सावित्रीबाईंच्या पुतळ्यावरील वादात भुजबळ म्हणतात राज्यपालांची चूक नाही

महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या कार्यकर्तृत्वाची विशेषतः शिक्षण क्षेत्रातील त्यांच्या  बहुमोल योगदानाची दखल घेऊन ज्या पुण्यात त्यांनी हे काम केले तेथील पुणे विद्यापीठाला सावित्रीबाई फुले यांचं नाव देण्यात येण्यात यावं अशी मागणी अनेक संस्था आणि संघटनांकडून करण्यात येत होती. अखेर मागण्या व आंदोलनांतर हा  २०१४ मध्ये विद्यापीठाचा नामविस्तार करण्यात आला.

 पुणे विद्यापीठाचा ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार माजी राज्यपाल के. शंकरनारायणन यांच्या उपस्थितीत ९ ऑगस्ट २०१४ मध्ये करण्यात आलं.

मात्र सावित्रीबाई फुले यांच्या नावाने जरी विद्यापीठ असलं तरी विद्यापीठ प्रांगणात त्यांचा पुतळा मात्र बसवण्यात आला नव्हता.

मग पुन्हा विद्यार्थी संघटनांना सावित्रीबाईंच्या पुतळ्यासाठी आंदोलन करावं लागलं. अखेर विद्यापीठ परिसरात सावित्रीबाईंचा पुतळा बसवण्यात येणार अशी घोषणा राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी नोव्हेंबर २०२१ मध्ये केली. पुतळ्यासाठी निधी देखील तातडीने मंजूर करण्यात आला.

तसेच सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी म्हणजेच ३ जानेवारीला या पुतळ्याचे अनावरण करण्याची घोषणा देखील करण्यात आली.

डेडलाईन फॉलो करत अडीच महिन्यांपासून सुरु असलेले पुतळ्याचे काम २७ डिसेंबरलाच पूर्ण झाले होते असं सांगण्यात येतंय.

मात्र जेव्हा ३ जानेवारीचा २०२२ चा दिवस उजडला तेव्हा मात्र वेगळीच परिस्तिथि. पुतळ्याच्या उद्घटनाची कोणतीचहालचाल दिसत नव्हती.

सावित्रीबाई यांची जयंतीच्या शुभमुहूर्तावर राज्यातील सर्व विद्यापीठांचे कुलपती असणारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या हस्ते होणार होते.

मात्र, उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांचा उद्या मुंबई दौरा असल्याने राज्यपाल पुण्यात येऊ शकणार नाहीत. त्यामुळं राज्यपालांना वेळ मिळत नसल्याने हा अनावरण सोहळा पुढे ढकलण्यात आला असल्याची माहिती विद्यापीठातील अधिकाऱ्यांमार्फत देण्यात आली.

सावित्रीबाई फुले यांच्या सारख्या व्यक्तिमत्वाच्या जयंतीचा कार्यक्रम राज्यपालांना वेळ नाही म्हणून पुढे ढकलणं विद्यार्थी संघटनांना रुचलं नाही. राज्यपालांना अभिनेते-अभिनेत्र्या यांना भेटायला वेळ आहे. मात्र,ज्यांनी स्त्री शिक्षणाची सुरुवात या देशात केली त्या सावित्रीमाईंच्या जयंतीदिनी उपस्थित राहायला वेळ नाहीए अशा टीकेला राज्यपालांना सामोरे जावे लागले. विद्यार्थी संघटनांनी या विरोधात विद्यापीठात जोरदार आंदोलन केलं.

आक्रमक झालेल्या संघटनांकडून पुतळ्याचे अनावरण करण्याचा प्रयत्न केला गेला.

राज्यपाल या प्रकरणामुळं अडचणीत येणार अशी परिस्तिथी निर्माण झाली असतानाच छगन भुजबळ यांनी अशी प्रतिक्रिया दिली या प्रकरणाची पूर्ण हवाच निघून गेली. ३ तारखेला जयंतीदिनी सावित्रीबाईंच्या पुतळ्याचं अनावरण करावं असा आमचा प्रयत्न होता. पण एकाच महिन्यात सगळ्या घडामोडी घडल्या आहेत. काम अर्धवट राहिलं. त्यामुळे राज्यपालांना एक महिना आधी कळवण शक्य नव्हतं. काम पूर्ण होईल की नाही याची पण गॅरण्टी नव्हती. त्यामुळे राज्यपालांना निमंत्रण दिल आणि काम पूर्ण झालं नसतं तर?

त्यामुळं राज्यपालांना नाव ठेवण्यात काय अर्थ नाही, राज्यपालांना आम्ही उशिरा कळवलं, काम पूर्ण होईल कीं नाही याबाबत शंका होती, असं ते म्हणाले. 

भुजबळांनी दिलेल्या या सप्स्टीकरणामुळं राज्यपाल या वादातून सहीसलामत बाहेर पडलेत असं जाणकार सांगतायत.

नेहमी राज्यपाल आणि महविकास आघाडी यांच्या संघर्ष पाहण्याची सवय असलेल्या राज्याला ह्यावेळी महाविकास आघाडीतला एक मंत्री आणि राज्यपाल यांची एक नवीनच ‘युती’ बघायला मिळाली.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.