AN-32 विमानाच्या अपघातामागे आहे भारताचं बर्म्युडा ट्रँगल ?

अटलांटिक समुद्रातील बर्म्युडा ट्रँगल म्हणजे गेली अनेक वर्ष जगासाठी पडलेल कोडं !! आत्तापर्यंत हजारो विमाने आणि जहाजे इथून गायब झालेली आहेत. कित्येक संशोधक याच्या मागे लागले आहेत पण ही मिस्ट्री सोडवता आलेली आहे असे अजूनही छातीठोकपणे कोणाला म्हणता येत नाही.

असच एक बर्म्युडा ट्रँगल भारतातही आहे. हिमालयाच्या पुर्व पर्वतरांगामध्ये ‘अरुणाचलप्रदेशात’. नुकत्याच झालेल्या हवाई अपघातामुळे याची चर्चा सुरु झाली. 

अरुणाचल प्रदेशातील पूर्वेकडच्या हिमायला वरून विमान उडान भरणे म्हणजे मृत्यूचे उडान भरणेच. भारतच्या इतिहासात सर्वाधिक विमान दुर्घटना झाल्याचा रेकॉर्ड अरुणाचल प्रदेशाच्या नावावर असावा. हंप ऑपरेशन दरम्यान दुसर्या महायुद्धाच्या तीन वर्षात (१९४२-४५) अमेरिकेने ५०९ विमाने गमावली होती. त्यातील ८१ विमानांचा तर अजूनपर्यंत काही पत्ता लागलेला नाही. ज्यात १,३१४ क्रू मेंबरचा मृत्यू झालेला तर ३४५ क्रू मेंबर हरविल्याची नोंद करण्यात आलेली. अधिकतर विमान दुर्घटनांना खराब हवामान कारणीभूत ठरलेलं.

अरुणाचल प्रदेशातील खराब हवामानामुळे दुर्घटनाग्रस्त झालेले भारतीय वायुसेनेचे AN-32 विमान हे काही पहिले विमान नव्हते. खराब हवामानामुळे उडान भरण्यास अडचणींचा सामना करावा लागत असल्याने दुसऱ्या महायुद्धाच्या काळात हा प्रदेश विमानांची स्मशानभूमी बनला होता. उत्तर-पूर्वेकडील सर्वात मोठे राज्य असलेल पण फार कमी लोकसंख्या असलेले आहे. अरुणाचल प्रदेशात पर्वत जास्त असून ते उंच व उग्र आहेत. त्यावरून हिमनद्या वेगाने खाली वाहत येत असतात.

विमान दुर्घटनाग्रस्त झाल्यानंतर बरेच दिवस त्याचा काही पत्ता लागला नाही. शेवटी आठ दिवसानंतर विमानाचा स्लॅब दिसून आला. भारतीय वायुसेनेच्या AN-32 विमानाने ३ जूनला असाम मधील जोरहाट येथून मेचुका जाण्यासाठी उडान भरले होते. विमानाबाबत माहिती समोर आली ती दुर्घटना घडलेल्या भागात स्थानिकांनी आकाशात संशयित दाट धुराचे लोळ बघितल्याचे सांगितल्यावर.

मे २०११ मध्ये अरुणाचल प्रदेशाचे मुख्यमंत्री डोर्जी खंडू हे आपल्या पवन हंस हेलिकॉप्टर मधून जात असतांना त्यांचे हेलिकॉप्टर हि असेच अचानक बेपत्ता झाले होते. तेव्हा त्याचा शोध घ्यायला देखील ५ दिवस लागले होते. या दुर्घटनेत मुख्यमंत्री डोर्जी खंडू यांचा मृत्यू झाला होता. वर आकाशात सतत प्रवाह बदलणारी हवा, खाली खडबडीत जमीन आणि घनदाट जंगल यामुळे रस्ते आणि इतर पायाभूत सुविधा उपलब्ध करणे अशक्य आहे.

याक्षेत्रात मोठ्या प्रमाणावर कार्य करत असलेल्या भारतीय वायुसेनेच्या अधिकाऱ्याने सांगितले की,

याभागातील पायलटची सर्वात मोठी समस्या हि येथील हवामान आणि त्यातील अनिश्चितता आहे. कधीकधी हवा अचानकपणे २५० किमी प्रती तास वेगाने वाहायला लागते आणि सगळीकडे अशांतता माजते. यात कार्गो एअरकॅर्फ्ट AN-32 सारखे मालवाहू विमान हवेत झटक्याने हेलकावे खायला लागते आणि त्यामुळे पायलटचे विमानावरील नियंत्रण सुटते.

मेचुका पासून अगदी १०० किमी हवाई अंतर नसलेले दक्षिणेकडील चबुआ, दिजन आणि डूमडूमा हे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात सर्वाधिक व्यस्त असलेल्या हवाई पट्ट्यांंपैकी होत्या. जेव्हा मित्र राष्ट्रांचे युद्धविमाने पूर्व हिमालयावरून उडान भरायचे. अमेरिकने चीनला जपान विरोधात लढण्यासाठी १९४२-४५ या तीन वर्षात चाललेल्या हंप या ऑपरेशनसाठी सैन्य आणि साधनसामग्री पुरवली होती. प्रत्येकवेळी दुर्घटनागर्स्त विमानांच्या सापडलेल्या अवशेषांची माहिती हि राज्यातील शिकारी किंवा स्थानिक लोकांकडून मिळत असते.

हंप ऑपरेशन दरम्यान या अरुणाचल प्रदेशातील या भागाने धोकादायक उडान क्षेत्र असल्याचा दर्जा मिळवला होता आणि म्हणूनच तेव्हापासून या भागाची ओळख आजतागायत विमानांची स्मशानभूमी अशीच झाली आहे.

हे ही वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.