राज ठाकरे बोलतात ते बरोबर आहे, सौदी अरेबियानं सुद्धा मशिदीवरच्या भोंग्यांना लगाम लावलाय

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे आपल्या ठाण्याच्या सभेत काय बोलणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं होतं. मशिदीवरच्या भोंग्याबाबत गुढीपाडव्याच्या सभेत त्यांनी केलेल्या वक्तव्यावर ते पुढं काय बोलतात याबाबत लोकांमध्ये उत्सुकता होती.

यावेळी बोलताना ते म्हणाले, ‘मशिदीवरचे भोंगे उतरत का नाहीत? जर बाहेरच्या देशांमध्ये हे शक्य आहे, तर भारतात का नाही?’

राज ठाकरे म्हणाले तसं, खरंच कुठल्या देशानं मशिदीवरच्या भोंग्यांचा आवाज कमी केलाय का?

एका मुस्लीम देशानच या लाऊडस्पीकरच्या आवाजावर लगाम लावलाय. तो देश म्हणजे सौदी अरेबिया

सौदी अरेबियाच्या प्रशासनाने घेतलेल्या या निर्णयाचं सामान्य जनतेने जरी स्वागत केलं असलं तरी, दुसरीकडे मुस्लीम कट्टरपंथी भडकले होते. या विरोधाला उत्तर देताना प्रशासन म्हंटल कि,

हा निर्णय हा लोकांसाठी, त्यांच्या झोपेसाठी गरजेचा आहे.

सौदीचे इस्लामिक प्रकरणाचे मंत्री डॉक्टर अब्दुल लतीफ़ बिन अब्दुल्ला अज़ीज़ अल-शेख यांनी सांगितलं होतं की, सतत येणाऱ्या तक्रारीनंतर हा निर्णय घेण्यात आला आहे. 

मंत्री डॉक्टर अब्दुल लतीफ़ यांनी या निर्बंधांची घोषणा करताना म्हटलं होत कि, मशीदीवर असलेल्या लाऊडस्पीकरचा आवाज जास्तीत जास्त आवाजाच्या एक तृतीयांश  नसावा. त्यांना मिळालेल्या तक्रारीत काही तक्रारी मुलांशी जोडलेल्या होत्या. या तक्रारीत त्यांच्या पालकांनी लिहलं होतं की,

लाऊडस्पीकरच्या मोठ्या आवाजामुळे त्यांच्या मुलांची झोप खराब होते.

लाऊडस्पीकरचा वापर नमाज आणि इकामतसाठी असणार

प्रशासनानं जारी केलेल्या सर्क्युलरनुसार मशीदीवर असलेल्या लाऊडस्पीकरचा वापर फक्त नमाजसाठी बोलवायला आणि इकमत म्हणजे नमाजसाठी लोकांना दुसऱ्यांदा बोलविण्यासाठी केला जाईल. त्यासोबतच स्पिकरचा आवाज जास्तीच्या आवाजाच्या एक तृतीयांश  नसेल. या आदेशात स्पष्टपणे सांगण्यात आलं होतं की, हा आदेश न पाळणाऱ्यांच्या विरोधात प्रशासनाकडून कडक कारवाई केली जाईल.

सौदी अरेबियाचे क्राऊन प्रिन्स मोहम्मद बिन सलमान हे नव्या विचारांचे म्हणून ओळखले जातात. त्यांनी आपल्या देशात जुनाट इस्लामिक नियमन बदलण्यास सुरवात केली होती. महिलाना दिले जाणारे अधिकार देखील वाढवले. या मशिदीवरच्या लाउड्स्पिकरचा आवाज कमी करण्याच्या नव्या निर्णयामागे त्यांचाच हात आहे असंही म्हटलं गेलं. 

सौदीनं जरी केलेल्या या आदेशामागे पैगंबर इस्लाम हजरत मोहम्मद यांचा हवाला दिला होता. मंत्रालयानं सांगितलं होतं की,

“सौदी प्रशासनाचा हा आदेश पैगंबर-ए-इस्लाम हजरत मोहम्मदच्या सूचनेवर आधारित आहे.”

