श्रीमंतांचं स्टेटस सिम्बॉल असणारं झारा, जाहिरातीवर शून्य रुपये खर्च करून ही टॉप ब्रँड बनलंय

‘झारा पे विंडो शॉपिंग करने से कुछ नही होता, उसके लिए ओकात चाहिए’ हा डायलॉग आपण रिल्स व्हिडिओतून बऱ्याचदा ऐकलाय. कारण झारा मुळातचं कपडा इंडस्ट्री मधला सगळ्यात महागडा ब्रँड. जो क्वचितचं सामान्य माणसाला परवडू शकेल.

झारा कपड्यांचा सर्वात महागडा ब्रँड पैकी एक आहे. आता महागडा असला तरी सुद्धा त्याचे फॅनही बरेच आहेत. कारण झारा म्हंटलं की क्वालिटी आणि क्वालिटी म्हंटलं की ब्रँड. आणि चांगल्या गोष्टींसाठी पैसे तर मोजावेचं लागतात ना भिडू. पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे या ब्रँडने कधीही आपल्या फेमसाठी जाहीरातींची मदत घेतली नाही.

आता तुम्ही विचार करत असाल ब्रँड एवढा मोठा आहे म्हंटल्यावर, तो माणूसही मोठा असणारं, पण तसं नाहीये भिडू कंपनीला ब्रँड बनवणारा साधा सूधा मजूराचा मूलगा होता.

त्याचं नाव म्हणजे अमॅनशिओ ऑर्टेगा.

28 मार्च 1936 रोजी स्पेनमधील एका छोट्या शहरात त्यांचा जन्म झाला. 4 भावंडं आणि आई – वडील अशा कुटूंबात वाढलेले अमॅनशिओ यांच्या कुटुंबाची आर्थिक परिस्थिती बेताची होती.

अमॅनशिओचे वडील एक रेल्वेमार्ग कामगार होते.त्यांच्या वडिलांच्या बदलीमुळे, संपूर्ण कुटुंब स्पेनच्या ला कोरूना येथे स्थलांतरित झाले, जिथे त्यांचे कुटुंब रेल्वे कामगारांच्या क्वार्टरमध्ये राहायचे. वडिलांचा पगार खूपच कमी होता, त्यामुळे त्यांची आई लोकांच्या घरी कामाला जायची.

घरची ही बेताची परिस्थिती पाहताचं अमॅनशिओ यांनी आपली शाळा सोडली आणि एका शर्ट बनवणाऱ्या कंपनीत काम करायला सुरुवात केली, सुरुवातीला अमॅनशिओ लोकांच्या घरी शर्ट पोहोचवावे जायचे. नंतर काम करता करता ते तिथे कपडे शिवायला शिकले आणि दुकानात येणार्‍या ग्राहकांना मॅनेज करायला सुद्धा.

इथं काम करत असताना जेव्हाही अमॅनशिओला मोकळा वेळ मिळायचा, तेव्हा ते दुकानदारांनी टाकलेल्या कपड्यांच्या डिझाईनमध्ये काही बदल करून नवीन आणि स्वस्त कपडे बनवायचे आणि नंतर ते कपडे काही दुकानात विकायचे. हळूहळू त्यांच्या कपड्यांना मार्केट मधून चांगली मागणी येऊ लागली. ज्यानंतर त्यांनी स्थानिक महिलांना सोबत घेतले आणि एक सहकारी संस्था स्थापन करून त्यांना संघटित करण्यास सुरुवात केली.

सुरुवातीला त्यांच्या उत्पादनांमध्ये महिलांचे अंतर्वस्त्र आणि नाईट गाऊन होते अमॅनशिओ ने महिलांना खूप चांगले काम करण्याचे वातावरण दिले आणि काही वेळातच त्यांच्या कपड्यांची डिमांड वाढली.

आपल्या कपड्यांची वाढती डिमांड बघता अमॅनशिओ यांनी 11 -12 वर्षांच्या अनुभवानंतर 1975 मध्ये पहिले रिटेल स्टोर सुरू केले, ज्याचं नाव ठेवलं जोरबा (ZORBA). जोरबा अमॅनशिओ आणि त्यांच्या बायकोच्या आवडत्या चित्रपटाचे नाव होते.

