बिचाऱ्या अशोक चव्हाणांना दाऊद समजून अमिताभ बच्चनला ट्रोल करण्यात आलेलं..

दाऊद इब्राहिम कासकर. या माणसाला भारत सोडून पळून गेलेल्या आता तीस पेक्षा जास्त वर्षे होऊन गेली. तो जिवंत आहे कि मेलाय हे सुद्धा कोणाला नक्की माहित नाही. पण त्याच्या नावाचं गूढ आजही भारतीयांना खुणावत असतं हे मात्र खरं.

आता झालंय काय हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.  तर विषय तसा काय नवीन नाही, प्रकरण इतिहासातलंच आहे. फक्त त्यात विनाकारण आपले माजी मुख्यमंत्री आणि बॉलिवूडचा महानायक बच्चन शिव्या खाल्लेले.

काळ होता मागच्या लॉकडाऊनचा. लोक निवांत होती. कोरोनाची दुसरी लाट आल्यामुळे घरातून बाहेर पडणं बंद झालेलं. अंबानींच्या कृपेने जिओ जिंदाबाद सुरु होतं. रोजच्या २ जीबी नेटवर चीन सकट अख्ख्या जगाला कोलन सुरु होतं. अशातच सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरण घडून गेलं आणि आपल्या टार्गेटवर आले बॉलिवूड मंडळी.

पिक्चरमध्ये नेपोटीज्म, मुव्ही माफिया, जस्टीस फॉर ssr असे हॅशटॅग ट्रेंड करू लागले. सुशांतला न्याय मिळवून देण्यासाठी आणि बॉलिवूडचे सगळे डार्क सिक्रेट बाहेर काढण्यासाठी अर्नबदा आणि त्यांची टीम टीव्हीवर धुमाकूळ घालत होती आणि इकडे ट्विटर,फेसबुक, इन्स्टा व्हाट्सअप वर ट्रोल आर्मी दंगा करत होती. 

अशातच सोशल मीडिया वरच्या शोध पत्रकारांना एक फोटो गावला. त्यात अमिताभ बच्चन एका गॉगल वाल्या माणसाबरोबर हसून बोलताना दिसत होते. शोध पत्रकार उद्गारले, 

अरे इ बच्चनवा दाऊद इब्राहिम के साथ फुटो खिंचवा रहा है. इस्का दाणापाणी बंद करावा दो.

झालं ट्रोल आर्मी कामाला लागली. बच्चनचा सोशल मीडियावर बाजार उठला. नेपोटीज्मचा बादशहा असलेल्या बच्चनची सगळीकडे छी थू सुरु झाली. खूप वर्षांपूर्वी अनिल कपूर गोविंदा सारखे हिरो दाऊदच्या पार्टीला गेले होते, मंदाकिनी बरोबरच त्याच खास अफेअर हे आपण ऐकून होतो. कधी फोटो बघितलेले पण तो जुना काळ होता.  दाऊद आता पाकिस्तानला पळून गेल्यानंतर बच्चन त्याच्या म्हातारपणात त्याला कसा भेटला हा प्रश्न नेटकऱ्यांना पडला. पण विचार करण्याएवढा वेळ कोणाकडे असतोय. जया बच्चन बॉलिवूडच्या बच्चन फॅमिलीला जोरात ट्रोल सुरु झालं.

सगळी कडे एक फोटो असायचा आणि खाली मेसेज,

‘रिश्ते में तो हम तुम्हारे बाप होते हैं, पर मैं आपका गुलाम हूं।’ दाऊद इब्राहिम और अमिताभ बच्चन की पुरानी तस्वीर (Amitabh Bachchan with Dawood) अब रिलीज हो गई है, तभी तो जया बच्चन बॉलीवुड ड्रग्स कनेक्शन पर तिलमिला गई है! Shame on Amitabh Bachhan! 

c users user desktop amit jpg

अखेर ज्युनिअर बच्चन पुढे आले आणि त्याने सगळं मॅटर क्लियर केला. ट्विटर वर कट्टर हिंदू नावाच्या कोणी तरी बच्चनचा फोटो टाकून शिवीगाळ करत होतं. तिथं अभिषेक बच्चन साहेब आले आणि सांगितलं,

भाईसाहब, ये फोटो मेरे पिताजी और महाराष्ट्र के पूर्व मुख्य मंत्री श्री अशोक शंकरराव चव्हाण (Ashok Shankarrao Chavan) की है।  

 

बिचारा कट्टर हिंदू त्याने पटदिशी हे ट्विट डिलीट करून टाकली. इंटरनेट वर हजारो ठिकाणी फिरत असलेल्या मेसेजला देखील चाप लावण्यात आला. अमिताभ बच्चनला विनाकारण शिव्या घातल्याबद्दल काही जणांना खेद देखील झाला म्हणे.  दाऊद आता कसा दिसतो याची कल्पना नसल्यामुळे बिच्चार्या ट्रॉलर नी आपल्या अशोक चव्हाणांना मधल्यामध्ये विनाकारण दाऊद इब्राहिम बनवलं. 

गंमत म्हणजे हा फोटो आताचा देखील नव्हता, १० वर्षे जुना होता.  

आणखी विशेष गंमत म्हणजे या फोटोवेळी देखील वाद झाले होते आणि बच्चनला शिव्या खाव्या लागल्या होत्या. फक्त या शिव्या काँग्रेसच्या ट्रोल्सनि घातल्या होत्या.

झालं काय होतं २०१० साली अशोकराव चव्हाण मुख्यमंत्री असताना वरळी वांद्रे सी लिंकचं उदघाटन होतं. या कार्यक्रमाला अमिताभ बच्चन देखील हजर होते. तेव्हाच हा फोटो काढला गेला. पण या फोटोवरून काँग्रेस वाले चिडले. बच्चन तेव्हा गुजरातची जाहिरात करत होता. मोदी गुजरातचे मुख्यमंत्री होते. काँग्रेस वाल्यांचे ते शत्रू क्रमांक एक. त्यात बच्चन देखील गांधी घराण्याचा शत्रू. त्याला कस काय कार्यक्रमाला बोलवलं यावरून पक्षात बोंबाबोंब झाली. मुख्यमंत्री अशोक चव्हाणांनी सांगितलं,

मला तर बच्चन या कार्यक्रमाला येणार आहे याची कल्पनाच नव्हती.

मग कार्यकर्ते सांगू लागले निमंत्रण नसताना बच्चन साहेब सी लिंकवर आले होते. खूप गोंधळ झाल्यावर बच्चनने स्पष्टीकरण दिलं कि मला निमंत्रण दिलेलं म्हणून मी या कार्यक्रमाला गेलेलो, मुख्यमंत्र्यांना हि  असणे आवश्यक नाही. माझी कोणीतीही राजकीय मते नाहीत. मी आपल्या राज्याच्या विकासाच्या कार्यक्रमात सहभागी होऊन स्वतःला धन्य मानतोय.

असो. ट्रोल कोणतेही असो, बच्चन त्यांचा लाडका टार्गेट आहे हे नक्की.

हे हि वाच भिडू :

   

   

Leave A Reply

Your email address will not be published.