बाकीच्यांच जावूदे संघाला मात्र मोदींना पर्याय सापडला आहे, यदा यदा हि योगी…!!!

उत्तरप्रदेशमध्ये योगी आदित्यनाथ पुन्हा एकदा सत्तेत येतायेत हे जवळपास निश्चित झालंय. मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीत बसण्याचं सरासरी कार्यकाळ अडीच वर्षांपेक्षाही कमी असलेल्या उत्तरप्रदेशात, पहिल्या ५ वर्षाचा कार्यकाळ सहीसलामत पूर्ण करून योगी आदित्यनाथ दुसऱ्यांदा खुर्चीत बसणार आहेत.

गोविंद वल्लभ पंत यांच्यानंतर सलग दुसऱ्यांदा पक्षाला सत्तेत आणून मुखमंत्रीपद पटकवणारे योगी आदित्यनाथ उत्तरप्रदेशचे पहिलेच मुख्यमंत्री असणार आहेत.

आणि त्यांच्या या विजयाने सगळ्यात इंटरेस्टिंग चर्चा सुरु झालेय ती म्हणजे देशातल्या सगळ्यात मोठ्या राज्यात एक हाती सत्ता आणल्यानंतर,

योगी भाजपचे पंतप्रधानपदाचे दावेदार असणार का?

या चर्चेला बळ मिळण्यासाठी अनेक करणं देखील आहेत. त्यातलीच कारणं एक एक करून बघू

पहिलं कारण म्हणजे मोदींचं आता वय झालंय

भारतीय राजकरणात तसं वय हा एवढा मोठा फॅक्टर नसतो. खुर्चीतच देह त्यागणारे राजकारणी भारताला नवीन नाहीत. मात्र मोदी यांनी हे चित्र बदलायला सुरवात केली. म्हणजेच किमान भाजपात तरी. ७५ वर्षाचा आकडा ओलांडणाऱ्या अनेकांना आता  मार्गदर्शक मंडळाचा रस्ता दाखवत सक्रिय राजकारणातुन निवृत्त करण्यात येतंय.

आणि सध्या ७१ वर्षाचे असणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी २०२५ मध्ये, त्यांच्या तिसर्‍या कार्यकाळात जेमतेम झाल्यानंतर (असे गृहीत धरू की ते २०२४ मध्ये ते जिंकतील), मोदी ७५ वर्षांचे असतील.

त्यामुळं वयोमर्यादेची नियम त्यांनी स्वतःवर लावला तर त्यांनाही खुर्ची खाली करावी लागू शकते.

आणि योगी आहेत अजून फक्त ५१ वर्षांचे ..

योगी आदित्यनाथ यांची पहिल्यांदा जेव्हा युपीच्या मुख्यमंत्रीपदावर निवड करण्यात आली तेव्हा ते लोकसभेत खासदार होते. २०१७ च्या अधिवेशनात त्यांना शेवटची हाजरी लावली होती. तेव्हा योगी आदित्यनाथ म्हणाले होते की,

अक्सर मेरी उम्र को लेकर चर्चा होती रहती है. अध्यक्ष जी मे राहूल गांधी जी से एक साल छोटा हू और अखिलेश यादवजी से एक साल बडा हू. मै उन दोनो के बीच में आ गया, शायद यही उनके फेल होने का कारण बन गया.

योगी आदित्यनाथ म्हणजेच अजय सिंह बिश्त यांचा जन्म ५ जून १९७२ चा. योगी आता फक्त ४९ वर्षांचे आहेत. अवघ्या ४९ व्या वर्षी उत्तरप्रदेशसारख्या मोठया राज्याचा मुख्यमंत्री होणं ही योगी यांच्यासाठी मोठी जमेची बाजू असणार आहे.

आता वयाच्या फॅक्टरमध्ये योगी यांना  मात देऊ शकणारी एकमेव व्यक्ती म्हणजे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे सध्या केवळ ५७ वर्षांचे आहेत. बाकी केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे देखील आहेत मात्र ते सध्यातरी पंतप्रधानपदासाठी इच्छुकांची दुसरी फळीटच असल्याचं सांगण्यात येतं.

त्यामुळं लखनऊ ते दिल्ली हा प्रवास करायला योगीचं वय हा महत्वाच्या फॅक्टर्सपैकी एक असणार आहे.

वय आहे आणि शिवाय अनुभव पण ..

