योगी अयोध्येतून का उभे राहिले नाहीत याचं कारण रामलल्ला मंदिराचे मुख्य पुजारीच सांगतायत

उत्तरप्रदेशच्या विधानसभेच्या निवडणुकींना देशात अन्यन्य साधारण महत्व आहे. आता २०२२च्या निवडणुकांचीही रणधुमाळी जोरदार चालू आहेत. इलेक्शनमध्ये बाकी मुद्देही असले तरी राम मंदिराचा मुद्दा सगळ्यात महत्वाचा ठरणारा आहे हे सांगायला कोणत्या राजकीय पंडिताची गरज नाहीये.

मागच्या कित्येक निवडणुका या राम मंदिर-बाबरी मस्जिद वादावर लढल्या गेल्या आता तर या वादाचा निकाल आलाय आणि मंदिराची पायाभरणीही झाली आहे.

आता याचा राजकीय फायदा कोण उठवणार नाही. त्यामुळंच उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आपलं पारंपरीक मतदारसंघ सोडून अयोध्येतून लढतील अशा जोरदार चर्चा झाल्या. 

योगी आदित्यनाथ जर अयोध्यतून उभे राहिले असते तर भाजपाला ज्या मुद्यांवर निवडणूक लढवायच्या आहेत त्याचा मॅसेज लोकांपर्यंत आपोआप गेला असता असं जाणकार सांगतात. त्याचबरोबर अशी स्ट्रॅटेजि भाजपनं या आधीही वापरली आहे आणि ती बऱ्यापैकी यशस्वी झाल्याचंही दिसत होती. २०१४च्या लोकसभा निवडणुकीमध्ये जेव्हा नरेंद्र मोदी पंतप्रधान पदाच्या दावेदार म्हणून पाहिल्यांदा रिंगणात उतरले तेव्हा हिंदूंच्या सर्वात पवित्र धार्मिक स्थानांपैकी एक असलेल्या वाराणसीची निवड केली होती. 

ना मै आया हू,ना मुझे किसने भेजा है, मुझे तो माँ गंगा ने बुलाय है असं म्हणत मोदींनी वाराणसीतून आपलं उमेदवारी भरली होती आणि त्यांचा रिझल्ट आपण मतपेटीतून बघितलाच होता. 

पुन्हा २०१९मध्येही पुन्हा काशीमधूनच उभे होते. नरेंद्र मोदी वेळोवेळी आपला पोलिटिकल मेसेज  वाराणसीला भेट देऊन देत असतात. त्यामुळं योगी आदित्यनाथांसाठीही अयोध्येत असाच एक मतदारसंघ तयार करण्याच्या तयारीत भाजपा असल्याचं सांगण्यात गेलं. 

मात्र योगींनी मात्र पुन्हा आपलं होमटर्फ गोरखपूरचं निवडलं. 

पण योगी अयोध्येतून लढणार ही बातमी पक्की होती असं अजूनही अनेक पत्रकार सांगतायत आणि ऐनटायमाला काहीतरी मोठ्ठं कारण बाहेर आलं असणार असं बोललं गेलं. आता अयोध्येतील रामलल्ला मंदिराचे प्रमुख पुजारी असणाऱ्या सत्येन्द्र दास यांनी योगी आदित्यनाथ अयोध्येतून का लाढणार नाहीयेत याचं कारण सांगितलंय.

अयोध्येत राम मंदिराच्या होऊ घातलेल्या  बांधकामामुळे आणि पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे अनेकांची दुकाने आणि घरे पाडली गेली आहेत, यामुळे तिथे लोकांमध्ये सरकारबद्दल नाराजी आहे.

त्यामुळे जर योगींनी अयोध्येतून निवडणूक लढवली असती तर, त्यांना मोठ्या विरोधाला सामोरे जावे लागले असते. त्यामुळे आपण आदित्यनाथ यांनी गोरखपूरमधून निवडणूक लढवावी, असा सल्ला दिल्याचे सत्येंद्र  दास यांनी स्पष्ट केले आहे.

महंत सत्येंद्रदास पुढे म्हणाले की, भाजप आपल्या अजेंड्यातून राममंदिर कधीच काढून टाकणार नाही, असे मला वाटते.

 त्यांनी योगींना अयोध्येतून निवडणूक न लढवण्याचा सल्ला का दिला या प्रश्नावर दास म्हणाले की, आम्ही रामलल्लाला विचारूनच बोलतो. रामलल्लालाच्या प्रेरणेनेच आम्ही हे बोललो आहोत. तसेच योगींच्या उमेदवारीवर येथील संतांचेही एकमत नाही.

आता हे झालं महंतांचं मत आणि भाजपनं तरी अजून मात्र योगी गोरखपूरमधूनच का याबद्दल काही सांगितलं नाहीये. 

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.