सर्वोच्च पदावर असूनही दोन खोल्यांच्या घरात राहणारा गरीब राष्ट्रपती जगाने पाहिलाय.

अलीकडेच आपले राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले होते कि, मला महिन्याला पाच लाख पगार मिळतो पण त्यातला तर पावणे तीन लाख रुपये करच कापला जातो, मग राहिले किती? जेवढे राहिले त्यापेक्षा जास्त तर आपल्याकडच्या शिक्षकांना मिळतात”. तर असंय एकंदरीत सर्व सोयी-सुविधा, सुरक्षा यंत्रणा दिमतीला आहेत तरी आपल्या राष्ट्रपतींना याचे दुःख आहे कि त्यांना पगार कमी मिळतो.

आणि दुसरीकडे उरुग्वे देशाचे ८० वे माजी राष्ट्रपती जोस मुजिका हे स्वतःचा पगार गरिबांना दान देतात, अगदी साधे जीवन जगतात. त्यांना जगातले सर्वात गरीब राष्ट्रपती म्हणलं जातं ! 

पण यावर ते  नेहेमीच म्हणतात कि, “मला  जगातले सर्वात गरीब राष्ट्रपती म्हटले जाते, परंतु मी स्वतःला गरीब समजत नाही. कारण गरीब लोकं असे असतात की जे आपले संपूर्ण जीवन चांगल्या आणि महागड्या जीवनशैलीसाठी काम करतात आणि अधिकाधिक पैसे कमवायची इच्छा ठेवतात”

उरुग्वे हा दक्षिण अमेरिकेच्या दक्षिणपूर्व भागात वसलेला देश आहे. उरुग्वेबद्दल बोलायचं म्हणलं कि तेथील नाव नक्कीच समोर येते ते म्हणजे त्या देशाचे माजी राष्ट्रपती जोस मुझिका ज्याचं वय आत्ता ८६ वर्षं आहे.  २०१५ मध्ये त्यांनी राष्ट्रपती पदाचा राजीनामा दिला आणि कारण सांगितले कि,

“मला माझ्या तीन पाय असलेल्या मित्रासोबत ‘मॅन्युएल’ आणि चार पायांच्या बीटलबरोबर घालवण्यास वेळ हवा आहे”.  मॅन्युएल हा त्यांचा लाडका पाळीव कुत्रा आहे आणि बीटल त्याची कार आहे.

पाच वर्षांच्या कारकिर्दीत मुजिका यांनी त्यांच्या देशाला श्रीमंत बनवलं पण ते स्वत: गरीब राहिले .

जोस मुझिका अध्यक्ष असताना त्यांनी राष्ट्रपती भवनात राहण्यासही नकार दिला होता आणि आपल्या  साधारण दोन खोलीच्या घरात राहणे पसंत केले. इतकंच नाही तर त्यांनी राष्ट्रपती म्हणून सुरक्षा घेण्यासही नकार दिला होता. सुरक्षा यंत्रणेनेच्या दबावामुळे त्यांनी सुरक्षेच्या नावाखाली अवघ्या दोन पोलिसांची सेवा घेतली होती.

२०१० साली राष्ट्रपती झाल्यानंतर त्यांच्याकडे केवळ एकाच मालमत्तेच्या नावावर फॉक्सवॅगन बीटल कार होती, ही कार त्यांच्यासाठी खूप खास आहे असं सांगितलं जातं. 

मीडिया रिपोर्टनुसार, त्यांची कार इतकी प्रसिद्ध झाली की २०१४ साली एका व्यक्तीने त्यांना खरेदी करण्यासाठी दहा लाख डॉलर्सची ऑफरही दिली होती पण त्यांनी नकार दिला कारण त्यांनी जर हि कार विकली तर त्यांना त्यांच्या लाडक्या कुत्र्याला बाहेर फिरायला घेऊन जाऊ शकणार नाहीत.

असे सांगितले जाते की, सेवा निवृत्तीनंतर त्यांनी सरकारी पेन्शन घेण्यासाठी सुद्धा नकार दिला.  निवृत्तीनंतर ते एक साधारण शेतकऱ्याचे आयुष्य जगतात, इतकेच नाही तर या वयातही पाणी भरणे, स्वतःचे कपडे स्वतः धुणे इत्यादी सर्व कामे ते स्वतःच करतात. असे राजकीय नेते जे निवृत्तीनंतर फुलांच्या शेतीचा व्यवसाय करतात आणि त्यातून आलेल्या नफ्याला सुद्धा देणगी म्हणून दान देतात.

तो स्वत: शेतीमध्ये ट्रॅक्टर चालवतात. जर ट्रॅक्टर खराब झाला तर ते स्वतः मेकॅनिकप्रमाणे दुरुस्त करतात. त्यांच्याकडे कोणत्याही कामासाठी नोकर-चाकर नाहीत. ते ऑफिसला जातांनाही त्यांची ती जुनी फॉक्सवॅगन बीटल कार चालवायचे.  ऑफिसला जाताना तो कोट-पँट घालायचे, पण ते घरात अगदी सामान्य कपड्यांमध्येच राहायचे.

हा माणूस इतका साधा- सरळ आहे कि त्याचं जीवन म्हणजे एखाद्या संताच्या जीवनासारखे आहे असं म्हणणे अतिशियोक्ती ठरणार नाही !

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.