लस घेतल्यानंतर मावा खाल्ला तर चालतो का ; गायछाप, सिगरेट, दारूचं काय वाचा..

परवाच आमच्या मित्राने फेसबुकवर विचारलं, लस घेतल्यावर मावा खाल्ला तर चालतो का?. लोकांनी त्याला येड्यात काढलं. कायपण विचारतो म्हणून चेष्टा की. पण भावांनो प्रश्न व्हॅलिड आहे. रोज सकाळी पानटपरीचा रस्ता पकडणाऱ्यालाच या प्रश्नातली दाहकता कळू शकते.

माव्याचं कसं, सिगरेटचं काय गणित, दारू चालते का? बर दारू चालत नसली तर बियर, ब्रिजर चालतं का? असे एक ना अनेक प्रश्न होते. आत्ता या प्रश्नांची उत्तर तर मिळवली पाहीजे. मग काय बोलभिडूने थेट डॉ. संग्राम पाटील यांना फोन फिरवला. संग्राम पाटलांनी देखील अगदी रितसर उत्तर दिली.

आमचे प्रश्न आणि डॉ. संग्राम पाटील यांनी दिलेली उत्तरे खाली देत आहोत, वाचा आणि डिटेल्स समजून घ्या. 

१) लस घेतल्यानंतर मावा खाल्ला तर चालतो का..?

डॉ. संग्राम पाटील : माझ्या माहितीप्रमाणे मावा म्हणजे तंबाखूचं मिश्रण असतं, तर तंबाखूच्या बाबतीत दोन गोष्टी आहेत. पहिलं म्हणजे तंबाखूमध्ये जे घटक आहेत त्यात हजारो केमिकल्स आहेत आणि या केमिकल्सचा इम्युनिटीवर परिणाम होत असतो.

पहिली गोष्ट इम्युनिटीचा बॅलन्स यामुळे खराब होतो. जास्त प्रमाणात खाल्ल तर इम्युनिटी सप्रेस होते म्हणजे दाबली जाते. आणि दूसरं अस अजून एक आढळून आलेलं आहे की तंबाखू मधले जे केमिकल्स आहेत जे लोक ते खातात, स्मोकिंग करतात किंवा चघळतात या लोकांमध्ये इम्युनिटी संदर्भात जे आजार असतात त्याचं प्रमाण वाढलेलं दिसून आलेलं आहे.

म्हणजे इम्युनिटीचा बॅलन्स खराब होतो. ती सप्रेस होते, आणि इम्युनिटी संदर्भातले आजार वाढलेले आहेत.

त्यामुळे मावा जास्त प्रमाणात खात असाल तर तो आपली इम्युनिटी सप्रेस करेल, तुम्ही अगोदरपासून खात असल्याने ती आधीच सप्रेस झालेली आहे. आणि खात राहिला तर ती सप्रेस करेल.

लस घेतल्यानंतर काय होतं लस ही आपल्या इम्युनिटीला चॅलेंज करते. आणि जर इम्युनिटीची रिएक्शन लस ला झाली नाही. इम्युनिटीने ते चॅलेंज स्वीकारून रिस्पॉन्स दिला नाही तर त्यापासून मिळणार प्रोटेक्शन तेवढं प्रभावी नसेल. म्हणून आपण जर मावा खावून इम्युनिटीला सप्रेस करुन ठेवलं भरपूर मोठ्या प्रमाणावर मावा पूर्वीपासून घेत आहोत ते सुरू ठेवलं तर इम्युनिटी लस ला रिस्पॉन्स नाही देवू शकणार. त्यामुळे अपेक्षित रिझल्ट येतील का नाही सांगता येणार नाही. असा डिस्टर्बन्स सायटिंकली होवू शकतो.

२) लस घेतल्यानंतर किंवा लस घेण्यापूर्वी गायछाप किंवा सिगारेट घेतली तर चालते का?

डॉ. संग्राम पाटील : आत्ता हा प्रश्न आहे याच उत्तर देखील वरच्या सारखं आहे. मात्र गायछाप आपण तोंडात चघळतो त्यामुळे ती सरळ रक्तात जाते. सिगारेट मधले जे केमिकल्स असतात ते फुफ्फुस, श्वासनलिका या द्वारे रक्तात जातात म्हणजे गायछापचा परिणाम थेट रक्तात होतो याच्याने इम्युनिटीचा बॅलन्स आणि इम्युनिटी सप्रेस होणे आणि इम्युनिटी संदर्भातल्या आजारांची शक्यता वाढते.

