उपराष्ट्र्पतींचं ब्ल्यू टिक गेलं जाऊ दे पण या आयडिया वापरुन तुम्ही ‘ब्ल्यू टिक’ मिळवू शकता
आज सकाळीच भारताचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंच्या वैयक्तिक ट्विटर हॅण्डलच ब्लु टिक म्हणजे बॅज, (बिल्ला ओ) तो हटवलाय ट्विटरनं. फक्त नायडूंचाच नाही तर संघाच्या बड्या बड्या नेत्यांचा बिल्ला सुद्धा या निळ्या विदेशी चिमणीनं काढून घेतलाय.
यात संघाचे सुप्रीमो मोहन भागवत, संघाचे कार्यवाहक सुरेश सोनी, अखिल भारतीय प्रचार प्रमुख अरुण कुमार, सुरेश जोशी, कृष्णगोपाल यांच्या ट्विटर अकाऊंटचा समावेश आहे.
बाकीच्यांच जाऊ दया ते भाजप आणि ट्विटर बघून घेईल. पण व्यंकय्या नायडू यांच्या पर्सनल @MVenkaiahNaidu या अकाऊंटला जवळजवळ १.३ लाख फॉलोअर्स आहेत. ट्विटरचे म्हणण आहे की जुलै २०२० पासून नायडूंच अकाऊंट निष्क्रिय होते, त्यामुळे निळा टिक हटविला गेला. वाद जास्तच वाढायला लागल्यावर ट्विटरने तो टिक परत होता तसा आणून दिलाय. पण ट्विटरवर अशी पण काही अकाऊंट आहेत जी अनेक वर्षांपासून बंदच आहेत, आणि तरीही त्यांच्यावर निळा टिक आहे. यात माजी अर्थमंत्री अरुण जेटली, सुषमा स्वराज यांची अकाऊंट आहेत.
सूत्रों की माने तो,
माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाकडून ट्विटरला नोटीस पाठविण्याची तयारी सुरु आहे. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार कोणत्याही राष्ट्राच्या उपराष्ट्रपतींच्या अकाऊंटवरुन निळ्या रंगाची टिक हटविणे हा भारतीय घटनात्मक स्थानाचा अवमान आहे. यानंतर आज सकाळपासूनच #BanTwitterInIndia, #BlueTick आणि #VenkaiahNaidu ट्विटरवरच ट्रेंड होत आहे.
आणि आता हा ब्लु बॅज काढून घेणं ट्विटरला लै महागात पडणारे. एकदा काढलं ना काढलंच. परत ब्लू टिक रिस्टोर करुन काय फायदा नाय. भाजप कार्यक्रम करणारच या निळ्या चिमणीचा.
बरं आता उपराष्ट्र्पतींचं ब्ल्यू टिक गेलंय जाऊ द्या, वाईट झालं. खरं आता जे झालं ते झालं. आता थोड्या आयडिया वापरुन तुम्ही पण ब्ल्यू टिक मिळवू शकता बर का. सेलिब्रिटींच्या अकाऊंटवर असतं ना तसलं.
ट्विटरवर निळा टिक येण्यासाठी युजरने प्रथम ट्विटरच्या धोरणाचे निकष काळजीपूर्वक वाचले पाहिजे.
या व्यतिरिक्त, ट्विटर हँडलवरील युजरच नाव वास्तविक असल पाहिजे. तुमच्या अकाऊंटच्या तपशीलात जन्म तारीख आणि ई-मेल, पत्ता खराखरा पाहिजे. ट्विटरवर तुमचाच फोटो पाहिजे. प्रायवसी सेटिंग मध्ये ट्वीट पब्लिक असणं आवश्यक आहे. शेवटची आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे युजरकडे मतदान कार्ड किंवा आधार कार्ड पाहिजे. ज्याची स्कॅन केलेली कॉपी ट्विटरला द्यावी लागेल.
ब्लू टिकसाठी एक फॉर्म भरायला लागतोय.
