साखर आणायला पाठवलेल्या पोरीचं प्रेत गटारात सापडल्याने ऑस्ट्रेलिया हादरलं होतं….

जगभरात नवनवीन गुन्हे घडत असतात, जगण्यामरण्याची शाश्वती नसते,जीव मुठीत घेऊन बेमालूमपणे लोकं आपलं जीवन जगत असतात. पण एखाद्या दिवशी एखादं असं भयानक कांड घडतं की सगळ्यांचेच डोळे खाडकन उघडले जातात. अशीच एक दुर्दैवी घटना घडली होती नोव्हेंबर 1984 ला ऑस्ट्रेलियामध्ये ज्याने ऑस्ट्रेलियन लोकांची झोप तर उडवलीच होती पण जगसुद्धा या घटनेने हादरलं होतं.

6 वर्षांची मुलगी होती कायली मेबरी. त्या 6 वर्षाच्या कायली मेबरीला तिच्या आईने जवळच्या दुकानातून साखर आण म्हणून सांगितलं ती चिमुरडी आपल्याच धुंदीत साखर आणायला निघाली. मोठ्या उत्साहाने ती मुलगी साखर आणायला गेली खरी पण घरच्यांना तिचं थेट प्रेतच सापडलं. दुसऱ्या दिवशी एका गटारात तिचं प्रेत तिच्या घरच्यांना सापडलं होतं.

या अतिशय विचित्र आणि घृणा आणणाऱ्या घटनेने प्रत्येकाच्याच डोक्यात तिडीक गेली की 6 वर्षाच्या मुलीला मारायचं कारण काय ? पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली. पोस्टमार्टेम रिपोर्ट आले आणि मोठा धक्का बसला की अगोदर 6 वर्षाच्या कायली मेबरी बरोबर अगोदर अत्याचार करण्यात आले आणि नंतर तिची हत्या करण्यात आली. पोलिसांच्या तपासाची चक्रे वेगाने फिरू लागली पण काहीच सापडत नव्हतं, ना की एखादा संशयास्पद व्यक्ती सापडत होता.

आजूबाजूला चौकशी करुन झाली पण काहीच फरक पडत नव्हता, आरोपी मोकाट फिरत होता. एका इंग्लिश वृत्तपत्राने याचा घटनाक्रम जाहीर केला होता.

ज्या दिवशी काइली मेबरी गायब झाली:
4:30pm: स्थानिक पबमध्ये मोठ्या स्क्रीनवरील टेलिव्हिजनवर मेलबर्न कप पाहिल्यानंतर, काइली तिची आई आणि शेजारी यांच्यासोबत घरी गेली.
5:15pm: जेव्हा काइली अस्वस्थ झाली तेव्हा ती जवळच्या व्यक्तीच्या वाढदिवसाच्या पार्टीला उपस्थित राहू शकली नाही. असे मानले जाते की तिला साखर खरेदी करण्यासाठी 90 सेंट देण्यात आले होते. ती अनवाणी होती आणि तिने लाल स्किव्ही घातली होती
5:30pm: प्रेस्टनमधील प्लेंटी रोडवरील एका सुपरमार्केटमध्ये सहा वर्षांच्या मुलीने प्रवेश केला पण ती परत फिरताना दिसली नाही.
5:40pm: तिचे शेजारी आणि आई तिच्या ठावठिकाणाबद्दल चिंतित झाले आणि त्यांनी स्टोअरला भेट दिली
7:00pm: परिसरात पोलिसांचा शोध घेण्यात आला
बुधवारी दुपारी १२:४५: काइलीचा मृतदेह टायलर सेंट, प्रेस्टन येथील गटारात सापडला.

या घटनेतला आरोपी सापडलाचं नाही. मग लोकही या केसबद्दल विसरून गेले सगळं माग पडत गेलं आणि 33 वर्ष उलटली. पण पोलिसांनी अचानक भयानकमध्ये या केसचा परत शोध घेण्याचा प्रयत्न केला आणि गोष्टी उलगडून समोर येत गेल्या. साखरेच्या दुकानशेजारी जॉर्ज कॅथी या 75 वर्षाच्या म्हाताऱ्याचं घर होतं. या जॉर्ज कॅथीकडे पोलिसांनी विचारपूस केली.

याचं चौकशीमध्ये जॉर्ज कॅथीचं अजून एक प्रकरण समोर आलं ते म्हणजे कायली मेबरीच्या खुनाच्या अगोदर या जॉर्ज कॅथिने एका 14 वर्षाच्या मुलीवर जीवघेणा हल्ला केला होता पण ती पोरगी थोडक्यात बचावली होती. पण त्या केसमधून तो अलगद बचावला होता कारण त्याच्याविरुद्ध पोलिसांना पुरावेच सापडले नव्हते. याच प्रकरणाचा धागा पकडून पोलिसांनी जॉर्जला टॉर्चर करायला सुरुवात केली.

पुन्हा विचारणा करण्यात आली आणि कॅथीला डीएनए संपलं मागवण्यास सांगितले. कॅथिनेसुद्धा होकार दिला आणि हाच होकार त्याच्या करिअरची माती करून गेला. कॅथी म्हणायचा अगोदरच्या केसमध्ये जर पोलीस मला पकडू शकले नाही तर इतक्या वर्षाच्या नंतर पोलीस मला कस्काय अटक करू शकतील.

कायली मेबरीच्या शर्टवर आढळून आलेलं वीर्य आणि जॉर्ज कॅथी याचा डीएनए मॅच झाला आणि शेवटी उघड झालं की कायली मेबरीवर अगोदर कॅथीने बलात्कार केला आणि तिची हत्या करून तिला गटारात फेकून दिलं होतं. तब्बल 33 वर्षानंतर आरोपी सापडला आणि त्याला शिक्षा ठोठावण्यात आली.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.