राहुल गांधींनी वृद्ध महिलेला मिठी मारल्याचा फोटो फेक आहे का ? काय आहे खरं वाचा.

कॉंग्रेस पक्षाची एक जाहिरात प्रसिद्ध झाली. राहूल गांधी यांच्यासोबत एक वृद्ध महिला होती आणि राहूल गांधी त्यांना आधार देत आहेत. मोठ्या ममतेने ती वृद्ध महिला राहूल गांधी यांना बिलगून उभा आहे असा तो फोटो. 

कॉंग्रेस पक्षातर्फे जाहीर करण्यात आलेली ही जाहिरात NYAY अर्थात न्यूनतम आय गॅरेंटी योजनेचा आहे. या जाहिरातीमधून दरवर्षी 72,000 रुपये गरिबांच्या खात्यावर देण्यात येतील अस सांगण्यात आलं आहे. 

मात्र या मुख्य मुद्याहून सर्वात अधिक चर्चा झाली ती राहूल गांधी यांच्या तिसऱ्या हाताची.

फोटोत दिसणारा हा तिसरा हात सर्वात प्रथम शोधून काढला तो ताजिंदर सिंग पाल बग्गा यांनी. दिल्ली भाजपचे प्रवक्ता असणाऱ्या ताजिंदर सिंग पाल यांनी ट्विटरवर हा फोटो ट्विट करुन प्रश्न विचारला की, ये तिसरा हाथ किसका हैं. यापुढे ते असे म्हणाले की, i told you yesterday na, hire good pr agency  अर्थात चांगली जाहिरात करणारे लोक पहा. 

https://twitter.com/TajinderBagga/status/1115133828840845312

त्याच सोबत ABP न्यूजचे विकास भदौरिया यांनी देखील अशाच आशयाचे एक ट्विट करत या फोटोचा समाचार घेतला. ते म्हणाले काय तूम्ही पहिल्या फोटोत राहूल गांधी यांचा हात शोधू शकता. नाही तर ठळकपणे दूसरा फोटो पहा. हा तिसरा हात कोणाचा आहे. 

केंद्रीय मंत्री असणाऱ्या स्मृती इराणी यांनी देखील कॉंग्रेसका छल कपट वाला हात म्हणत टिका केली. 

पण मुख्य प्रश्न उभा राहतो तो म्हणजे हा तिसरा हात कोणाचा आणि हा फोटो फोटोशॉप आहे का? 

त्यासाठी फोटोचा इतिहास पहावा लागतो. हा फोटो नेमका कधीचा याचा शोध घेतल्यानंतर तारिख मिळते ती ९ डिसेंबर २०१५. तामिळनाडू आणि पॉंडिचेरी येथे पूरामुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी राहूल गांधी गेले होते. त्यावेळी स्थानिक लोकांना आधार देत असताना हा फोटो काढण्यात आला होता. 

कॉंग्रेस पक्षाने केलेल्या ट्विटमध्ये हा ओरीजनल फोटो स्पष्टपणे दिसतो. 

या फोटोत पाठीमागे असणाऱ्या व्यक्तिचा हात असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे. मात्र जाहिरातीसाठी फोटो एडिट करत असताना हा फोटो ठिक कट करण्यात आला नाही. पाठीमागे उभा असणाऱ्या लोकांना देखील ब्लर अर्थात अंधुक करण्यात आले. मात्र त्याच वेळी हा हात मात्र तसाच राहिला. थोडक्यात हा फोटो खोटा नसून खरा आहे. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.