सिगारेटने मात्र या तीन गोष्टी होतातच परंतु श्वासनलिका आणि फुफ्फुस यांची आतली लायनिंग आहे, आतलं आवरणं याला हे डॅमेज करत आणि याला डायरेक्ट इंज्युरी होते. सिगारेटच्या स्मोकमुळे. कारण त्याच्यामध्ये ते टार आणि केमिकल्स असतात धुराचे त्याने डॅमेज होतं. दूसरं म्हणजे या स्मोकमुळे आणि या टार मुळे श्वासनलिकेतले आणि फुफ्फुसातल्या ॲटिबॉडिज तयार होतात त्या देखील कमी होतात त्या निष्क्रिय केल्या जातात म्हणूनच या लोकांना वारंवार चेस्ट इन्फेक्शन होतं. यांना ब्रॉन्काईटीसची शक्यता वाढते.

स्मोकिंग करणाऱ्यांना निमोनिया, COPD नावाचा घातक आजार आणि अस्थमा असेल तर याच्यामध्ये तो अनकंट्रोल राहू शकतो आणि अशा परिस्थितीत जर तुम्ही ते घेत राहिलात सिगारेट ओढत राहिलात गायछाप खात राहिलात तर तुमची इम्युनिटी सप्रेस होईल आणि इम्युमिटी जेव्हा आवश्यक आहे लस घेताना.

पहिला आणि दूसऱ्या डोसला इम्युनिटीने रिएक्शन दिली पाहीजे पण ती जर आपण सिगारेट आणि गायछापने सप्रेस करुन ठेवलो आणि ते कंटिन्यू ठेवलं तेवढ्या प्रमाणात रिस्पॉन्स येणार नाही. अस एक सायटिंफीकली त्याच्या मागे एक लॉजिक आहे पण यावर कुठला स्टडी झाला नाही.

आता काही अशा स्टडी आहेत काही लोकांच म्हणणं आहे जे लोक सिगारेट ओढतात त्यांच्यात कोरोनाचं संक्रमण कमी आहे पण त्यावर ठोस कुठलाही चांगला असा स्टडीचा आधार नाही. परंतु एक गोष्ट आहे जे लोक सिगारेट ओढतात त्यांना कोरोना झाला तर त्यांच्यात आऊटकम गंभीर आहे, ते जास्त आजारी पडतात, जास्त गंभीर होतात.

३) लस घेतल्यानंतर किंवा घेण्यापूर्वी दारू पिण्याचं गणित काय असतं..? 

डॉ. संग्राम पाटील : तूम्ही दारू किती पिता यावर अवलंबुन आहे. तुम्ही सोशल ड्रिंक करत असाल कमी प्रमाणात पीत असाल तर ती कंटिन्यू करायला हरकत नाही. लस घेण्याच्या आधी आणि नंतर सुद्धा पण लस घेतल्यानंतर एक दोन दिवस जे साईडइफेक्ट येतील ते दाबण्यासाठी दारू वाढवू नका.

तूम्ही जर जास्त दारू घेत असाल तर दारूमुळे देखील इम्युनिटी सप्रेस होते, त्यामुळे देखील आपण इन्फेक्शनचा धोका वाढतो. दारू जास्त पिणाऱ्यात कुपोषण असतं. त्यामुळे हा सगळा परिमाण एखादा जास्त दारू घेत असेल तर धोका वाढतो. लसचा पहिला डोस आणि दुसरा डोस घेतल्यावर जी इम्युनिटी सक्रिय झाली पाहिजे ती त्या प्रमाणात होत नाही.

म्हणून कदाचित आपण दारू जर जास्त घेत राहिलो लसच्या आधी आणि लसच्या दोन डोसमध्ये तर आपल्याला तेवढा अपेक्षित इम्युनिटी वॅक्सीनचा फायदा होईल कि नाही याबद्दल शंका व्यक्त केली गेलेली आहे.

त्यामुळे रशियामध्ये लोकांनी दोन महिने दारू घेऊ नका, दोन्ही डोस झाल्यानंतर मग दारू सुरु करा असं सांगितलं आहे. इंग्लंडमध्ये काही लोकांनी असा सल्ला दिला आहे एक्स्पर्टनी कि एक आठवडा पहिल्या डोसच्या आधी आणि दुसरा डोस झाल्यानंतर दोन आठवडा एवढं अंतर तुम्ही दारू बंद करा. अमेरिकेमध्ये मात्र त्यांनी सांगितल आहे कि प्रमाणात घेत असाल तर सुरु ठेवा, जास्त घेत असाल तर ती कमी करा किंवा हळूहळू बंद करा आणि मगच लसचे डोस घ्या. आणि लस घेऊन झाल्यानंतर महिन्याभराने मग प्रमाणात तुम्ही परत सुरु करू शकता असा दारू पिण्याबाबतचा सल्ला आहे.

