सर्व्हेतून समोर आलंय, भारतीय महिलांचे पुरुषांपेक्षा जास्त सेक्स पार्टनर्स आहेत

‘Sex is a personal thing’ म्हणजे सेक्स ही खूपच वयक्तिक गोष्ट आहे, असं म्हटलं जातं. म्हणजे तुम्ही  सेक्स वयाच्या कोणत्या वर्षी करता? कोणत्या वेळी करता? त्यासाठी पार्टनर म्हणून कुणाला निवडता? या सगळ्या खाजगी गोष्टी आहेत आणि त्याचा निर्णय घेण्याचा पूर्ण हक्क तुम्हाला आहे. 

यामध्ये किती सेक्स पार्टनर ठेवायचे हा देखील तुमचा निर्णय आहे. पण हा मुद्दा निघतो तेव्हा पुरुष असा प्रकार करत असतील, अशी अनेकांची प्रतिक्रिया असते. महिला सेक्स बाबतीत पुरुषांपेक्षा जास्त लॉयल असल्याचं बोललं जातं. 

पण तथ्य तपासणाऱ्या सर्वेचं नेमकं उलटं म्हणणं आहे. 

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणात महिला आणि पुरुषांच्या लैंगिक संबंधांबाबत एक गोष्ट समोर आली आहे. सर्वेक्षणानुसार भारताच्या ११ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पुरुषांच्या तुलनेत स्त्रियांमध्ये एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर असल्याचं उघडकीस आलंय. 

काय म्हटलंय या सर्व्हेमध्ये? सविस्तर बघूया… 

राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षण (NFHS) हा भारतातील कौटुंबिक गोष्टींवर केला जाणारा सर्वे आहे. संपूर्ण भारतभर हा सर्वे केला जातो. यामध्ये जननक्षमता, अर्भक आणि बालमृत्यू, फॅमिली प्लॅनिंग, आणि आणि बाळाचं आरोग्य, प्रजनन आरोग्य, पोषण, अनेमिया, आरोग्य व कुटुंब नियोजन सेवांचा उपयोग आणि गुणवत्ता याचा समावेश असतो. 

सर्वेक्षणद्वारे या सर्व गोष्टींचा अभ्यास देश आणि राज्य पातळीवर केला जातो आणि त्याची माहिती उपलब्ध करून दिली जाते. १९९२-९३ मध्ये पाहिलं सर्वेक्षण केलं गेलं होतं.

नुकताच २०१९ ते २१ दरम्यान करण्यात आलेल्या या सर्वेचा रिपोर्ट समोर आला आहे. देशातील २८ राज्ये आणि ८ केंद्रशासित प्रदेशांमधील ७०७ जिल्ह्यांचा अभ्यास यात करण्यात आला आहे. यामध्येच सेक्स पार्टनर्स बद्दलचं आश्चर्यात पडणारं तथ्य समोर आलं आहे. 

६५० पानांच्या या सर्व्हेची विभागणी १५ भागांत करण्यात आली आहे. यातील १३ व्या भागात HIV/AIDS संबंधित माहिती देण्यात आली आहे. त्यामध्येच ‘मल्टिपल सेक्स पार्टनर्स’ हा विषय कव्हर करण्यात आला आहे.

१.१ लाख महिला आणि १ लाख पुरुषांमध्ये घेण्यात आलेल्या सर्व्हेमध्ये असं दिसून आलंय की महिलांमध्ये एकापेक्षा अधिक सेक्स पार्टनर ठेवण्याचं प्रमाण जास्त आहे.

राजस्थान, हरियाणा, चंदीगड, जम्मू-काश्मीर, लडाख, मध्य प्रदेश, आसाम, केरळ, लक्षद्वीप, पुद्दुचेरी आणि तामिळनाडू या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमधील महिलांचा त्यात समावेश आहे.

यामध्ये राजस्थान टॉपला असून मल्टिपल सेक्स पार्टनर असलेल्या महिलांचा सरासरी टक्का ३.१ आहे. तर पुरुषांचा एकापेक्षा जास्त सेक्स पार्टनर असलेल्या पुरुषांची सरासरी १.८ टक्के इतकी आहे. 

पण यात एक गोम आहे…

वर्षभरामध्ये भारतातील ४ टक्के पुरुषांनी अशा महिलांसोबत सेक्स केलं आहे ज्यांच्यासोबत ते कधीही राहत नव्हते किंवा त्याच्याशी त्यांचं लग्न होणार नव्हतं. मात्र महिलांच्या बाबतीत याच निकषाचा आकडा कमी आहे. केवळ ०.५ टक्के महिलांनी अशा व्यक्तींसोबत संबंध प्रस्थापित केले आहेत जे त्यांच्यासाठी पूर्णतः अनोळखी आहेत.