यंग आणि त्याचबरोबर मोठा राजकीय अनुभव ही योगींची अजून एक जमेची बाजू आहे. १९९८ मध्ये अवघ्या २६ व्या वर्षी योगिनी लोकसभेत प्रवेश केला होता. आणि त्यांनतर साल ५ वेळा ते गोरखपूरमधून  संसदेत निवडून गेले आहेत.  त्यामुळं एवढा प्रदीर्घ राजकारणाचा अनुभव असणारे योगी राजकारणाचे डावपेचीही चांगलेच हेरून असतात.

देशाला सगळ्यात जास्त पंतप्रधान देणाऱ्या राज्याचा मुखमंत्री…

देशाला सगळ्यात पंतप्रधान देणारं कोणतं राज्य आले तर ते म्हणजे उत्तरप्रदेश. उत्तरप्रदेश मधून आतापर्यंत ८ पंतप्रधान झाले आहेत. नेहरू गांधी फॅमिलची सगळे पंतप्रधान असू दे की अगदी मोदी या सर्वानी उत्तरप्रदेशतानुच निवडणुका लढवल्या आहेत.

आणि याच सिम्पल लॉजिक आहे ते म्हणजे

दिल्लीच्या सत्तेचा रस्ता जातो लखनऊमधून ..

लोकसभेच्या ८० जागा असलेल्या उत्तरप्रदेश देशाच्या राजकारणात नेहमीच दबदबा राहिला आहे. त्यामुळं ज्याचा यूपीत दबदबा त्याची दिल्लीत हवा हे गणित कायमच राहिलं आहे. मोदींच्या दोन्ही टर्म मध्येपण अनुक्रमे ७१ आणि ६२ जागा निवडून देत उत्तरप्रदेशने मोठी भूमिका बजावली आहे. जेव्हा योगी दिल्लीच्या सत्तेचे दरवाजे तोठवतील तेव्हा हा ८० खासदारांचा आकडा महत्वाचा असणार आहे.

काऊ बेल्टचा नेता…

गाई पट्याचा केंद्रबिंदू असलेल्या उतरप्रदेशाबरोबर बिहार, उत्तराखंड, झारखंड, राजस्थान, या राज्यातही योगी प्रभाव टाकू शकतात. त्यांची हिंदुत्व नेत्याची छबी आणि त्यांच्या सभांना या राज्यातही होणारी तुफान गर्दी या दोन गोष्टी या ठिकाणी लक्षात घेण्यासारख्या आहेत.

आत आकड्यातुन बाहेर येऊन योगीच का याचे दुसरे अँगल पण बघू. विशेषतः यांच्यात नरेंद्र मोदी आणि योगी यांच्यात कॉमन असलेले फॅक्टर…

गर्व से हिंदू ..

गुजरातचे मुख्यमंत्री असल्यापासून नरेंद्र मोदी यांनी हिंदुत्ववादी नेत्याची इमेज अगदी काळजीपूर्वत जपली होती. अगदी मुस्लिमांची टोपी घालण्यास नकार देऊन. आणि गोरक्षनाथ मठाचे महंत असलेले योगी आदित्यनाथ यांनीही फायरब्रॅन्ड हिंदुत्ववादी नेत्याची छबी अशीच निर्माण केली आहे. आताच्याच निवडणुकीत त्यांचा सर्वात चर्चेला गेलेला मुद्दा म्हणजे ‘आब्बाजान ‘म्हणत त्यांनी समाजवादी पक्षावर केलेली टीका. योगींच्या कार्यकाळात होणाऱ्या राम मंदिरची उभारणीने त्यांची हिंदुत्व नेत्याची प्रतिमा घट्ट होईल.

मोदींचा गुजराथ मॉडेल तर योगींचं युपी मॉडेल..

गांधीनगरमध्ये मुख्यमंत्री असताना मोदींनी विकासाबरोबरच अजून एक गुजरात मॉडेल विकसित केले होते. निवडलेले कॅबिनेट, मुख्यतः कोणतेही अधिकार नसलेले मंत्री, विश्वासू सिव्हिल सर्व्हन्टस्नी  चालवलेले सरकार. योगीही तेच करत आहेत. लखनौमध्ये योगी स्वतःमंत्र्यांची  निवड करतात, खात्यांचे वाटप करतात आणि अर्थातच सर्व अधिकार स्वतःकडे ठेवतात. त्याचबरोबर मोदींच्या विकासच्या मॉडेल ला योगी त्यांच्या कायदा सुव्यस्थेच्या मॉडेलने मॅच करू शकतात.

कर्मयोगी संन्यासी ..

