द गार्डियन,वॉशिंग्टन पोस्ट,अल-जझिरा रशिया-युक्रेन युद्धावर आज काय म्हणतायेत?

रशियाला अपेक्षित होतं युक्रेनला सहज चिरडून टाकू. पण चिकाट युक्रेनियन लोकं रशियन आक्रमणाचा टिच्चून प्रतिकार करत आहेत. कॉमेडियन म्हणून हिणवल्या गेलेल्या युक्रेनियन प्रेसिडेंटने रस्त्यावर येऊन कोणत्याही परिस्थिती देश सोडून जाणार नसल्याची भूमिका घेतली आहे आणि त्यामुळं देशातले नागरिकही निकराने लढा देत आहेत. त्यामुळं जागतिक मीडियाने यावर आज काय कव्हर केलंय ते एकदा पाहू –

वॉशिंग्टन पोस्ट –

WhatsApp Image 2022 02 27 at 1.55.57 PM

आतापर्यंत रशियाचा युक्रेनवर इन्वेजन म्हणजेच आक्रमण या सदराखाली बातम्या छापणाऱ्या वॉशिंग्टन पोस्ट आज वॉर इन युक्रेन असं म्हटलं आहे. 

इन्वेजन म्हणजे एकदा देश दुसरी देशाला गिळण्याची उद्देशाने किंवा तिथलं सरकार उलथवण्यासाठी आक्रमण करतो.  आणि वॉर म्हणजे दोन लष्करी सुसज देश एकमेकांपुढे उभे ठाकतात. 

रशियावर घालण्यात  येणाऱ्या सँक्शन्स म्हणजेच बंधनामुळे रशियाची युद्धाला लागणारी आर्थिक रसद डळमळीत होऊ शकतेय  तसेच स्विफ्ट नेटवर्क पासून रशियाला अलिप्त केलं तर रशियाच्या बँकिंग आणि अर्थव्यवस्तेवरच मोठा परिणाम होऊ शकतो असं सांगण्यात येत आहे.

तसेच युद्धाच्या काळात रस्त्यावर येऊन आपल्या सैनिकांचा आणि देशवासियांचं मनोबल वाढवणारा युक्रेनचा प्रेसिडेंटकडे हिरो म्हणून पहिले जात असल्याचं अमेरिकेच्या  न्यूज एजन्सीनं म्हटलं आहे. 

राष्ट्राध्यक्ष वोलोडिमिर झेलेन्स्की यांनी गुरुवारी ट्विट केले की,

 “ज्याला देशाचे रक्षण करायचे असेल त्यांना आम्ही शस्त्रे देऊ. आमच्या शहरांच्या चौकांमध्ये युक्रेनला पाठिंबा देण्यासाठी तयार रहा.” 

राष्ट्राध्यक्षांच्या या आव्हानाला पाठिंबा देत युक्रेनियन नागरिक मोठ्या प्रमाणात आर्मी मध्ये शामिल होत आहेत. मात्र आर्मीची कोणतीच ट्रेनिंग नसलेल्या सामान्य लोकं युद्धात उतरली तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी देखील होऊ शकते असं सांगण्यात येत आहे.

पश्चिमेकडे पलायन करणारे नागरिक: यूएन म्हणतंय की १,५०,००० हून अधिक युक्रेनियन लोकांनी देश सोडला आहे अशी बातमीही पोस्ट ने दिली आहे.

अल जझीरा-

WhatsApp Image 2022 02 27 at 1.59.52 PM

 

अल जझीराने पण आज रशिया युक्रेन वॉर असंच म्हटलं आहे. 

रशियन सैन्याने युक्रेनचा ‘मजबूत आणि व्यापक’ प्रतिकार केला आहे. विश्लेषकांचे म्हणणे आहे की युक्रेनच्या लढाऊ सैनिकांच्या अनापेक्षतरीत्या पुशबॅकमुळे रशियन सैन्य चांगलंच सावध झालंय .

“रशियाला स्पष्टपणे अशा अडचणींचा सामना करावा लागत आहे ज्याची त्याला अपेक्षा नव्हती. यात जीवितहानी होत आहे आणि तर युक्रेन रशियन सैनिक कैदेत घेत आहे , ज्यात काही वरिष्ठ ब्रिगेड कमांडर देखील आहेत,”

इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीजचे निगेल गोल्ड-डेव्हिस यांनी  अल जझीराकडे म्हटले आहे.

