फास्ट फूडची कन्सेप्ट जगाला शिकवणाऱ्या मॅकडोनाल्डस बंधूना खरा धंदा कधी कळलाच नाही..

एक काळ होता जेव्हा रानात कामाला जाणारी माणसं सकाळी सकाळी चहा पिण्याऐवजी थेट बाजरीच्या चार दोन भाकरी खाऊन जात असे. मग जसा जसा काळ बदलत गेला तसा ऑफिसचा जमाना आला. मग सकाळी जेवण वैग्रे हा प्रकार मागे पडत जाऊन जेवणात किंवा नाश्त्यात फास्टफूड हा प्रकार सुरु झाला. जागतिक पातळीवर मात्र हे फास्ट फूड प्रकरण मॅकडोनल्डच्या बर्गरमुळे चांगलंच गाजलं. या मॅकडोनल्डची सुरवात कशी झाली याचा अहा किस्सा.

१९४० मध्ये रिचर्ड आणि मॉरिस मॅकडोनाल्ड या दोन भावांनी मिळून कॅलिफोर्नियात एका छोट्या हॉटेलपासून आपल्या व्यवसायाची सुरवात केली.

हे दोघे भाऊ कमालीचे हुशार होते. एकत्र विचार करत आणि निर्णय घेत. एकमेकांच्या मतावर प्रतिप्रश्न करत आणि पुढे व्यवसाय वाढवत. वाद घालून वाटण्या जर त्यांनी केल्या असत्या तर आज मॅकडोनाल्ड इतकं मोठं झालं नसतं.

दोघा भावांनी मिळून आपल्या हॉटेलात अशी सिस्टीम बनवली होती कि ज्यातून अत्यंत चविष्ठ बर्गर मिळत आणि जास्त  वेळ थांबावं लागत नसे. यालाच पुढे फास्ट फूड म्हणून ओळखलं गेलं. मॅकडोनाल्ड बंधूनी विशेष बर्गर आणि त्यासोबत फास्ट सेवा यामुळे त्यांचा व्यवसाय चांगलाच बहरू लागला. 

इथपर्यंत मॅकडोनाल्ड फक्त अमेरिकेपुरतंच सीमित होतं. पण खऱ्या अर्थाने मॅकडोनाल्ड जगभर पसरलं ते रे क्रॉक या माणसामुळे.

कॅलिफोर्नियात रे जेव्हा आला तेव्हा त्याला मॅकडोनाल्ड बंधूंच्या हॉटेलबाहेर प्रचंड गर्दी आणि लोकांची रांग दिसली. उत्सुकतेपोटी त्याने तिथल्या एका ग्राहकाला विचारलं तर त्याने सांगितलं कि इथे उत्कृष्ठ चवीचा बर्गर मिळतो तोही फक्त १५ सेंट मध्ये आणि तोही जास्त वेळ न थांबता.

रे क्रॉक नंतर मॅकडोनाल्ड बंधूना येऊन भेटला आणि मॅकडोनाल्ड बर्गरची एक फ्रेंचायजी मागू लागला. मॅकडोनाल्ड बंधूनी आनंदाने एक फ्रेंचायजी क्रॉकला देऊ केली. क्रॉकने आपल्या शहरात मॅकडोनाल्डची फ्रेंचायजी सुरु केली. कमी पैसे, फास्ट सर्विस आणि चांगली डिलिव्हरी यामुळे क्रॉकला चांगला नफा मिळू लागला.

पुढे क्रॉक मॅकडोनाल्ड बंधूंकडे अजून एक फ्रेंचायजी मागायला गेला तेव्हा मॅकडोनाल्ड बंधूंनी त्याला हे सांगून नकार दिला कि,

आता आमच्याकडे भरपूर पैसे आहेत आणि आम्हाला काम करण्याची गरज नाही, फक्त फ्रेंचायजी ,मागत फिरण्यापेक्षा आणि फूड चेन वाढवत हिंडण्यापेक्षा तू डायरेक्ट आमची कंपनीचं विकत घे आणि स्वतःच्या मनाप्रमाणे तो व्यवसाय वाढव.

क्रॉकला मॅकडॉनल्डच्या बर्गर मध्ये भविष्यातला नफा दिसत होता त्याने १९६१ मध्ये २.७ मिलियन डॉलर आणि सोबत वर्षाला होणारा फायदा असं सगळं समीकरण मॅकडोनाल्ड बंधूंसोबत जुळवत ती कंपनी विकत घेतली. इथून क्रॉकने फास्ट फूड चेन जी वाढवली ती आजवर थेट ११९ देशांमध्ये पोहचली आहे. 

शहरा शहरांमध्ये मॅकडोनाल्डचे दिसणारे आउटलेट्स हे लोकप्रियतेचे लक्षण आणि लोकांची वाढती मागणी याचं स्वरूप आहे. आज घडीला लाखो नाही तर करोडो रुपयांमध्ये मॅकडोनाल्ड व्यवसाय करते आहे. जगातली सगळ्यात मोठी फूड चेन आज मॅकडोनाल्डची आहे. अनेक लोकांना रोजगार मॅकडोनाल्डमुळे मिळत आहे.

रिचर्ड आणि मॉरिस या दोन भावंडानी एका साध्या हॉटेलपासून सुरु केलेला प्रवास रे क्रॉकने जगभर पोहचवला.

मॅकडीचा बर्गर आणि कॉफी हे तरुणाईचं फेव्हरेट कॉम्बिनेशन आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.