विलासरावांचे ५ किस्से !

विलासराव देशमुखांच्या आठवणी असणारे पुस्तक जेष्ठ पत्रकार मधुकर भावे यांनी संपादित केले आहे. राजहंस या पुस्तकात विलासराव देशमुख यांचे काही किस्से देण्यात आले आहेत. सरपंच ते केंद्रीय मंत्री या दिर्ध राजकीय प्रवासात विलासरावांनी अनेक चढउतार अनुभवले.

पण, त्यांची वृत्ती खुशी मिले या गम… अशीच राहिली.

शालेय शिक्षण आणि पशुसंवर्धन ही दोन खाती सांभाळताना आपण पोराबाळांचे आणि गुराढोरांचे मंत्री आहोते हे मिश्लिकलपणे सांगणारे किंवा शरद पवार यांच्याविरोधात केलेल्या उद्योगामुळेच बहुधा आपल्याला उद्योग खाते दिले असावे, अशी कबुली देणाऱ्या विलासरावांच्या कारकिर्दीतील हे काही किस्से.

१) एकदा लातूरहून हैद्राबादला प्रदिप राठी, गुरूनाथ ब्याळे व आप्पासाहेब हलकुडे विलासरावांसोबत कारमध्ये निघाले. वेळ घालवण्यासाठी म्हणून आप्पासाहेब हलकुडेंना विलासरावांनी गाणे म्हणण्यास सांगितले. हलकुडेंनी दत्ता दिगंबरा.. हे गाणे व बऱ्याच जणांच्या सुचनांमुळे १०-१२ वेळा तेच ते गाणे हलकुडे गाऊ लागले.

विलासराव म्हणाले, 

“हलकुडेंअप्पांचे गाणे खरेतर रेडिओवर ठेवले पाहीजे.”

विलासरावांची ही प्रतिक्रिया ऐकूण हलकुडे म्हणाले,

“खरेच का हो साहेब मी एवढा चांगला गातो?”

तेव्हा विलासराव म्हणाले,

अहो ब्याळे रेडिओवर गाणे एवढ्यासाठीच ठेवायचे की, आपल्याला नको वाटले की, रेडिओ बंद करता येतो. 

 

२) १९८० साली विलासराव विधानसभेत निवडून आले. मित्रांना सोबत घेवून जेव्हा आमदार निवासात गेले, तेव्हा लग्नातील सफारी अंगावर असलेल्या विलासरावांना प्रवेशासाठी कर्मचाऱ्यांनी अडवले व विष्णू भूतडा यांच्या अंगावरील खादी कपडे बघून त्यांनाच ते आमदार समजू लागले.

विलासराव विष्णू भूतडा यांना म्हणाले,

“मी आमदार असलो काय किंवा तूम्ही असला काय, काय फरक पडतो. चला आमदार निवासात मुक्काम झाला.”

चहा कॉफी झाली. दूसऱ्या दिवशी सकाळी रुमबॉयने विष्णू भूतडांनाच सॅल्युट ठोकला व बिल समोर केले.

तेव्हा विष्णू भुतडा म्हणाले,

“विलासराव आत्ता खादीचे कपडे शिवा. ही नकली आमदारकी मला परवडणारी नाही.”

३)  आमदार असताना मुंबईहून लातूरला येताना जेवण कुठे घ्यायचे, चहा कुठे घ्यायचा व कुणी किती पैसे खर्च करायचे, असे विलासराव सहकाऱ्यांना सांगत. एकदा हाजीअली येथे सीताफळाचा ज्यूस पिऊ व ते पैसे ॲड. ब्याळे देतील, असे त्यांनी सांगितले.

ज्यूसचे बिल २५० रुपये झाले व गाडीत बसल्यानंतर ब्याळेंचे बोलणेच बंद झाले.

तेव्हा विलासराव म्हणाले,

“ब्याळेसाहेब, ज्युसचे पैसे हवे तर मी देतो. मात्र हसत खेळत आपण प्रवास करु.”

तेव्हा पैसे न घेताच ब्याळेंना हसण्यावाचून पर्याय नव्हता.

४) बाबासाहेब भोसले यांच्या काळात विलासराव मंत्री होते. भोसलेंचे मुख्यमंत्रीपद गेले. त्या दिवशी विलासराव त्यांना भेटायला गेले. गप्पा मारताना विलासराव आपले मंत्रीमंडळ कसे चांगले होते, याबद्दल भोसलेंना सांगत होते. तेव्हा बाबासाहेब म्हणाले,

मला मुख्यमंत्रीपद मिळेल असे वाटले नव्हते. त्यामुळे त्याचा फारसा आनंद नव्हता आणि आत्ता गेल्यामुळेही फारसे दुख होत नाही.मेलेली म्हैस किती दूध देत होती हे सांगून काय उपयोग..

५) एका नाटकाच्या मध्यंतरात विलासरावांना रंगमंचावर बोलवण्यात आले. विलासरावांनी अगदी झोकात एण्ट्री घेतली आणि लोकांनी टाळ्यांचा कडकडाट केला. त्या कार्यक्रमानंतर उपस्थित लोकांनी त्यांना स्टेजवरील एण्ट्रीबद्दल दाद दिली तेव्हा ते मोठ्याने हसते म्हणाले,

आम्ही जशी एण्ट्री जोरदार करतो तशीच एक्झिटही शानमध्ये घेतो.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.