विरोधकांकडून या चारही खून प्रकरणात नारायण राणे यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येतो

सामनाच्या अग्रलेखातून सलग दुसऱ्या दिवशी भाजप आणि नारायण राणेंवर टीका करण्यात आली.

कालच्या अग्रलेखात म्हटलं आहे की,

नारायण राणे यांना जेवणाच्या ताटावरून उठवले व अटक केली असे त्यांचे लोक बोलत आहेत. कायद्याला, पोलिसांना सहकार्य केले असते तर ही वेळ आली नसती. राणे यांना जेवणावरून उठवणे वाईटच; पण सिंधुदुर्गात श्रीधर नाईक, रमेश गोवेकर, सत्यविजय भिसे, अंकुश राणे यांना जेवणावरून, भरसंसारातून कायमचे कोणी उठवले याचा नव्याने तपास ‘ठाकरे’ सरकारने करायला हवा. असं सामनात म्हटलं आहे.

यानंतर अनेकांकडून प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. या शिवसैनिकांचे नेमके काय झाले. यांच्याबाबत नारायण राणे का बोट दाखविण्यात येत होते.

श्रीधर नाईक

१९९१ मध्ये नारायण राणे कोकणात शिवसेना वाढावी यासाठी प्रयत्न करत होते. २२ जुलै १९९१ रोजी भर दुपारी साडेबारा वाजता कणकवलीच्या बाजारात युवक काँग्रेसचे तरुण नेते श्रीधर नाईक यांचा राजकीय खून होता.

त्यावेळी पोलिसांनी राजकीय वादातून खून झाल्याचे शकत्या वर्तविली होती. पोलिसांनी संशयित आरोपी म्हणून नारायण राणे यांच्यासह काही जणांना अटक केली होती. मात्र न्यायालयात श्रीधर नाईक यांच्या मारेकऱ्यांची पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता झाली.

रमेश गोवेकर

मालवण विधानसभा पोटनिवडणुकीच्या धामधुमीतच शिवसेनेचा रमेश गोवेकर हा कार्यकर्ता बेपत्ता झाला होता. त्यावेळीही राणे यांच्यावरच संशयाची सुई रोखली गेली. गोवेकरांची हत्या झाली असावी असं बोललं जातं.

नारायण राणे शिवसेना सोडून काँग्रेस मध्ये प्रवेश केला होता. त्यामुळे मालवण विधानसभेची पोट निवडणूक घेण्यात येणार होती.या दरम्यान रमेश गोवेकर एक दिवस गायब झाले.

त्यावेळी शिवसेनेकडून राणे यांनीच  रमेश गोवेकर यांचे अपहरण केले असल्याचा आरोप केला होता. तत्कालीन गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी वेळोवेळो सभागृहात तपासाबाबत माहिती दिली. मात्र त्यानंतर काही दिवसा गोवेकर यांचा थांगपत्ता न लागल्याने त्याचा तपास सीबीआयन लाडे देण्यात आला होता. मात्र सीबीआयला सुद्धा यात यश आले नाही.

रमेश गोवेकर यांच्या आईने राणे कुटुंबीवर आरोप केला होता. त्यांनीच रमेशचे अपहरण केले होते असा आरोप केला होता. आता पर्यंत रमेश गोवेकर यांचे काय झाले हे समजू शकले नाही.

सत्यविजय भिसे

२२ नोव्हेंबर २००२ रोजी शिवडाव (ता. कणकवली) येथील राष्ट्रवादीचा तरुण कार्यकर्ता सत्यविजय भिसे याचा कळसुली गावात खून झाला आणि मालवणी मुलुख पुन्हा एकदा सूडाग्नीने धगधगला. सत्यविजय भिसे हे श्रीधर नाईक यांच्या खून प्रकरणातील प्रमुख साक्षीदार होते.

भिसे यांच्या खून प्रकरणात कणकवली येथील राजन तेली याला अटक करण्यात आली होती. राजन तेली हा नारायण राणे यांचा उजवा हात असल्याचा आरोप करण्यात आला होता.

काँग्रेसकडून नारायण राणे याना अटक व्हावी अशी मागणी देखील करण्यात आली होती. त्यासाठी तत्कालीन राज्यपाल यांची भेट सुद्धा काँग्रेसच्या नेत्यांनी घेतली होती.

अंकुश राणे

२००९ च्या लोकसभा निवडणुकीत सिंधुदुर्गातून नारायण राणे यांचे पुत्र नीलेश राणे विजयी झाले होते. या निवडणुकीच्या राजकारणातच राणे यांच्या चुलतभावाचा- अंकुश राणे यांचा खून झाला होता. तेव्हा नारायण राणे सिंधुदुर्गचे पालकमंत्री होते.

अंकुश राणे यांच्या खुनाला शिवसेना जबाबदार असल्याचा आरोप नितेश राणे यांनी केला होता. अजूनही अंकुश राणे यांचे मारेकरी कोण आहेत हे पुढे येऊ शकले नाही.

मात्र विरोधकांकडून या चारही खून प्रकरणात नारायण राणे यांच्यावर संशय व्यक्त करण्यात येतो.

हे हि वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.