अ‍ॅमेझॉनच्या कर्मचारी कपातीत सापडलेल्या भारतीयांपुढे कोणता ऑप्शन असणार आहे?

मागच्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या कंपन्यांमधून अनेक कामगारांची कपात करण्याची सुरूवात झाली आहे. ट्विटर, मेटा याशिवाय अनेक टेक्नॉलॉजी बेस्ड कंपन्यांमधून कामगार कपात झालीये. आता त्यातच जगातली सगळ्यात मोठ्या कंपन्यांपैकी एक असलेल्या अ‍ॅमेझॉन या कंपनीकडूनही आता कर्मचारी कपातीचा निर्णय घेण्यात आलाय.

जगभरात जवळपास पंधरा लाख लोकांना ही कंपनी रोजगार देते.

नोव्हेंबर २०२२ मध्ये कंपनीने दहा हजार नोकऱ्या कमी केल्यात तर आता नव्याने १८,००० ची नोकरकपात करणार आहे.

कंपनी मागच्या काळात आर्थिकदृष्ट्या फार उत्तम काम करत नसल्याने ही कपात करण्यात येणार आहे.

कंपनीचे सीईओ अँडी जॅस्सी यांनी कामगारांना एक नोट लिहीत ही भुमिका मांडलीये. नंतर ही नोट कंपनीकडून जाहीर करण्यात आलीये. या नोटमध्ये जॅस्सी यांनी म्हटलंय,

“अ‍ॅमेझॉनने भूतकाळात अनिश्चित आणि कठीण आर्थिक परिस्थितीचा सामना केला आहे आणि आम्ही ते करत राहू. आता करत असलेले बदल आम्हाला कॉस्ट कटींगसह आमच्या दीर्घकालीन संधींचा पाठपुरावा कराया मदत करतील.”

याशिवाय, ही नोकरकपात मुख्यत: अ‍ॅमेझॉन फ्रेश, अ‍ॅमेझॉन गो यांसारख्या दुकानातील कर्मचाऱ्यांवर होऊ शकते. असंही स्पष्ट करण्यात आलंय.

या नोकरकपातीमुळे एच-१ बी व्हिजा असलेल्या कामगारांवर परिणाम होणार आहे आणि या सगळ्यामध्ये नोकरी जाण्याची शक्यताही एच-१ बी व्हिजा धारकांचीच अधिक आहे.

मुळात हे एच-१ बी व्हिजा काय असतं ते बघुया.

हा एक तात्पुरता व्हिजा आहे. हा व्हिजा नियोक्त्यांना उच्च शिक्षित परदेशी व्यावसायिकांसाठी विशेष व्यवसायात काम करण्यासाठी परवानगी देतो. ज्यासाठी कमीत कमी पदवीचं शिक्षण आवश्यक असतं.

एच-१ बी व्हिजा हा युनायटेड स्टेट्समधील अनेक टेक कंपन्यांकडून परदेशी कर्मचारी नियुक्त करण्यासाठी वापरला जाणारा व्हिजा आहे. हा नॉन-इमिग्रंट वर्क व्हिसा आहे जो अमेरिकन कंपन्यांना तांत्रिक कौशल्याची आवश्यकता असलेल्या विशेष व्यवसायांमध्ये परदेशी कामगारांना कामावर ठेवण्याची परवानगी देतो.

अमेरिकेतल्या जवळपास सगळ्याच टेक कंपन्यांसारखंच अ‍ॅमेझॉन कंपनीमध्येही अधिकतर कामगार हे परदेशीच आहेत. आतापर्यंत तरी कंपनीने कोणत्या कामगारांना कामावरून कमी करणार आहे हे सांगितलेलं नाही १८ जानेवारी पर्यंत ही यादी जाहीर केली जाईल.

२०१८ च्या एका रीपोर्टनुसार जगातलं टेक्नॉजीचं प्रमुख केंद्र असलेलं सिलिकॉन व्हॅली या ठिकाणी ७०% टक्के लोक हे परदेशीच आहेत.

आता या सगळ्या परिस्थितीमुळे एच-१ बी व्हिजा असलेल्या अ‍ॅमेझॉन कंपनीमध्ये काम करत असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी ही चिंतेची बाब आहे. मुळातच अमेरिकेतला कायमस्वरुपीचा व्हिजा यांच्याकडे नसतो. हा एच-१ बी व्हिजा कंपनीत काम करत असलेल्या लोकांना कर्मचारी म्हणून दिला जातो.

नोकरी जाण्याचा थेट अर्थ हा व्हिजाही जाणार असा होतो.

नोकरी गेल्यानंतर या कर्मचाऱ्यांपुढे काही पर्याय असतील.

आता नोकरी गेली म्हणजे समोर काहीच पर्याय उरला नाही असं नसणार आहे. या कर्मचाऱ्यांसमोरही काही पर्याय असणार आहेत.

सगळ्यात पहिली बाब म्हणजे आज कामावरून कमी केलं म्हणजे लगेच उद्या देश सोडावा लागेल असं नाहीये. नोकरी गेल्यानंतरही ६० दिवस म्हणजेच २ महिन्यांचा कालावधी हा या कर्मचाऱ्यांकडे असणार आहे.

या दोन महिन्यात ते दुसऱ्या एखाद्या अमेरिकन कंपनीत नोकरी शोधू शकतात. ही कंपनी जर त्यांना एच-१ बी व्हिजा मिळवून देणार असेल आणि त्यांच्या व्हिजा साठी खर्च करणार असेल तर, हे लोक अमेरिकेत राहू शकतील.

दुसरा पर्याय असेल तो म्हणजे, अमेरिकेतलं त्यांचं वास्तव्य वाढवायचं असेल तर , हे लोक त्यांचा एच-१ व्हिजा बी-१ किंवा बी-२ मध्ये बदलून घेण्यासाठी अप्लाय करू शकतात. ज्यामुळे त्यांंचं या ठिकाणचं वास्तव्य त्यांना वाढवता येऊ शकेल.

पण बी-२ किंवा बी-२ ची मागणी त्यांना ६० दिवसांचा कालावधी सुरू होण्याआधी करावी लागेल.

या सर्वांशिवाय शेवटचा पर्याय असेल तो म्हणजे भारतात परतणं. जे की, सहज शक्य होणार नाही त्यामागचं कारण म्हणजे, परदेशी विशेषत: अमेरिकेत काम करत असलेले बरेचसे भारतीय हे अनेक जबाबदाऱ्यांखाली असतात आणि अश्या परिस्थितीत अमेरिकेतून भारतात परत येऊन डॉलरच्या तुलनेत रुपयांमध्ये कमाई करून जबाबदाऱ्या पार पाडणं कठीण जाईल.

आता १८ जानेवारीला कोणत्या कामगारांची कपात होतेय याची यादी जाहीर झाली की, त्यातले किती भारतीय आहेत हे चित्र ही स्पष्ट होईल.

हे ही वाच भिडू:

Leave A Reply

Your email address will not be published.