सोसायटीवाल्यांच्या त्रासाला वैतागून त्या म्हणाल्या, “मी सेक्स रॅकेट चालवत नाही.”

कोरोना येईल जाईल, सत्ता येतील जातील पण सोसायट्या टिकल्या पाहीजेत. परवानग्या टिकल्या पाहीजेत. प्रत्येक गोष्टीत आडवं लावणारी लोकं टिकली पाहीजेत. जगातली सगळ्यात ताप देणारी माणसं म्हणजे सोसायटी मधले लोकं.

खासकरून तुम्ही बॅचलर असाल तर हे सोसायटीतले लोक तुमच्याकडे आतंकवादी लोकांसारखं बघतात. साधी गाडी एका स्टॅण्डवर लावली तरी बोंबलत विचारायला येतात. फ्लॅट सिस्टीमच्या प्रकारात राहणं म्हणजे पणवती असते पणवती…!!

झालं सोसायटी या संकल्पनेवरती आमचं पर्सनल फस्ट्रेशन काढून झालेलं आहे. आत्ता मुळ मुद्द्यावर येतो. तर मुद्दा असा आहे की या असल्या सिस्टीमचा त्रास होणारे नेहमीच बॅचलर, कोरे करकरीत तरुण-तरुणी किंवा एखादे गरिब कुटूंबच असेल अस नाही.

बाहेरच्या जगात प्रचंड फॅन फॉलोईंग असणाऱ्या किंवा मान असणाऱ्या लोकांना देखील सोसायटीवाले जमिनीवर आणू शकतात..

हेच सांगणारा हा किस्सा…

दिप्ती नवल ही खूप मोठ्ठी अभिनेत्री. त्यांचा एक जूना पिक्चर आहे चष्मे बद्दूर. हा पिक्चर १९८१ साली रिलीज झालेला. हा सिनेमा सई परांजपे यांनी डायरेक्ट केलेला. या सिनेमात फारूख शेख देखील होते. यापूर्वी सई परांजपे यांच्या स्पर्श सिनेमाला नॅशनल अवॉर्ड मिळाला होता.

त्यानंतर ठिक ३२ वर्षांनंतर म्हणजे २०१३ साली चष्मे बद्दूरचा रिमेक चष्मे बहादूर रिलीज होणार होता. यात दिप्ती नवल यांच्या जागी तापसी पन्नूने. तर पिक्चर डेव्हिड धवनने डायरेक्ट केलेला. तसा हा पिक्चर पुर्णपणे ऑफिशियल रिमेक होता.

पण याचवेळी एक घोळ देखील झालेला. तो म्हणजे नव्या चश्मे बहाद्दूर सोबतच जूना आणि ओरिजनल चश्मे बद्दूर देखील रि-रीलिज होणार होता. थोडक्यात वाद-विवाद होण्याची चिन्ह होती.

या वेळी काही पत्रकार दिप्ती नवल यांची मुलाखत घेण्यासाठी त्यांच्या मुंबईतील ओशियेनिक अपार्टमेंट च्या सहाव्या मजल्यावर गेले होते. त्याचवेळी त्यांच्यासोबत फारूख शेख देखील उपस्थित होते.

ठरल्याप्रमाणे पत्रकार त्यांची मुलाखत घेवू लागले. सगळं काही सुरळीत चालू होतं. इतक्यात सोसायटी वाल्यांची धाड पडली. त्यांच्या मते आमच्या परवानगीशिवाय इथे सिनेमाचं शुटींग होवू शकत नाही. यावर दिप्ती नवल यांनी सोसायटीवाल्यांना समजावून सांगितलं की ते फिल्मचं शुटिंग वेगळं आणि ही न्यूज चॅनेलची मुलाखत वेगळी. ही छोटीशी आहे. पटकन होते…

पण आत्ता इगोचा प्रश्न होता. सोसायटीवाले म्हणाले, न्यूज चॅनेलचं पण शुटींग चालणार नाही. सोसायटीची परवानगी घेतली का त्यासाठी. दिप्ती नवल यांनी हरएक प्रयत्न करुन सोसायटीवाल्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न केला पण पालथ्या घड्यावर पाणी पडलं.

अखेर न्यूज चॅनेल वाले तिथून गेले. मुलाखत झाली नाही..

पण यावर दिप्ती नवलं यांचा प्रचंड भ्रमनिरास झाला. आपल्या सोसायटीतील लोक आपल्यासोबत असे वागतील असं त्यांना वाटलं नव्हतं. दूसऱ्या दिवशी टाईम्स ऑफ इंडियात बातमी छापून आली. त्याची हेडलाईन होती,

मी वेश्याव्यवसायाच रॅकेट चालवत नाही : दिप्ती नवल..

या मुलाखतीत त्या म्हणाल्या होत्या,

मी ३० वर्षांपासून इथे राहते. मी जेव्हा इथे रहायला आले होते तेव्हा कोणच्यात हिंम्मत नव्हती. मी यापूर्वी देखील अनेकदा इथे प्रेस कॉन्फरन्स घेतल्या आहेत. पण आजवर पहिल्यांदा मला अस वाटलं की मी एखादं वेश्यालयच चालवत आहे. मला पहिल्यांदा लाज वाटली…

थोडक्यात काय तर आपली बॅचलर लाईफ काहीच नाही, हे सोसायटीवाले एकत्र आले की कुणालापण नडू शकतात.

Leave A Reply

Your email address will not be published.