खऱ्या आयुष्यात साधाभोळा असणाऱ्या नागार्जुनची लव्हस्टोरीसुद्धा लय भारीय….

अख्ख्या भारताचा डॉन नंबर वन म्हणा किंवा मास अशी ओळख असलेला अभिनेता म्हणजे नागार्जुन. साउथचे सिनेमे बॉलिवूडमध्ये आणि पुढे भारतभर व्हायरल करण्याचं सत्र नागार्जुनमुळे सुरु झालं असं म्हणता येईल. हिरो आणि नंतर प्रोड्युसरसुद्धा तो झाला. मध्ये एक व्हिडिओ व्हायरल झाला होता बघा

तुम मिले दिल खिले और जीने को क्या चाहिये….

या गाण्याच्या व्हिडिओत नागार्जुन आणि त्याची बायको एकमेकांकडे बघतात. या दोघांची लव्हस्टोरी सुद्धा गाण्यासारखीच एकदम बाप आहे.

१९८४ साली नागार्जुनचं पहिलं लग्न झालं होतं ते लक्ष्मी रामानायडू डगुबात्तीसोबत जी साउथचे तगडे प्रोड्युसर डगुबात्ती रामानायडु यांची मुलगी होती. नागार्जुनचे वडील अक्किनेनी नागेश्वरा राव हे डगुबात्ती रामानायडु यांचे चांगले मित्र होते. १९८६ साली नागार्जुन आणि लक्ष्मी यांना नागा चैतन्य नावाचा मुलगा झाला पण पुढे वादविवाद होऊन १९९० साली हे जोडपं वेगळं झालं. 

हा तो काळ होता जेव्हा नागार्जुन बॅक टू बॅक हिट फिल्म्स देत होता. दरम्यान नागार्जुनने अँग्लो इंडियन अभिनेत्री अमला मुखर्जीसोबत बऱ्याच फिल्म्स केल्या. अमला मुखर्जी या इतर अभिनेत्रींपेक्षा वेगळ्या होत्या आणि स्वतःच्या कामाबद्दल त्या खूप पॅशनेट होत्या. नागार्जुन त्यांच्या या स्वयं शिस्तीच्या प्रेमात पडला होता.

एका सिनेमाची शूटिंग सुरु होती, नागार्जुन अमला मुखर्जी यांची वाट बघत बसला होता, बराच वेळ होऊन गेला पण हिरोईन येईना म्हणून नागार्जुनने अमलाला सरप्राईज व्हिजिट देण्याचं ठरवलं जेव्हा तो भेटायला गेला तेव्हा अमला रडत होती. जेव्हा नागार्जुनने कारण विचारलं तेव्हा तिने सांगितलं कि शूटिंगसाठी तिला जो कॉस्चुम देण्यात आला होता तो तिला घट्ट होत होता आणि कम्फर्टेबल नव्हता.

तेव्हा नागार्जुनने तिला सल्ला दिला कि याबाबतीत डिरेक्टरला जाऊन बोल. नागार्जुनच्या म्हणण्यावरून डिरेक्टरने कॉस्चुम बदली केली. नागार्जुनच्या या ऍटिट्यूडवर अमला मुखर्जी इम्प्रेस झाली. एकमेकांची काळजी घेण्याच्या कारणावरून दोघांची जवळीक वाढली आणि ते चांगले मित्र झाले. 

१९९१ साली युनायटेड स्टेटच्या टूरवर नागार्जुनने अमलाला प्रपोज केलं आणि १९९२ यामध्ये अगदी कोणालाही पत्ता लागू न देता या दोघांनी चेन्नईत लग्न केलं. पुढे या दोघांनी एकत्र फार कमी काम केलं पण त्यांची जोडी लोकांमध्ये चांगलीच फेमस झाली होती. आजही नागार्जूनच स्टारडम कमी झालेलं नाही. सिनेमाच्या सेटवर सुरु झालेली हि लव्ह स्टोरी बराच काळ चालली आणि त्या एका घटनेने दोघांचे सूर जुळले आणि त्यांनी लग्न केलं.

फिल्म्सच्या काळात ८ वर्षात नागार्जुन आणि अमला मुखर्जी यांनी तब्बल ५० सिनेमे एकत्र केले होते. २३ वर्षांचा त्यांचा सुखाचा संसार आहे. साऊथमध्ये तर या जोडीची क्रेझ आहेच पण त्यांची लव्हस्टोरी त्याहीपेक्षा जास्त गाजली होती. पुढे नागार्जुन बॉलिवूडमध्ये जास्तच हिट झाला, मेरी जंग वन मॅन आर्मी, डॉन नंबर वन अशा अनेक सिनेमांमधून तो झळकत राहिला. आज साऊथचा मोठा प्रोड्युसर म्हणून नागार्जुनची हवा आहे. 

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.