पण, अमॅनशिओ यांना समजले की, जोरबा नावाने आधीचं एक बार त्या एरियात आहे. त्यानंतर त्यांनी आपल्या स्टोअरचं नाव बदलून झारा (ZARA) ठेवलं. जेणेकरून लोकं कफ्यूज होऊ नये.

हळू -हळू लोकांना या ब्रँडचे कपडे आवडत होते .1983 पर्यंत त्यांचा ब्रॅण्ड रिटेल शोरूममध्ये संपूर्ण स्पेनमध्ये पसरला होता, त्यांचा ब्रँड यशाच्या पायऱ्या चढत होता.

झारा हा सक्सेस पाहून 1988 मध्ये, झाराच्या आंतरराष्ट्रीय विस्तारासाठी INDITEX ग्रुपची स्थापना करण्यात आली आणि यामुळे झाराची आंतरराष्ट्रीय कीर्तीची सुरुवात झाली. त्यांनी ORCH GUL मध्ये त्यांचे पहिले रिटेल स्टोअर उघडले.

त्यानंतर 1998 मध्ये लंडनमध्ये झारा स्टोअर उघडले. इंडिटेक्स ग्रुपच्या रिटेल पोर्टफोलिओ अंतर्गत नव – नवीन ब्रँड देखील लॉन्च करण्यात आले आणि काही जुने ब्रॅण्ड देखील खरेदी केले आणि त्यांच्या स्वतःच्या ब्रँडमध्ये स्थापित केले. यात 1991 मध्ये PULL & BEAR , Massimo Dutti, Stradivarius, Bershka आणि 2004 मध्ये Oysho आणि Zara Home देखील बाजारात आणले गेले.

अमॅनशिओच्या यशाचे कारण म्हणजे त्यांची बिजनेस टेक्नीक ज्यात 2 गोष्टी मेन आहेत.

पहिलं म्हणजे, ग्राहकांना जे हवे आहे ते द्या, त्यांची मागणी लवकरात लवकर पूर्ण करा, उदाहरणार्थ, दरवर्षी सुमारे 12000 डिझाईन्स झारामध्ये विकसित आणि वितरित केली जातात, याव्यतिरिक्त, झारा प्रत्येक आठवड्यात त्यांच्या स्टोअरमध्ये स्टॉक बदलते, ज्यामुळे त्यांचे ग्राहक त्यांच्या दुकानात वारंवार भेट देतात.

झारा त्यांच्या बेस्ट सेलिंग डिझाईन्स पुन्हा विकत नाही आणि ते बहुतेक डिझाईन्स लिमिटेड स्टॉकमध्ये ठेवतात. त्यामुळे ग्राहक नव्या स्टोकची वाट न बघता आहे तो माल पटकन उचलतात.

आज INDITEX चे 88 देशांमध्ये 7000 पेक्षा जास्त रिटेल शोरूम आहेत आणि सुमारे 137000 कर्मचारी कार्यरत आहेत.

सांगून पटणार नाही पण एवढी मोठी फॅशन चेन चालवणारे अमॅनशिओ ऑर्टेगा नेहमी कॅज्युअल कपड्यांमध्ये राहतात. अमॅनशिओ यांना फेम अजिबात आवडत नाही. 40 वर्षे त्यांनी आपले वैयक्तिक आयुष्य गुप्त ठेवले आणि ही गुप्तता राखण्यासाठी त्यांनी लाखो डॉलर्स खर्च केले.

अगदी 1999 पर्यंत, त्याचे कोणतेही फोटो इंटरनेटवर किंवा मीडियावर सार्वजनिकरित्या शेअर केले गेले. त्यामुळेचं बहूधा त्यांनी त्यांच्या ब्रँडला सुद्धा जाहिरातींच्या झगमगाटापासून दूर ठेवले होते.

2016 मध्ये 2- 3 त्यांनी जगातील सर्वात श्रीमंत लोकांच्या यादीत बिल गेट्सलाही मागे सोडले होते.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.