लसीकरणात मुंबई पहिला तर हिंगोली शेवट ; कोणता जिल्हा कितव्या क्रमांकावर….

कोण पुढाय आणि कोण मागाय…

कसय आपल्या आपल्या एक निकोप स्पर्धा पाहीजे. लसीकरणात महाराष्ट्र पुढाय म्हणून काखा फुगवताना महाराष्ट्रात कोण पुढाय आणि कोण मागाय हे पण बघितलं पाहीजे. म्हणूनच हा विषय मांडावा म्हणलं…

थोडक्यात काय तर दिनांक ६ मे अखेर कोणता जिल्हा लसीकरणाच्या बाबतीत पुढं गेलाय आणि कोणता अजून गडांगळ्याचं खातोय हे बघितलं पाहीजे. त्या त्या जिल्ह्यातल्या पालकमंत्र्यांना या बाबतीत प्रश्न विचारले पाहीजेत. आपला जिल्हा पुढं कसा जाईल याचा आढावा घेतला पाहीजे. एकदा इर्ष्या सुरू झाली की पुढचं काम आपोआप होत असतय.

असो तर लसीकरणात महाराष्ट्र कुठाय ते आधी बघुया…

आता पर्यंत लसीकरणाच्या बाबतीत महाराष्ट्र टॉपला पोहचलाय.  ७ मे अखेर महाराष्ट्रात १ कोटी ७६ लाख ६६ हजार ११९  जणांचे लसीकरण झाले आहे. तर यातील ३२ लाख २५  हजार ३९५ जणांना दुसरा डोस देण्यात आला आहे. लसीच्या पहिल्या डोस बरोबर दुसरा डोस सर्वाधिक नागरिकांना देणाऱ्या राज्यामध्ये महाराष्ट्र पहिला आहे. यातील १ कोटी ५७ लाख ११ हजार २०० हे कोव्हीशिल्ड डोस तर उर्वरित १९ लाख ५४ हजार ९१९ डोस हे भारत बायोटेकच्या कोव्हॉक्सिनच्या  आहेत. 

पण महाराष्ट्रात कोणते जिल्हे लसीकरणात सर्वात पुढे आहेत…

या प्रश्नाचं उत्तर शोधताना सर्वात पहिला क्रम लागतो तो मुंबईचा. मुंबईची लोकसंख्या जास्त असल्याने लसीकरणाचे प्रमाण देखील अधिक असणे साहजिक आहे. मुंबईत लस घेणाऱ्यात सर्वाधिक प्रमाण जेष्ठ नागरिकांच आहे. ७ मे अखेर २६ लाख ६० हजार २९१ जणांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. हे प्रमाण महाराष्ट्रातील इतर जिल्ह्यांपेक्षा अधिक आहे.

महाराष्ट्रात सर्वांधिक लसीकरण झालेल पहिले पाच जिल्हे

१) मुंबई : २६ लाख ६० हजार २९१

२) पुणे : २४ लाख २९ हजार ८६०

                                                   ३) ठाणे : १४ लाख ०८ हजार ८२४

४ ) नागपूर : १० लाख ७५  हजार ९८१

५ ) कोल्हापूर : १० लाख २३  हजार ४८३  

लोकसंख्येच्या पातळीवर लसीकरण झालेल्या जिल्ह्यांची यादी पाहिलं तर यामध्ये कोल्हापूरने आश्चर्यकारक नंबर मिळवलेला दिसून येतो. बाकीच्या जिल्ह्यांच पण कौतुक आहेच.

आत्ता सर्वात कमी लसीकरण झालेले पाच जिल्ह्ये कोणते.

१) हिंगोली : ८१ हजार ३७३

२)गडचिरोली : १ लाख ०२  हजार ७८३

३) सिंधुदुर्ग : १ लाख २५  हजार १३७

४) नंदुरबार : १ लाख ५८ हजार ८४९

५) उस्मानाबाद : १ लाख ६६ हजार ९१५

कोणत्या जिल्ह्याचा कितवा नंबर…

 