मोदी आणि आदित्यनाथ या दोघांचेही समर्थक त्यांना कर्मयोगी म्हणून बघतात . मोदींना त्यांची आई आणि भाऊ आणि पत्नी यांच्यापासून दशकांपूर्वीच अलिप्त राहण्यास सुरवात केली होती. मोदी अधूनमधून आईला भेटायला जात असतात. योगीही असंच आपल्या घरापासून दूर राहून संन्यासाचा आयुष्य जगतात.

योगींनी वडिलांच्या अंत्यसंस्कारापासूनही दूर राहणे पसंत केले होते. आदित्यनाथ यांच्या मुख्यमंत्रिपदाच्या शपथविधीसाठी त्यांच्या वडिलांना किंवा आईला आमंत्रित करण्यात आले नव्हते. त्यामुळं घरदारचा त्याग करून अलिप्त राहणाऱ्या योगीची इमेज थेट अटल बिहारी वाजपेयी यांच्याशी मेळ खाते.

सगळ्यात मोठा फॅक्टर म्हणजे rss शी संबंध कसे आहेत.

जरी RSS च्या मुशीत तयार झाले नसले तरी योगी यांचे संघाशी संबंध चांगलेच राहिले आहेत. RSS च्या कट्टर बेस मध्ये योगी यांचं तुफान आकर्षण आहे. 

स्वयंसेवकांबरोबरच भाजप कार्यकर्तेही योगीच उपयोगी म्हणत असतात.

इंडिया टुडेच्या ‘मूड ऑफ द नेशन’ पोलमध्ये भाजपच्या मतदारांमध्ये पंतप्रधानपदासाठी दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात लोकप्रिय पर्याय योगीच असल्याचे दिसून आले आहे. 

तसेच योगींची हिंदुत्व  नेत्याची इमेज अनेक जातींना हिंदुत्वाच्या झेंडयाखाली एकत्र आणण्याची करामत करू शकते असं जाणकार सांगतात.

आता पक्षातले लोक योगींच्या पंतप्रधानपदाच्या शक्यतेकडे कसे बघतात.

योगींचें पंतप्रधानपदाच्या खुर्चीसाठी योगींचें सर्वात मोठे स्पर्धक ठरू शकतात ते अमित शहा यांना  भारताचे भावी पंतप्रधान म्हणून योगींना पाहीले जाते. याबद्दल तुम्ही काय सांगाल  त्यावेळी शहा यांनी उत्तर दिले 

Naturally….

योगींच्या नेतृत्वाखाली अनेक विकासकामे झाली आहेत . उत्तर प्रदेशात ३० वैद्यकीय महाविद्यालये सुरु करण्यात येणार आहेत. दोन एम्स सुरु झाल्या आहेत. ७७ नवीन महाविद्यालये, १० नवीन विद्यापीठे उभारली आहेत.

 

तसेच स्वतः योगी यांनी मोदींबरोबर ट्विट केलेला फोटो दोघांच्या इक्वेशनबद्दल बरंच काही सांगून जातो.

स्वतः योगी यांनी पण आपली पंतप्रधान पदाची आकांक्षा प्रतिकात्मकरीत्या जाहीर केली आहे. अनेक वेळा योगी भाषणात मोदी यांची स्तुती करताना मोदींबरोबर आपोआपच आपलं नाव घेतलं जाईल अशी तजवीज योगी करताना दिसतात. आपल्या कामाची जाहिरित करणारी बॅनर्स अगदी दिल्ली पासून बंगलोर पर्यंत योगींनी लावली होती त्यामध्ये त्यांनी फक्त मोदींनाच स्थान दिले आहे.

आणि जेव्हा योगी २०२४ नंतर आपला हक्क पंप्रधानपदाच्या खुर्चीवर हक्क  सांगण्यास जातील तेव्हा त्यांच्याकडे अजून एक स्ट्रॅटेजिक ऍडव्हान्टेज असणार आहे ते म्हणजे उत्तरप्रदेशची सत्ता.

अडवाणींसारख्या दिग्गजाला मागे सारून पंतप्रधानपदाच्या उमेदवारी जेव्हा मोदी यांनी मिळवली तेव्हा गुजरातची सत्ता हा त्यांच्याकडचा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट होता आणि तोच २०२४ नंतर योगींकडे असणार आहेत. पक्षांतर्गत प्रतिस्पर्ध्यांनाही ते याच मुद्दयावर मात देऊ शकतात.

त्यामुळे उत्तरप्रदेशच्या निवडणुकांमुळे देशाच्या राजकारणात एक नवीन नाव इथून पुढे कायम चर्चेत राहणार एवढं नक्की.

हे ही वाच भिडू 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.