४) लस घेतल्यानंतर बिअर, रेडबुल हे ऑप्शन उपलब्ध आहे का ?

डॉ. संग्राम पाटील : बियर वगैरे यामध्ये कमी अल्कोहोलचं प्रमाण आहे हे आपल्याला मान्य आहे. परंतु तुम्ही प्रमाणात घेत असाल तर ते तुम्ही घेऊ शकता, परंतु जास्त प्रमाणात घेतलं तर त्याच्याने इम्युनिटीचा डिस्टर्बन्स होतो आणि त्यामुळे व्हॅक्सिनचा रिझल्ट कसा येईल हे आपल्याला आत्ता सांगता येणार नाही त्यामुळे प्रमाणात ठेवा.

५) लस घेतल्यावर सेक्सचं काय ?

डॉ. संग्राम पाटील : शारीरिक संबंधाच्या बाबतींमध्ये कोरोनाच्या बाबतीत, कोरोनाच्या काळात जो सल्ला आहे तोच लसच्या बाबतीतही लागू होतो. तुम्ही शारीरिक संबंध कोणाशी करता याच्यावर अवलंबून आहे.

तुम्ही जर आपल्या घरातल्याच व्यक्तीशी, आपल्या पार्टनरशी, पती किंवा पत्नीशी करत असाल संबंध आणि तुम्ही त्यांच्या सोबत राहत आहात तर लसचा आणि संबंधाचा तसा काही संबंध नाही परंतु जर तुमचा शारीरिक संबंध बाहेरच्या व्यक्तीशी येत असेल तर लस मिळाल्यावर तुम्हाला प्रोटेक्शन लगेच मिळत नाही.

पहिल्या डोसनंतर तीन आठवड्यानंतर तुम्हाला ६०-७० % प्रोटेक्शन मिळतं. म्हणजे तुम्ही त्या काळात कोणाच्या जवळच्या संपर्कात आलात तर तुम्हाला कोविड होण्याची दाट शक्यता आहे. आणि त्यानंतर तीन आठवड्यानंतर जरी तुम्हाला ७० % प्रोटेक्शन असलं तरी तुमची कोविड होण्याची रिस्क आहे क्लोज कॉन्टॅक्ट आल्यामुळे.

दुसऱ्या डोसनंतर तुमचं प्रोटेक्शन वाढतं ७० चं ८०-९० % होतं तरीदेखील तुम्ही बाहेरच्या व्यक्तीशी शरीरसंबंध करत असाल कि जे तुमच्या कुटुंबातले नाहीत तर कोरोनाच्या काळामध्ये हे धोकादायक असेल कारण कोरोनाचा स्ट्रेन बदलला तर तुम्ही व्हॅक्सिन घेतलेला असूनही तरी तुम्हाला कोरोनाचा धोका होऊ शकतो. त्यामुळे या काळात तुम्ही सतर्क राहा. घरात सेक्स करतानासुद्धा जर तुम्हाला काही लक्षणं असतील तर तुम्ही चौदा दिवस टाळावं लक्षणांच्या बाहेर येईपर्यंत आणि आपल्या पार्टनरला लक्षण असतील तरी सोशल डिस्टन्स पाळावा लागणार आहे, त्यामुळे हा असा लसचा डायरेक्ट संबंध नाही पण अप्रत्यक्ष आहे. तुम्ही कोणाशी सेक्स करता, केव्हा करता यावरती अवलंबून असेल.

६) लस घेतल्यानंतर १२०, ३०० रिमझिम अशा तंबाखू पान खाण्याबाबत पण मर्यादा आहेत का?

डॉ. संग्राम पाटील : याच उत्तर वरच्या प्रमाणेच आहे कारण हे तंबाखूचे प्रोडक्टस आहेत. हे जर एक्सेसिव्ह आपण घेत असू तर इम्युनिटी कमी होईल, इम्युनीटीचा बॅलन्स कमी होईल आणि इम्युनीटीशी संदर्भात संबंधित जे आजार आहेत ते देखील होण्याची अशी शक्यता या लोकांमध्ये असते.

त्यामुळे लसच्या आधी काही दिवस दोन्ही डोस झाल्यानंतर जवळजवळ महिनाभर या काळामध्ये असे प्रॉडक्ट्स कमी करावेत किंवा बंद करता आले तर बंद ठेवावेत म्हणजे आपल्याला लसला न्याय देता येईल.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.