युक्रेनवरनं वाद पेटला असताना ,रशिया आणि अमेरिका यांच्यात कोणाची मिलिट्री तगडी आहे

रशिया आणि युक्रेन यांच्यातील वाद आता टोकाला पोहचला आहे. कोणत्याही क्षणाला युद्ध होईल अशी परिस्तिथी आहे. अमेरिकन आपल्या दूतावासाला युक्रेनमधून परतण्यास सांगितलं आहे. याच पार्श्ववभूमीवर व्लादिमीर पुतीन आणि जो बिडेन यांची चर्चा देखील झाली मात्र त्यातून काय महत्वाची फलनिष्पत्ती झाली नाही.

याच कॉल दरम्यान, जो बिडेन यांनी चेतावणी दिलेय की युक्रेनवरील हल्ल्याची “तात्काळ आणि गंभीर किंमत” परिणाम रशियाला भोगावे लागतील

व्हाईट हाऊसच्या म्हणण्यानुसार, जर रशियाने आपल्या शेजाऱ्यावर हल्ला केल्यास युनायटेड स्टेट्स आणि त्याचे सहयोगी रशियाचा बरोबर कार्यक्रम करतील असेही बिडेन म्हणाले. पण तिकडे पुतीन पण अमेरिकेच्या धमक्यांना भीक घालायला तयार नाहीये. याच दरम्यान, पेंटागॉनने अतिरिक्त ३,००० अमेरिकन सैन्य पोलंडमध्ये पाठवण्याचे आदेश दिले आहेत.

त्यामुळं क्युबन मिसाईल क्रायसिस नंतर पहिल्यांदाच अमेरिका आणि रशिया युद्धाच्या एवढया जवळ येऊन ठेपले आहेत. 

 त्यामुळं मग प्रश्न राहतो हे देश एवढी युद्धाच्या वल्गना करतात तर मग यांची मिलटरी पॉवर नेमकी किती आहे. रशिया जरी अमेरिकेएवढा विकसित नसला तरी शस्त्रात्रांच्या तयारीत तो नेहमीच अमेरिकेला टफ फाईट देत आलेला आहे. त्यामुळे मग भिडुने ठरवलं नक्की कोण नेमकं किती पाण्यात आहे ते बघायचं.

सुरवात करूया १४ कोटींच्यावर लोकसंख्या असलेल्या आणि ३३ कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या असेलल्या अमेरिका यांच्या सैनिकांपासून.

 रशियाकडे जवळपास ८,५०००० ऍक्टिव्ह सैनिक आहेत तर अमेरिकेकडे १३५०००० म्हणजे इथे अमेरिकेकडे  जवळपास ५लाखांपेक्षा जास्त सैनिक आहेत. तर रिझर्व्ह सैन्य ही अमेरिकेकडे जवळपास २ लाखांच्या फरकाने जास्त आहे. 

पण आधुनिक युद्धात सैनिकांपेक्षा जास्त महत्व असतं शस्त्रास्त्रांना. त्यामुळं याबाबतीत कोण पुढे आहे, कोणाकडे या आधुनिक हत्यारांचा साठ जास्त आहे ह्यावर बरेच अवलंबून आहे.  

सुरवात करूया एअर पॉवर पासून. पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात ज्या बॉम्बर विमानांनी निर्णायक भूमिका बाजवली होती त्या विमानांची संख्या रशियाकडे १३७ तर यूएसकडे १५७ इतकी आहे. लढाऊ आणि जमिनीवर हल्ला करणारी विमाने रशियाकडे १०२१ तर यूएसए कडे ती तब्बल 3,318 इतकी आहे.
अटॅक हेलिकॉप्टरची तुलना करता ती रशियाकडे ४०२आणि अमेरिकेकडे ८६७ इतकी आहेत. सध्याच्या परिस्तिथीत सगळ्यात अत्याधुनिकीक समजली जाणारे अनमॅनड एरियल वेहिकल्स म्हणजेच मिलिटरी ड्रोन रशियाकडे ५०च्या आसपास असल्याचं सांगण्यात येतं तर अमेरिकेकडे ती सव्वा सहाशे पेक्षा जास्त आहेत. 

आता हवेतल्या अस्त्रांनंतर येऊ जमिनीवर. 

 जामिनावरील प्रत्यक्ष युद्धात रणगाडयांचा खूप फायदा होतो. इथे रशिया अमेरिकेच्या जवळपास दुपटीने पुढे आहे. रशियाकडे जवापसीस १२हजारांपेक्षा जास्त रांगडे आहेत तर अमेरिकेकडे ६,११२ इतके रणगाडे असल्याचं दिसून आलं आहे. सर्व प्रकारच्या तोफखान्यांचा विचार करता रशियाचा  ७५३१ तोफांसह अमेरिकेच्या १३३९ तोफांपेक्षा सरस असल्याचं दिसून येतं. 

आता बघू या या दोन देशांना वेगळं करणाऱ्या समुद्रामध्ये या देशांची किती ताकद आहे. 

बॅलिस्टिक-क्षेपणास्त्र लाँच करू शकणाऱ्या आण्विक-शक्तीच्या सबमरिन्स रशियाकडे ११तर यूएस १४ आहेत. तर गाइडेड मिसाइल लाँच करू शकणाऱ्या पाणबुड्या रशियाकडे ३८, यूएसएकडे ५४ आहेत. समुद्रातील अजून एक शक्तिशाली प्रकरण म्हणजे विमानवाहू युद्धनौका. या युद्धनौका रशियाकडे फक्त एक तर अमेरिकेकडे ११ नौका आहेत. 

आता राहतात सगळ्यात शक्तिशाली आण्विक हत्यारे. रशिया आणि अमेरिका या दोन्ही देशांकडे जवळपास ६०००पेक्षा जास्त नुक्लियर वेपन्स आहेत.

त्यामुळं जर अशी हत्यारे जर युद्धात वापरली गेली तर अखंड मानवजातीचं भविष्य धोक्यात येऊ शकतं. बाकी सतत युद्धाची खुमखुमी असलेल्या या देशांबद्दल तुमचं काय म्हणणं आहे ते आम्हाला कमेंट करून जरूर सांगा.

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.