सौदीनं आपल्या आदेशात असाही तर्क दिला होता की, मशिदीत इमाम नमाज सुरु करणार आहेत, हे मशिदीत असणाऱ्या लोकांनाच समजले पाहिजे, ना की आसपास घरात राहणाऱ्या लोकांना. हा कुराण शरीफचा अपमान आहे कि, तुम्ही त्याला  लाऊडस्पीकरवर चालवाल, मग ते कोणी ऐकलं नाही तर नाही ऐकणार.

दरम्यान सौदीच्या अनेक मोठ्या जाणकारांनी या आदेशाला योग्य म्हटलं होतं, तर लोकसंख्या याच्या विरोधात होती. सोशल मिडीयावर याविरुद्ध अभियान सुद्धा सुरू झालं. यासंबंधित हॅशटॅग मोठ्या प्रमाणात ट्रेंड झाले.  लोकांच्या म्हणण्यानुसार हॉटेलं, कॅफे आणि बाजारात मोठ्या आवाजात वाजणाऱ्या म्युझिकवर सुद्धा हा निर्बंध असायला पाहिजे.  

विरोध करणारे सौदीचे दुश्मन 

याला उत्तर देताना इस्लामिक व्यवहार मंत्री डॉ. अब्दुल लतीफ बिन अब्दुल्ला अजीज अल-शेख एका निवेदनात म्हटले होते,

“ज्यांना नमाज पठन करायचीये,  ते तसेही अजान (इमामचे आवाहन) ची वाट बघत  नाहीत. तसेच, सरकारच्या निर्णयावर टीका करणारे हे सौदी अरेबियाच्या राज्याचे शत्रू आहे आणि ते लोकांना भडकण्याचे काम करतायेत.”

दरम्यान,  वेगवेगळ्या देशात  लाऊडस्पीकरवर अजान देण्याचे नियम वेगवेगळे आहेत.

उदाहरणार्थ, तुर्की आणि मोरोक्कोसारख्या देशांमध्ये लाउडस्पीकरद्वारे अजान देणाऱ्या फार क्वचित  मशिदी आहे. तर नेदरलँड्समध्ये फक्त सात ते आठ टक्के मशिदी लाउडस्पीकरद्वारे अजान देतात.

नेदरलँड्स, जर्मनी, स्वित्झर्लंड, फ्रान्स, युनायटेड किंगडम, ऑस्ट्रिया, नॉर्वे आणि बेल्जियम सारख्या देशांसह जगातील बऱ्याच  देशांत अजानची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.

लाऊडस्पीकरवरून वाद

मागच्या काही वर्षांत, जर्मनीत अजानविरूद्ध सर्वात भयंकर निषेध पाहायला मिळाला. खर तर इथं तयार होणाऱ्या कोलोन सेंट्रल मशिदीच्या बांधकामाच्या वेळीच आसपासच्या लोकांनी अजानबद्दल तक्रार केली होती. लोकांच्या म्हणण्यानुसार, मशिदीच्या निर्मितीनंतर इथं अजान देण्यात येईल, ज्यामुळे अडचणी निर्माण होतील. मात्र नंतर प्रशासनाने त्यात लाऊडस्पीकरद्वारे अजान दिली जाणार नाही, या वस्तुस्थितीवर मशिद बांधण्यास परवानगी दिली.

इंडोनेशियातही अजानसंदर्भात मोठा वाद समोर आला होता. जगातील सगळ्यात जास्त मुस्लिम लोकसंख्या असलेल्या या देशात अजानच्या वेळी  लाऊडस्पीकरच्या वापराविषयी एका महिलेने तक्रार दिली. यानंतर, तिला तक्रारीबद्दल १८ महिन्यांची शिक्षा भोगावी लागली. त्यानंतर भडकलेल्या जमावाने  १४ बौद्ध मंदिरांना आग लावली होती. मोठ्या घटनेवर कारवाई करत सरकारने मशिदींमध्ये अझानच्या वापराविषयी मार्गदर्शक तत्त्वे जारी केली होती.

३ मे नंतर भारतात जिथं जिथं अजानसाठी भोंगे वाजतील, तिथं हनुमान चाळीसा लावा, असं वक्तव्य राज ठाकरेंनी केलंय. त्यामुळं नेमकं काय होणार याकडे सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष लागलेलं आहे.

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.