१) मुंबई : २६ लाख ६० हजार २९१

२) पुणे : २४ लाख २९ हजार ८६०

                                                   ३) ठाणे : १४ लाख ०८ हजार ८२४

४ ) नागपूर : १० लाख ७५  हजार ९८१

   ५) कोल्हापूर : १० लाख २३  हजार ४८३  

६ ) नाशिक : ८ लाख ०९ हजार ९८१

७) सातारा  : ६ लाख ४१ हजार ५५८

                                                 ८)  सांगली : ६  लाख १२  हजार ७७४

९) अहमदनगर : ५ लाख १६ हजार ५०

१०) औरंगाबाद  : ४ लाख ७७ हजार ०५

११)  सोलापूर : ३ लाख ८६ हजार ७१२

१२) जळगाव : ३ लाख ८० हजार ४९७

१३) नांदेड : ३ लाख ५५ हजार ६६

१४) अमरावती : ३ लाख ३६ हजार २९६

१५) बुलढाणा :३ लाख १३ हजार ७८४

१६) यवतमाळ : २ लाख ९० हजार ८९५

१७) रायगड : २ लाख ८७  हजार २१६

१८) लातूर :२ लाख ७६ हजार ६९३

१९) चंद्रपूर : २ लाख ७० हजार ६८४

२०) बीड २ लाख ६९ हजार ९३२

२१) पालघर : २ लाख ६६ हजार ४८९

२२)भंडारा : २ लाख ४६ हजार २५३

२३) वर्धा : २ लाख ४२ हजार २०३

२४) धुळे :  २ लाख २५ हजार ५३०

२५) जालना : २ लाख २३ हजार ६२८

२६) अकोला : २ लाख २३ हजार ४६५

२७) परभणी: १ लाख ९७ हजार ३८३

२८) रत्नागिरी : १ लाख ८७ हजार ७५२

२९) गोंदिया : १ लाख ८६ हजार ९०५

३०) वाशीम : १ लाख ७१ हजार ५३

३१)  उस्मानाबाद : १ लाख ६६ हजार ९१५

३२) नंदुरबार : १ लाख ५८ हजार ८४९

३३) सिंधुदुर्ग : १ लाख २५  हजार १३७

३४)गडचिरोली : १ लाख ०२  हजार ७८३

३५) हिंगोली : ८१ हजार ३७३

 

लसीकरणाच्या या स्पर्धेत स्त्री-पुरूष प्रमाण कस आहे.

भारतात इंटरनेट येण्यापूर्वी पासूनच अफवांच पेव आहे. लसीकरणासोबत सुद्धा त्या जोडण्यात आल्या. लस बनविण्यासाठी मांस वापरण्यात येत आहे अशा काही अफवा मध्यंतरी पसरविण्यात आली होती. काही जण लस घेण्याची गरज नाही, कोरोनासारखा रोगच अस्तित्वात नाही अशा पुड्या देखील सोडत आहेत. तर काहीजण लस घेतल्यानंतर कसा कोरोना झाला हे वाढवून चढवून सांगत आहेत.

अशा सर्व अफवांना बाजूला सारत राज्यातील ७६ लाख ५८ हजार ६२४  हे पुरुषांनी तर ६५ लाख ५७ हजार ९९८ महिलांनी तर १ हजार ८४४ इतर जणांनी लस घेतली आहे.

६० वर्षावरील ५७ लाख ४७ हजार ८४४ घेतली लस, ४५ ते ६६ वयोगटातील  ६४ लाख ५३ हजार १६४ जणांचे लसीकरण झाले आहे. ३० ते ४५ वयोगटातील १४ लाख २२ हजार ४१७ तर १८ ते ३० वयोगटातील केवळ ५ लाख ९३ हजार ८९२ जणांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.

इतर राज्यातील परिस्थिती

देशात सर्वाधिक लसीकरण महाराष्ट्रात झाले आहे. त्या पाठोपाठ राजस्थान (१ कोटी ३५ लाख ९७ हजार), गुजरात (१ कोटी ३२ लाख ३१ हजार), पश्चिम बंगाल (१ कोटी १४ ७५ हजार) इतके लसीकरण झाले आहे.

आत्ता सर्वात महत्वाचा मुद्दा तो म्हणजे लस घेण्यासाठी तूम्ही काय कराल..

  1.  www.selfregistration.cowin.gov.in या अधिकृत साईट वर जावे
  2.  Resister / sign in yourself मध्ये तुमचा मोबाईल नंबर टाईप करावा
  3. काही वेळात एक OTP येईल तो तिथे टाका व क्लिक करा
  4. Vaccin Registraction फॉर्म भरा
  5. Schedule Appoinment    वर क्लिक करा
  6. तुम्ही राहत असेल त्या भागातील पिन कोड टाका (उदा.४११०१६)
  7. Session निवडा-सकाळचे किंवा दुपारचे
  8. Vaccin center व तारीख निवडा
  9. Appointment book करून ती confirm करा
  10. लसीकरणाच्या बाबतची सर्व माहिती तुमच्या मोबाईलवर येईल
  11. लसीकरणा बाबत आलेला मेसेज केंद्रावर दाखविणे बंधनकारक आहे. तसेच सोबत ओळखपत्र ठेवावे लागणार आहे. 

लस घ्या आपला नंबर काढा, आपल्या तालुक्याचा नंबर काढा, आपल्या जिल्ह्याचा नंबर काढा, आपल्या राज्याचा नंबर काढा, बाकी देशासाठी तर मोदी आहेतच 😬

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.