ही प्रश्न विचारण्यात आला होता. या दोन मुद्द्यांवरून केंद्र सरकारवर आणि भाजपवरही प्रचंड टीका झाली होती.
यात, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी यांनी म्हंटले,
बंगालच्या हिंसाचाराची सध्या केंद्रीय अन्वेषण विभागाकडून चौकशी सुरु आहे. न्यायालयाच्या आदेशावरून विशेष तपास पथकाचीही स्थापना झाली आहे. आणि यूपीएससी ही निष्पक्ष संस्था आहे. मात्र, आता भाजपकडून त्यांना प्रश्न पुरविले जातात. शेतकरी आंदोलनावर विचारलेले प्रश्नही राजकीय हेतूंनी प्रेरित असल्यासारखे वाटतात. भाजपमुळे यूपीएससी सारख्या संस्थांचे महत्त्व कमी होत आहे
बंगालच्या निवडणुकीवेळी भाजप आणि तृणमूल काँग्रेस यांच्यातील राजकीय वाद अख्या भारताने पहिला. आता त्यांचे हे वाद केंद्रीय आणि राज्य आयोगांच्या परीक्षांमध्ये विचारलेल्या प्रश्नांमधूनही प्रतिबिंबीत होत असल्याच दिसतंय.
एकप्रकारे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पश्चिम बंगालमधील परिस्थितीबाबत विचारलेल्या प्रश्नाला प्रत्युत्तर म्हणून पश्चिम बंगाल लोकसेवा आयोगान सावरकरांच्या प्रश्नाद्वारे भाजप कार्यकर्त्यांना डिवचायच कामच केलं आहे अस अभ्यासकांच म्हणणं आहे.
हे ही वाच भिडू
- ब्रिटिशांनी देखील वारीवर बंदी घातलेली, ती मोडण्यासाठी सावरकरांनी एक प्लॅन बनवलेला
- या घटनेपासून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि कॉंग्रेसमध्ये उभी फुट पडली.
- लोकवर्गणीतून बाबूजींनी वीर सावरकर सिनेमा पुर्णत्वास नेला..