युक्रेनचे आरोग्य मंत्री व्हिक्टर लियाश्को यांनी शनिवारी सांगितले की, रशियाच्या हल्ल्यात तीन मुलांसह १९८ युक्रेनियन नागरिकांचा मृत्यू झाला आहे. आणि ३३ मुलांसह आणखी १११५ लोक जखमी झाले आहेत. युक्रेनच्या अधिकार्‍यांनी यापूर्वी सांगितले आहे की, ३५००० हून अधिक रशियन सैनिक मारले गेले आहेत. मात्र अल जझीरा स्वतंत्रपणे मृतांच्या आकडेवारीची पडताळणी करू शकलेले नाहीये.

रशियाने म्हटले आहे की राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन युक्रेनशी चर्चेसाठी बेलारूसला शिष्टमंडळ पाठविण्यास तयार आहेत अशीही बातमी अल जझीराने दिली आहे.

द गार्डियन 

गार्डियनची महत्वाची बातमी म्हणजे युनायटेड नेशन्स सिक्युरिटी कौन्सिल रशियाच्या हल्ल्यावर १९३ सदस्यीय जनरल असेंब्लीचे  आपत्कालीन विशेष सत्र बोलावण्यासाठी रविवारी मतदान करणार आहे, असे डिप्लोमॅट्सनि सांगितले आहे. यासाठी मताच्या बाजूने नऊ मतांची आवश्यकता आहे आणि व्हेटो करता येत नाही. तो पास होण्याची शक्यता असते. १९५० पासून अशी केवळ १० आपत्कालीन विशेष सत्रे बोलावण्यात आली आहेत.

ब्रिटनचे परराष्ट्र सचिव लिझ ट्रस यांनी सांगितले की,

येत्या काही महिन्यांत ब्रिटन रशियन श्रीमंत वर्गाची “हिट लिस्ट” तयार करत आहे. ट्रस म्हणाले की व्लादिमीर पुतिनच्या क्रेमलिनच्या अतिश्रीमंत मित्रांसाठी “लपण्यासाठी कोठेही जागा उरली नाहीये”.

द गार्डियनने दिलेली अजून एक बातमी म्हणजे अमेरिकन बारमालक युक्रेनवरील हल्ल्याच्या निषेध कसा करतायेत तर रशियात बनलेल्या वोडक्यावर बहिष्कार टाकून.

आणि यातील सर्वात महत्वाची घडामोड म्हणजे  जर्मनीने शनिवारी रात्री जाहीर केले की ते युक्रेनियन सैन्याला १००० अँटी-टँक शस्त्रे तसेच ५०० स्टिंगर क्षेपणास्त्रे स्वतःच्या लष्करी साठ्यातून देईल.

तसेच रशियाने युक्रेनवरील कारवाईला वॉर म्हणणाऱ्या इंडिपेंडेंट चॅनेल्सवर बंदी घातल्याचंही वृत्त गार्डियन ने दिलं आहे.

द ग्लोबल टाइम्स 

WhatsApp Image 2022 02 27 at 2.12.06 PM

चीनच्या या न्यूज एजन्सीने पहिल्यापासूनच रशियाची बाजू लावून धरली आहे.

कीवने चर्चा करण्यास नकार दिल्याने रशियन सैन्याने “सर्व दिशेने” आक्रमण सुरू ठेवले आहे. युक्रेनमधील चिनी राजदूत अजूनही कीवमध्ये सर्व सहकारी नागरिकांसह कठीण प्रसंगाला तोंड देत आहेत. असंही वृत्त ग्लोबल टाइम्सने दिलं आहे.

अजून एक महत्वाची गोष्ट या सर्व न्यूज एजन्सी हळू हळू आता युद्धाबरोबरबर दुसऱ्याही बातम्या पहिल्या पेज वॉर देऊ लागल्या आहेत. त्यामुळं जसे देशांनी हात झटकले तसेच बातम्यांमधूनही युक्रेनचा विषय हळू हळू फ्रंट पेज वरून आतल्या पानांत जाईल का हे बघण्यासारखे असणार आहे.

 हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.