शिंदे महाराजांच्या भाषणा वेळी सर्वात जास्त घोषणा देण्यात आल्या आणि नेहरू चिडले..

नाव ठेवण्याची एक परंपरा आपल्याकडे असते. एक खरं नाव असतं, एक टोपणनाव असतं अजून भरीस भर म्हणून एखाद पाळण्यातील नाव असतं. म्हणजे इतके नाव असू शकतात. पदव्या नावासमोर लागल्या म्हणजे अजून नाव मोठं आणि भरदार वाटतं पण आजचा किस्स्स आहे शिंदे राजघराण्यातला ज्यात जिवाजीराव शिंदे यांच्या लांबलचक नावामुळे राजमाता विजयाराजे शिंदे नाराज झाल्या होत्या आणि नेहरूसुद्धा या लांबलचक नावामुळे अवाक झाले होते.

राजमाता विजयाराजे शिंदे आपल्या पतीच्या लांबलचक नावामुळे वैतागलेल्या होत्या. ग्वालियरचे महाराजा जिवाजीराव शिंदे यांच्यासोबत विजयाराजे शिंदे यांचा विवाह वयाच्या २२ व्या वर्षी झाला होता. त्याकाळात ग्वालियर राजवटीची चर्चा देशभरात व्हायची इतकी मोठी ती रियासत होती. जिवाजीराव यांची रियासत जितकी मोठी होती त्याचप्रमाणे त्यांचं नावसुद्धा एकदम भरदार होतं. 

आपली बायोग्राफी प्रिन्सेस मध्ये विजयाराजे शिंदे लिहितात, एक साधारण जीवन जगणाऱ्या माणसाच्या नावाच्या मागेपुढे इतक्या पदव्या होत्या कि त्या वाचून त्यांना वैताग यायचा. जिवाजीराव यांनी लेखा दिव्येश्वरी देवी यांच्यासोबत विवाह केला होता पुढे त्यांच नाव विजयाराजे शिंदे झालं.

जिवाजीराव शिंदे यांचं नाव होतं पुस्तकाच्या अनुसार, लेफ्टिनेंट जनरल मुख्तार-उल-मुल्क, अम-उल-इक्तिदार, रफी-उश-शान, वाला शिकोह, मोहरा-शम-ए-दौरा, उम्दत्त-उल-उमराह, महाराजाधिराज, आलीजाह, हिसम-उश-सल्तनत, हिज हायनेस सर जार्ज जीवाजी राव शिंदे बहादुर, श्रीनाथमन्सूर-ए-जमा-फिदवी-हजरत-ए-माली-मुअज्जम-ए-रफीउद-दरजात-ए-इंग्लिशिया, ग्रांड कमांडर ऑफ एम्पायर.

राजमाता लिहितात कि इतकी नाव/ पदव्या असून देखील जिवाजीराव एका सामान्य माणसाप्रमाणे जीवन जगायचे. त्यांचा दिनक्रम घोडे बंदुका आणि स्वतःची देखभाल करण्यात जात असे. पुढे त्या लिहितात कि इंग्रजांसोबत ग्वालियरच्या शासकांनी युती करून आपल्या राजवटीला धोका निर्मण केला होता. इंग्रजांच्या जीवन जगण्याच्या पद्धती बघून जिवाजीराव शिंदे यांची देखभालसुद्धा तशीच व्हायची. याच कारणामुळे जिवाजी यांचं नाव जॉर्जसुद्धा होतं. यामुळे ग्वालियरच्या राजावर इंग्रजांचा मोठा प्रभाव होता. 

जिवाजीराव सिंधीयांचं हे लांबलचक नाव नेहरूंनासुद्धा भोवलं होतं. स्वातंत्र्यानंतर मध्यभारताचं संघटन झालं तेव्हा नेहरू आणि जिवाजीराव शिंदे यांच्या मैत्रीची भरपूर चर्चा झाली. पण नंतर या दोघांच्या मैत्रीमध्ये वितुष्ट यायला लागलं. या किस्स्याचा उल्लेख राजनितीनामा या पुस्तकात आहे.

स्वातंत्र्य मिळाल्यानंतर नेहरूंची लोकप्रियता तुफ्फान वाढली होती. दुरून दुरून लोक नेहरूंच्या सभेला जमत असे. एकदा ग्वालियरमधे एका सभेचं आयोजन करण्यात आलं होतं. या सभेला सरदार पटेल आणि जिवाजीराव शिंदे आणि नेहरू एकत्र आले होते. जसं जिवाजीराव शिंदे भाषणाला उभे राहिले सभेमधून त्यांच्या नावाच्या घोषणा सुरु झाल्या. बराच काळ या घोषणा सुरु होत्या. 

नंतर नेहरू भाषणाला उभे राहिले पण कोणीही घोषणा दिल्या नाही. नेहरूंना हि गोष्ट लागली आणि आपल्या भाषणात ते म्हणाले ग्वालियरचे लोक आजही भूतकाळातच जगत आहेत. नेहरूंची नाराजगी स्पष्ट होती त्यामुळे जिवाजीराव शिंदेसुद्धा नाराज झाले. नंतर त्यांनी नेहरूंना समजावलं कि पुन्हा अशी घटना घडणार नाही.

पुढच्या वेळी जेव्हा भाषण होतं तेव्हा जिवाजीराव यांनी काँग्रेसची माणसं सभेत पेरून ठेवली होती खास घोषणा द्यायला पण नंतर जिवाजीराव शिंदे आणि नेहरूंमध्ये आधीसारखी मैत्री राहिली नाही.

पुढे तर विजयाराजे शिंदे काँग्रेसच्या विरोधात गेल्या. तेव्हापासून सुरु असलेलं नेहरू गांधी घराणे आणि शिंदे घराणे यातील कटू गोड संबंध माधवराव शिंदे, वसुंधरा शिंदे, यशोधरा शिंदे आणि आता ज्योतिरादित्य शिंदे यांच्यातही कायम असल्याचं पाहायला मिळतं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.