शहरी महिलांच्या तुलनेत ग्रामीण भागातील महिलांमध्ये मल्टिपल सेक्स पार्टनर्स असण्याचा आकडा मोठा आहे. ग्रामीण भागात मल्टिपल सेक्स पार्टनर असणाऱ्या महिलांची टक्केवारी आहे १.८% तर शहरात मल्टिपल सेक्स पार्टनर असणाऱ्या महिलांचा टक्का आहे १.५.

पुरुषांच्या बाबतीत देखील हीच परिस्थिती आहे. ग्रामीण भागात मल्टिपल सेक्स पार्टनर असणाऱ्या पुरुषांची टक्केवारी आहे २.३% आणि शहरी भागात १.७% असा आकडा आहे.

यामुळे एक गंभीर समस्या उद्भवत असल्याचं देखील सर्व्हेतून समजतंय.

गेल्या १२ महिन्यांत, मल्टिपल सेक्स पार्टनर असलेल्या महिला आणि पुरुषांत मोठी रिस्क घेत सेक्स केलं आहे. ५७% महिलांनी आणि ६०% पुरुषांनी  सेक्स करताना काँडम्सचा वापर केलेला नाहीये.

यामध्ये पुरुषांबद्दल बोलायचं झालं तर, गेल्या १२ महिन्यांमध्ये इतर महिलेशी सेक्स करणाऱ्या पुरुषांनी ‘पेड सेक्स’ म्हणजेच पैसे देऊन सेक्स केलं आहे. यामध्ये डिवोर्स झालेले, वेगळे झालेले, विधुर म्हणजे ज्यांच्या बायका वारल्या आहेत, अशा पुरुषांची संख्या जास्त आहे.

त्यामुळे सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस पसरण्याची शक्यता वाढली आहे.

तर अजून एक फॅक्ट म्हणजे… सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेसमुळेच कित्येक विवाहित महिलांनी त्यांच्या पतीसोबत सेक्स करण्यास नकार दिला आहे. ८७% महिलांनी त्यांच्या पतींना सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीज असेल तर सेक्सला नकार दिला आहे. त्यांनी फक्त तेव्हाच होकार दिला आहे जेव्हा त्यांचे पती काँडम वापरायला तयार असतील. 

विवाहबाह्य संबंध ठेवण्याचा आकडा बघितला तर याबाबतीत पुरुष आघाडीवर आहेत. ३.६ टक्के पुरुष असे आहेत जे आपल्या पत्नीची फसवणूक करून अन्य महिलांशी संबंध ठेवतात. त्याचबरोबर महिलांच्या बाबतीत हा आकडा ०.५ टक्के इतका कमी आहे.

या सर्वेक्षणातून मल्टिपल सेक्स पार्टनर असल्याची आकडेवारी समोर आली आहे. मात्र सोबतच अनेक तज्ज्ञांनी याबाबत चिंता व्यक्त केली आहे. 

जास्त सेक्स पार्टनर असल्याने सेक्शुअली ट्रान्समिटेड डिसीजेस तर होतातच मात्र याने नंतरच्या आयुष्यात आरोग्याला धोका उद्भवू शकतो. संशोधकांना असं आढळलं आहे की १० किंवा त्याहून अधिक सेक्स पार्टनर असण्यामुळे कॅन्सरचं प्रमाण वाढलं आहे. 

ह्युमन पॅपिलोमाव्हायरस (human papillomavirus) ज्याला एचपीव्ही म्हणून ओळखलं जातं त्याची वाढ होऊन सर्वायकल कँसर, तोंडाचा कँसर, नल कँसर, पेनाइल कँसर यांचं प्रमाण महिला आणि पुरुषांमध्ये वाढत आहे. 

अभ्यासात असंही आढळलं आहे की २० पेक्षा जास्त सेक्स पार्टनर असलेल्या पुरुषांना प्रोस्टेट कँसरचा धोका वाढू शकतो. तर HIV पसरण्याचा धोका देखील जास्त आहे.

म्हणून भिडूंनो, सेक्स पर्सनल गोष्ट आहे मान्य आहे. जास्त सेक्स पार्टनर असणं ज्याची त्याची चॉईस आहे. पण ‘सेफ सेक्स’ ही जबाबदारी आहे.  

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.