स्क्विड गेममध्ये प्लेअर नंबर 199 गाजवणारा कोणी कोरियन नसून भारताचा अनुपम त्रिपाठी आहे….

वेबसिरीजचा जमाना आहे भाऊ, जिकतिकडे चोहीकडे फक्त नि फक्त वेबसिरीजचे रिव्ह्यू म्हणा किंवा रिल्स म्हणा, डायलॉग आणि ऍक्शन यांचाच बोलबाला सुरू आहे. आत्ताच्या काळात नेटफ्लिक्स वर एका कोरियन ड्रामा वेबसिरीजने धुमाकूळ घातला आहे आणि जगभर फक्त नि फक्त याच वेबसिरीजची चर्चा सुरू आहे. स्क्विड गेम नावाची ही वेबसिरीज असून हाँग डाँग ह्युक यांनी दिग्दर्शन केलेलं आहे. जगभरात ही सिरीज पाहण्यासाठी लोकं उतावीळ झालेले आहेत.

सोशल मीडियावर स्क्विड गेमने धमाल उडवून दिली आहे. या वेबसिरीज मध्ये एक भारतीय अभिनेतासुद्धा आहे त्याच नाव आहे अनुपम त्रिपाठी. स्क्विड गेममध्ये प्लेअर नंबर 199 म्हणजे अब्दुल अली हे पात्र अभिनेता अनुपम त्रिपाठीने साकारलं आहे. या अभिनेत्याबद्दल जाणून घेऊया.

अनुपम त्रिपाठी हा दिल्लीचा राहणारा आहे. शिवाय तो एक उत्तम थेटर आर्टिस्ट आहे. अनुपम त्रिपाठी हा 2006 पासून ते 2010 पर्यंत त्याने थेटरचे अनेक शोज केले. अनुपम नॅशनल स्कुल ऑफ ड्रामा मध्ये ऍडमिशन घेऊ इच्छित होता पण त्याही अगोदर त्याला साऊथ कोरियाकडून शिक्षणासाठी स्कॉलरशिप मिळाली. यानंतर मात्र अनुपम त्रिपाठीचं आयुष्यच बदलून गेलं.

कोरिया नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ आर्टस् मधून शिक्षण घेण्यासाठी तो पुढच्या शिक्षणासाठी दक्षिण कोरियाला निघून गेला. शिक्षण पूर्ण झाल्यावर अनुपमने तिथल्या फिल्म इंडस्ट्रीत हात आजमावायाला सुरवात केली. स्क्विड गेमच्या अगोदरही तो अनेक कोरियन सिनेमे आणि सिरियल्समध्ये झळकला आहे. अनुपमने 2014 साली कोरियन फिल्म ode to my father मधून सिनेमात पदार्पण केलं.

यानंतर तो descendants of the sun , हॉस्पिटल प्लेलिस्ट ल, स्पेस स्वीपर्स अशा अनेक कोरियन सिनेमांमध्ये अनुपम आपल्याला पाहायला मिळतो. इतक्या वर्षांमध्ये अनुपमने कोरियन इंडस्ट्रीत आपल्या नावाचं एक वलय निर्माण केलेलं आहे. अनुपम त्रिपाठीच्या अभिनयाचे जलवे आत्ता स्क्विड गेम या वेबसिरीजमध्ये पाहायला मिळत आहे. या सिरीजमुळे त्याचं बरच कौतुक होत आहे.

या सिरीजमध्ये अनुपमने एका पाकिस्तानी प्रवासी मजुराचा रोल केलेला आहे. जो सियोलमध्ये आपल्या बायको मुलासोबत राहत असतो. पण फॅक्टरीच्या मालकाकडून पैसा न मिळाल्याच्या कारणावरून मजबुरीने त्याला या स्क्विड गेममध्ये भाग घ्यावा लागतो. ही वेबसिरीज ज्या वेगाने गाजतीय त्यावरून प्रचिती येते की यात काय काय भयानक गोष्टी पाहायला मिळणार आहे.

आता स्क्विड गेममधलं अनुपम त्रिपाठीचं मार्केट बघता आता त्याच्या फॅन बेसमध्ये पुन्हा एकदा वाढ झालेली आहे.

हे ही वाच भिडू :

1 Comment
  1. Riya pawar says

    खुप छान माहिती मिळाली या पोस्ट मधून.आमची सुद्धा टेक website आहे आवडल्यास नक्की भेट द्या सर.
    humbaa.com

Leave A Reply

Your email address will not be published.