हाफिज सईदच्या घराबाहेर बॉम्ब फुटला अन पाकिस्तानचे पंतप्रधान थेट ISI च्या ऑफिसमध्ये गेले..

२३ जूनला पाकिस्तानच्या लाहोर शहरात लष्कर-ए-तैयबा या दहशतवादी संघटनेचा संस्थापक हाफिज सईदच्या घराजवळ मोठा स्फोट झाला. त्याच्या घरापासून  १२० मीटर अंतरावर झालेल्या या स्फोटात ३ जणांचा मृत्यू झाला तर २० जण जखमी झाल्याचं समजतय. स्फोट इतका जोरदार होता की, त्या ठिकाणच्या आसपास असणाऱ्या  इमारतींच्या खिडक्या तुटल्या तर बऱ्याच गाड्यांचं नुकसानही झालं.

स्फोटानंतर मदत व बचाव कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. ज्यानंतर सुरक्षेचा कडक बंदोबस्त करण्यात आलाय. स्फोटात जखमी झालेल्यांना शहरातल्या जिन्ना रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. स्फोटाची जबाबदारी अजूनह तरी कोणी घेतलेली नाही. मात्र यानंतर  पोलिसांनी ठिकाणाला घेराव घातला असून प्रकरणाची तपासणी सुरु केलीये. पाकिस्तानी पंजाबचे मुख्‍यमंत्री उस्‍मान बुजदर यांनी पोलिसांना स्फोटाच्या कारणांचा डिटेल रिपोर्ट मागितलाय.

३० किलो स्फोटकांचा वापर केलाय 

लाहोरच्या जौहर टाऊनमध्ये झालेल्या जोरदार स्फोटानंतर पाकिस्तानच्या पंजाब प्रांताच्या आयजी इनाम घनी यांनी सांगितलं की,

“कारमध्ये ठेवलेल्या स्फोटकांच्या मदतीने हा स्फोट घडवून आणला गेलाय. या भागात एक हाय प्रोफाइल व्यक्तिचे घर देखील आहे. त्याच्या घराबाहेर पोलीस नसती तर  मोठं  नुकसान झालं असत. ”

माहितीनुसार या स्फोटात ३० किलो स्फोटकांचा वापर केला गेलाय. ज्याला तयार करायला विदेशातल्या सामानच वापर केला गेलाय. हा धमाका इतका जबरदस्त होता कि, स्फोटाच्या ठिकाणी ३ फिट खोल तर ८ फूट रुंद असा खड्डा पडलाय.

पाकच्या पंतप्रधानांच्या आयएसआय ऑफिसमधल्या बैठकीचं कनेक्शन

दरम्यान, महत्वाचं म्हणजे या स्फोटाच्या  काही वेळानंतर पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान आपली गुप्तचर यंत्रणा ISI च्या ऑफिसात गेले होते. आयएसआयच्या या हेडक्वाटर्र मध्ये मिटिंग हाईलेव्हलची मिटिंग बोलवण्यात आली, ज्यात इम्रानसोबत आयएसआयचे चीफ लेफ्टनंट जनरल फैज हामिद, पाकिस्तानचे अंतर्गत व्यवहार मंत्री शेख रशीद अहमद, माहितीमंत्री फवाद चौधरी आणि सुरक्षा एजन्सीच्या चीफचा समावेश होता.

आता या बैठकीत नेमकं  काय बोलणं झालं, हे अजून तरी बाहेर आलेलं नाही. पण हाफिजच्या घराजवळ झालेल्या स्फोटाच्या दिवशीच इम्रानचं तिथं जाण्याने अनेक अंदाज बांधले जातायेत.   

त्यातलं एक म्हणजे, असं म्हंटल जातंय कि,  इम्रान खान या स्फोटाला इंटेलिजन्सच अपयश मानतायेत.  ज्यामुळं ते लगेचच आयएसआयच्या ऑफिसात पोहचले.

तर यातच दुसरा संबंध भारताशी जोडला जातोय. आज भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतातील काश्मिरी नेत्यांसोबत महत्वाची बैठक बोलावली होती. आता या बैठकीत काश्मीरचा मुद्दा असणार हे कोणाला पण कळलं. आणि आपले सख्खे शेजारी तर यावर टपूनच बसलेत. पाक या सगळ्या घटनाक्रमावर लक्ष ठेवूनच आहे. नुकताच  काश्मीरसंदर्भात पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांना अनेक पत्रेही लिहिली आहेत, परंतु त्यावर कोणतीही सुनावणी झाली नाही. भारतात सगळं काही ठीक होतंय हे पाहून पाकला धडकी भरत असणारच.  

इम्रानला ‘रॉ’ची भीती

या सगळ्यात अशीही शक्यता वर्तवली जातेय कि, हाफिजच्या घराजवळ झालेल्या स्फोटानंतर इम्रान फार घाबरलाय. त्याला वाटतंय कि, हा स्फोट दुसरं तिसरं कोणी नाही तर भारताची गुप्तचर यंत्रणा रॉ’नी  घडवून आणलाय. 

पाकिस्तानातील काही जण तर थेट ISI वर आरोप करताना दिसत आहेत. आयएसआयला हाफिज सईद जड झाल्यामुळे त्यांनी त्याचा काटा काढण्यासाठी हा बॉम्बस्फोट घडवून आणला असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, या उच्चस्तरीय बैठकी संदर्भात पाकिस्तानच्या पीएमओच्या वतीने निवेदन देण्यात आलयं. ज्यात म्हंटलय  की –

“पंतप्रधान इम्रान खान यांच्या अध्यक्षतेखाली इस्लामाबादच्या आयएसआय सचिवालयात नुकताच स्थापन करण्यात आलेल्या नॅशनल इंटेलिजन्स को-ऑर्डिनेशन (एनआयसी) ची बैठक झाली. “

सांगायचं झालं तर, याच वर्षाच्या जानेवारी महिन्यात NIC ची स्थापना करण्यात आली. ज्यांना पाकिस्तानची गुप्तचर यंत्रणा दुरुस्त करण्याचे काम दिल गेलय.

 या सगळ्यावर पाकिस्तानच्या न्यूज एजन्सीजने असाही दावा केलाय कि, ही बैठक आधीपासूनच ठरवलेली होती.  पण पाकिस्तान काहीतरी खिचडी पकवतय हे नक्की, कारण गेल्या काही दिवसांपासून इम्रान खान सतत इसिस चीफला भेटत आहेत, तर आयएसआयच्या कार्यालयाच्या फेऱ्या पण लावतायेत. 

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.