पॉलिसी आणि प्राथमिक अटी वाचल्यानंतर युजरने verification.twitter.com वर जायचं. येथे वापरकर्त्याला. तिथं एक फॉर्म दिसेल ज्यात युजरला त्याची वैयक्तिक माहिती भरावी लागेल. वेरीफिकेशन फॉर्म भरल्यानंतर, ट्विटर वरून ऑथेंटिक मॅसेज येईल आणि आपल्याला निळा टिक मिळेल. निळा टिक मिळाल्यानंतर, आपल अकाऊंट ऑथेंटिक अकाऊंटच्या श्रेणीत येईल.
फेसबुकवर ब्लु टिक मिळवणं थोडस अवघड आहे.
फेसबुक प्रोफाइलवर निळ टिक पाहिजे असेल तर, यासाठी आपल्याला फेसबुकच्या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन कराव लागेल. पण फेसबुक ते ब्लु टिक सहजासहजी देत नाही.
यूजरकडून एक फॉर्म भरुन घेतला जातो आणि काही आवश्यक कागदपत्रांची मागणी केली जाते. बर्थ सर्टिफिकेट, ड्रायव्हिंग लायसन्स, पासपोर्ट लागतो. जर तुम्ही कोणतीही कंपनी किंवा संस्था चालवत असाल तर त्यासंबंधी कागदपत्र अनिवार्य आहेत.
गाइडलाइंस वाचल्यानंतर, आपल्या फेसबुक अकाऊंटवर लॉगिन करा आणि सेटिंग्जवर जा. आता general account settings मध्ये सगळ्यात वर edit वर क्लिक करा. त्यांनतर learn more च नवीन पेज ओपन होईल. त्यात let us know सिलेक्ट करा. सगळ्यात वर सर्च बार येईल त्यात How do i verify my account टाइप करून एंटर मारा.
त्यांनतर verify profiles and pages वर क्लिक करा. आता नवीन पेज ओपन होईल त्यातल्या verification वर क्लिक करुन ब्लु टिकसाठी आवश्यक असलेली माहिती भरा. तुमचं पेज स्पोर्ट्स, सेलेब्रिटी, म्यूजिक या कॅटेगरीत असेल तर पेज व्हेरिफाय होण्यासाठी ३ ते ६ दिवस लागतील. तेच जर बिजनेस कॅटेगरीत असेल तर ७ ते ४५ दिवस लागतील.
इंस्टाग्रामचा तर विषयच सोडून दया
फोटो शेअरिंग प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर प्रत्येकाला निळा टिक मिळण शक्य नाही. कंपनीच्या गाइडलाइंसनुसार इंस्टाग्रामवर ब्लू टिक्स केवळ सेलिब्रिटींसाठी राखीव आहेत. सामान्य श्रेणीचे यूजर्स याक्षणी ते वापरू शकत नाहीत. इतकच नाही तर फेसबुकवर निळ्या रंगाची टिक मिळालेल्या यूजरलाही इंस्टाग्रामवर निळा टिक मिळणे अशक्य आहे.
बाकी भिडू, मध्यंतरी ट्विटर, इंस्टा, फेसबुक बंद होणार अशी चर्चा ऐकली होती. आता थांबलाय कशाला आणि !! पळा लवकर, सगळं बंद व्हायच्या आत ब्लु टिक मिळतंय का बघा जावा जाऊन.
भिडू हे पण वाचा
- फेसबुक कर्मचाऱ्यांच्या चॅटचा विषय बाहेर आले आणि देशोदेशीच्या सरकारांना घाम फुटलाय…
- सरकार फेसबूक – इंस्टा बंद करणार असं वाटतं असेल तर हा लेख तुझ्यासाठीचं आहे भिडू…
- ३३५ जणांनी वापरलेल्या ऍपने ५ लाख भारतीयांचा फेसबुक डाटा कसा चोरला त्याची ही गोष्ट