सिद्धूने राजकारणात राजीनामा दिला कि एकाच व्यक्तीला सगळ्यात जास्त टेन्शन येतं…

रियालिटी शोज आणि त्याचे जजेस हा एक कळीचा मुद्दा आहे. म्हणजे नेहा कक्करचं रडणं आणि अनु मलिकची ऍक्टिंग बघितल्याशिवाय सोबतच एखाद्या रियालिटी शोमध्ये परिवाराची किंवा स्पर्धकाची दुःखद कहाणी सांगणं भागच असतं. अशाच रियालिटी शोजपैकी आणि त्याच्या जजेसपैकी रडण्यापेक्षा जिचं हसणं आपल्या जास्त लक्षात राहतं ती अभिनेत्री म्हणजे अर्चना पुरणसिंग.

अर्चना पुरणसिंग आणि रियालिटी शोज यांचं एक वेगळं बॉण्डिंग आहे. द कपिल शर्मा शोमध्ये आपल्या ती दिसते. यात मजे मजेत असंही म्हटलं जातं कि नवज्योत सिंग सिद्धू यांची जागा अर्चना पुरणसिंगने घेतली. म्हणजे ज्या ज्या वेळी नवज्योत सिंग सिद्धू राजकीय खुर्चीसाठी कॉमेडी शो सोडून गेले त्या त्या वेळी ती जागा अर्चना पुरणसिंग यांनी घेतली. आता राजकारणातून पायउतार होणारे नवज्योत सिंग सिद्धू पुन्हा रियालिटी शोजकडे येतात का आले तर अर्चना पुरणसिंग यांची खुर्ची पुन्हा धोक्यात येईल.

नुसत्या हसण्यावर पैसे मिळणे हे सुद्धा किती महत्वाचं आहे. अर्चना पुरणसिंगचा आवाज आणि तिचं हसणं बघूनच बऱ्याच लोकांना हसू फुटतं. रियालिटी शोजची स्पेशल जज म्हणून ती कपिल शर्मा शो मध्ये आली होती पण नंतर सिद्धू येत नाही म्हणल्यावर त्या पर्मनंट जज झाल्या. अभिनेत्री कमी आणि जज म्हणून अर्चना पुरणसिंग भाव खाऊन गेल्या. पण त्यांचं हसणं प्रेक्षकांच्या जास्त लक्षात राहिलं. फक्त फॅन्स नाही तर तिच्या विरोधकांनासुद्धा तिचा प्रत्येक अंदाज पसंत येत गेला.

अर्चना पुरणसिंग या रियालिटी शो मध्ये येण्याअगोदर सिनेमात जास्त ऍक्टिव्ह होत्या. तर त्यांचा फिल्मी प्रवाससुद्धा जाणून घेऊया. पंजाबी परिवारातून आलेल्या अर्चना पुरणसिंग यांनी मॉडेलिंगच्या नादात कॉलेज अर्ध्यातच सोडून दिलं. अभिनयाचं वेड तर अगोदरपासूनच होतं. करियर बनवण्यासाठी आणि मॉडेलिंगसाठी त्या मुंबईत आल्या.

मुंबईत आल्यावर सहजासहजी त्यांना काम मिळालं नाही यासाठी बराच संघर्ष करावा लागला. पण जाहिरातींमध्ये मॉडेल म्हणून त्यांना बरीच काम मिळू लागली. शेवटी १९८७ साली जलवा या सिनेमातून अर्चना पुरणसिंग यांना ब्रेक मिळाला. हा पहिलाच सिनेमा होता आणि हिरो होते नसिरुद्दीन शहा. पहिलाच सिनेमा अर्चना पुरणसिंग यांना जबरदस्त यश मिळवून गेला. हा सिनेमा तेव्हा बॉक्स ऑफिसवर चांगलाच चालला. या सिनेमामुळे बरीच काम आपल्याला मिळतील अशी आशा अर्चना पुरणसिंगला होती.

पण पहिला सिनेमा हिट जाऊनही अर्चना पुरणसिंगला काम मिळाली नाही. बऱ्याच दिग्दर्शक आणि प्रॉड्यूसर लोकांना त्यांचा अभिनय तितका भावला नाही. कामच मिळेना म्हणून त्यांना बऱ्याच बी-ग्रेड सिनेमाच्या ऑफरसुद्धा मिळू लागल्या. पण बी ग्रेड सिनेमात काम न करता त्यांनी ए ग्रेड सिनेमात त्यांनी सपोर्टींग काम करायला सुरवात केली. साईड रोल सोबतच अर्चना पुरणसिंग यांनी आयटम सोंग सुद्धा केले. 

१९९३ साली अर्चना पुरणसिंग टीव्ही क्षेत्रात उतरल्या आणि वाह क्या सिन है या सिरियलमधून त्या काम करू लागल्या. हि सिरीयल त्या वर्षीची बेस्ट सिरीयल ठरली यानंतर मात्र त्यांची गाडी सुसाट सुटली. जाने भी दो पारो, श्रीमान -श्रीमती अशा अनेक सिरियलमधून त्यांनी काम केलं. नच बलिये, झलक दिख ला जा, कॉमेडी सर्कस, कॉमेडी नाईट्स, कपिल शर्मा शो, अशा बऱ्याच शोजमध्ये त्यांनी काम केलं.

मोहब्बतें, बोल बच्चन, कुछ कुछ होता है,कल किसने देखा है, राजा हिंदुस्तानी, कृष, मस्ती, बड़े दिलवाले, मेने दिल तुझको दिया, होगा तूफ़ान, शोला और शबनम, निकाह, आशिक आवारा, टक्कर, जानशीन अशा बऱ्याच सिनेमांमध्ये त्यांनी काम केलं. आजही बऱ्याच लोकांच्या त्या आवडत्या अभिनेत्री आहे. 

पण आता सिद्धूनी दिलेला राजीनामा बघता या हास्य सुंदरीची खुर्ची धोक्यात आल्याचं बोललं जातंय.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.