अफगाणिस्तान ताब्यात घ्यायला तालिबान्यांनी एवढे पैसे कुठून आणले?

अफगाणिस्तानमधील परिस्थिती आता पूर्णपणे हाताबाहेर गेलीय. गेल्या काही दिवसांपासून तालिबानने अफगाणिस्तानचा बहुतांश भाग काबीज केला आहे. कंदहार, हेरात, मजार-ए-शरीफ आणि जलालाबाद या शहरांसह ३४ प्रांतीय राजधानींपैकी २५ राज्यांना तालिबानने ताब्यात घेतलंय.

कालच राष्ट्रपती अशरफ घनी यांनी अफगाणिस्तान सोडल्यानंतर भारताने ही आपले शेकडो अधिकारी आणि नागरिकांना काबूलमधून बाहेर काढण्याची आकस्मिक योजना आखली आहे.

मात्र विशेष गोष्ट अशी आहे की, यावेळी तालिबानचे संपूर्ण स्वरूप बदललेले दिसते. तालिबानी सैन्याजवळ चकचकीत हाय-टेक गन, रॉकेट लाँचर दिसतात. आणि याचमुळे कि काय तालिबानने अफगाणिस्तानच्या राजधानी काबुलसह २५ राज्य ताब्यात घेतली आहेत.

टीव्ही किंवा इंटरनेटवर पाहिल असेल तर समजेल की तालिबानी दहशतवादी अनेक सुविधांनी सुसज्ज आहेत आणि या दहशतवादी कृत्यासाठी त्यांना कोणत्याही आर्थिक समस्येचा सामना करावा लागत नाही.

पण, तुम्ही कधी विचार केला आहे की हे सर्व करण्यासाठी तालिबानकडे पैसा कुठून येतो ?

अतिरेकी संघटनेकडे असणारी इतकी हत्यार पैशाशिवाय खरेदी करणे खूप कठीण आहे. आता ऐकलं तर आश्चर्य वाटेल की तालिबानकडे कोट्यवधी रुपये आहेत आणि त्यांचे उत्पन्नाचे स्त्रोत देखील प्रचंड आहेत, जिथून त्यांना पैसे मिळत आहेत. अशा परिस्थितीत, तालिबानकडे किती पैसे आहेत बघूया.

श्रीमंत दहशतवादी संघटनांमध्ये तालिबान टॉप -५ मध्ये आहे.

२०१६ मध्ये फोर्ब्सने टॉप -१० श्रीमंत दहशतवादी संघटनांची यादी जाहीर केली होती. ज्यात तालिबानचा पाचवा क्रमांक होता. या यादीत प्रथम आयएसआयएस होते, ज्यांची उलाढाल २ बिलियन डॉलर होती. या अहवालानुसार, तालिबानची उलाढाल ४०० मिलियन होती आणि ती पाचव्या क्रमांकावर होती.

दुसरीकडे, जर तालिबानच्या कमाईच्या स्त्रोताबद्दल बोललो तर फोर्ब्सच्या अहवालानुसार, तालिबानच्या कमाईचा सर्वात महत्वाचा स्त्रोत म्हणजे मादक पदार्थांची तस्करी. या व्यतिरिक्त, तालिबान संरक्षण, देणग्यांमधूनही भरपूर पैसे कमावतात. त्याचवेळी, इंडिया टुडेच्या एका अहवालात म्हटले आहे की, नाटोच्या गोपनीय अहवालातून असे दिसून आले आहे की, तालिबानचे २०१९-२० चे वार्षिक बजेट १.६ बिलियन डॉलर होते, जे चार वर्षांत ४०० पटीने वाढले आहे.

नाटोच्या अहवालानुसार, तालिबानला माइनिंग मधून ४६४ मिलियन डॉलर, ड्रग्स मधून ४१६ मिलियन डॉलर, परकीय देणगीतून २४०मिलियन डॉलर, टॅक्स मधून १६० मिलियन डॉलर, एक्सपोर्ट मधून २४० मिलियन डॉलर, रिअल इस्टेटमधून ८० मिलियन डॉलर मिळतात.

आता जर एवढी कमाई तालिबानची असेल तर त्यांना अफगाणिस्तान ताब्यात घेणं काहीच अवघड नव्हतं. 

अफगाणिस्तानातून जेव्हापासून का अमेरिकी सैन्य माघारी आले तेव्हापासून तालिबानने वेग घेतला. अवघ्या काही आठवड्यातच त्यांनी अफगाणिस्तान ताब्यात घेतला. तालिबान आणि अफगाणिस्तान सरकारमध्ये सुरू असलेले हे युद्ध संपवण्यासाठी कतारमध्ये चर्चा सुरू आहे. ही चर्चाच असल्याने हे युद्ध कधी संपेल सांगता यायचं नाही.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.