चौधरी चरणसिंग यांना श्रद्धांजली वाहणे म्हणजे चंद्रशेखर आझाद यांची विचारपूर्वक रणनीती आहे

चंद्रशेखर आझाद उर्फ ‘रावण’ गेल्या काही वर्षात उत्तर प्रदेशातील आणि देशभरातील दलित समाजाचा प्रमुख तरुण नेता म्हणून समोर आला आहे. २०१४ साली उत्तर प्रदेशातील दलित विचारवंत सतीश कुमार यांनी ‘भीम आर्मी’ नावाच्या संघटनेची स्थापना केली होती, ज्या संघटनेने आता देशभरात हात-पाय पसरलेत. देशातील महत्वाच्या अशा जवळपास सर्वच राज्यात ही संघटना जाऊन पोहोचलिये. चंद्रशेखर आझाद हे या संघटनेचा प्रमुख चेहरा आणि अध्यक्ष आहेत….

पण चंद्रशेखर यांचं उत्तर प्रदेशच्या राजकारणात महत्वाचं स्थान आहे असं चित्र नेहेमीच दिसून येतं.  उत्तर प्रदेशमधील दलित तरुणांमध्ये चंद्रशेखर आझाद प्रचंड लोकप्रिय आहे. शिवाय दिवसेंदिवस त्याची लोकप्रियता वाढतच चाललीये, याची भाजप सरकारला देखील कल्पना आहे. जेलमध्ये असताना त्याची वाढत चाललेली लोकप्रियता आणि दलित समजाच्या मनात भाजपची होत चाललेली नकारात्मक प्रतिमा या गोष्टी लक्षात घेऊनच सरकारने चंद्रशेखरला सजा पूर्ण होण्याच्या २ महिने आधीच सोडून दिलं.

सक्रीय राजकारणात उतरण्यापेक्षा आपल्याला रस्त्यावरची लढाई लढण्यातच अधिक रस असल्याचं सध्या ते सांगत असले, तरी रस्त्यावरची लढाई संसदेत घेऊन जाण्यासाठी का होईना तो सक्रीय राजकारणात आज ना उद्या उतरणार हे तर नक्कीच होतं..त्याचप्रमाणे ते उतरले देखील. 

आता बोलूया उत्तर प्रदेश मधील दलित राजकारण. हे सर्वश्रुतच आहे कि, पारंपारिकपणे पश्चिम उत्तर प्रदेशातील भूमिहीन दलित जमीनदार जाटांना अत्याचारी मानत आलेत आणि अजूनही मानतात..

भीम आर्मीचे प्रमुख चंद्रशेखर आझाद यांनी अलीकडेच माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे भीम आर्मी प्रमुख म्हणून त्यांच्या अधिकृत लेटर हेडवर पोस्टर पोस्ट करत त्यात चौधरी चरण सिंह यांना दलित नेता असं संबोधित करत, कामगार आणि शेतकऱ्याचा एक शक्तिशाली आवाज, लोकप्रिय जननेता आणि स्वातंत्र्यसैनिक म्हणून माजी पंतप्रधानांचे कौतुक करताना आझाद यांनी त्यांच्या जयंतीनिमित्त त्यांचे स्मरण करत श्रद्धांजली वाहिली आहे.

हे मुद्दाम सांगण्याचं निमित्त म्हणजे, पश्चिम उत्तर प्रदेशातील चंद्रशेखरचा समुदाय, जे मोठ्या प्रमाणावर भूमिहीन आहेत, ते जाट समुदायाला अत्याचारी मानतात. दुसरीकडे, चरणजित सिंह आहेत, ज्यांनी १९७७ मध्ये जनता सरकार स्थापन झाल्यावर जगजीवन राम यांना पंतप्रधान होऊ दिले नाही. पण चंद्रशेखर यांनी ही धारणा बदलण्याचा प्रयत्न केला आहे.

याचं स्पष्ट निमित्त म्हणजे, उत्तर प्रदेश विधानसभेच्या निवडणुका ! या  निवडणुकांपूर्वीच नवीन राजकीय वारे वाहू लागत आहे त्याच बरोबर पश्चिम उत्तर प्रदेशातील राजकीय आणि सामाजिक समीकरणे बदलत आहेत. 

पण त्यांच्या बदलाकडे गंभीर राजकीय लक्षण म्हणून पाहिले जातेय. असे करून भीम आर्मीचे प्रमुख राष्ट्रीय लोक दल नेते जयंत चौधरी, चरणसिंग यांचे नातू तसेच समाजवादी पक्षाचे (SP) नेते अखिलेश यादव यांना स्पष्ट संदेश देत आहेत यात शंका नाही. आगामी यूपी विधानसभा निवडणुकीसाठी दोन्ही नेत्यांनी अलीकडेच निवडणूक करार केला आहे ज्यामध्ये अनेक लहान जाती-आधारित प्रादेशिक पक्षांचा समावेश करण्यात आला आहे. निवडणुकीला अवघे काही महिने शिल्लक असताना सत्ताधारी भाजपचा प्रमुख राजकीय प्रतिस्पर्धी म्हणून महाआघाडी स्पष्टपणे समोर आली आहे.

पण तरीही समाजवादी पक्षाशी उघड-उघड युती केली जाईल याबाबत आझाद यांनी स्पष्ट असा कौल दिला नाही.  

थोडक्यात असंही सांगितलं जातंय कि, आझाद आणि त्यांची भीम आर्मी औपचारिकपणे अखिलेश यादव यांच्या नेतृत्वाखालील आघाडीत सामील होण्याची शक्यता नाही. समाजवादी पक्षाच्या सूत्रांच्या म्हणण्यानुसार, अखिलेश आणि आरएलडीचे प्रमुख जयंत चौधरी दोघेही भीम आर्मीला इतर लहान प्रादेशिक पक्षांसोबतच्या त्यांच्या निवडणूक युतीमध्ये सामील करण्यास उत्सुक होते, परंतु मुलायम सिंह यादव यांनी त्यांना तसं काही करू दिलं नाही.

२०१९ च्या लोकसभा निवडणुकीत दलित सुप्रीमो मायावती यांच्याशी युती केल्यानंतर मुलायमसिंग यादव यांच्यासारख्या ज्येष्ठ आणि चतुर राजकीय नेत्याने आपल्या मुलाला निवडक मतदारसंघात भीम आर्मीशी अनौपचारिक समझोता करण्यास सांगितले होते.

चौधरी चरणसिंग यांचे जाहीर स्वागत करून, त्यांना श्रद्धांजली वाहून आझाद हे स्पष्टपणे पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक भागांतील तरुण दलितांमध्ये त्यांचा मोठा पाठिंबा दर्शवत आहेत, तसेच अखिलेश-जयंत यांच्या जोडीच्या नेतृत्वाखालील युतीकडे कल आहे हे देखील अप्रत्यक्षपणे दर्शवत आहेत.

विशेष म्हणजे, या महिन्याच्या सुरुवातीला मायावतींचा स्वतःचा पुतण्या, त्यांची मोठी बहीण सरस्वती यांचा मुलगा प्रबुद्ध कुमार याने मेरठमध्ये जयंत चौधरी आणि अखिलेश यादव या दोघांच्या उपस्थितीत त्यांच्या अलिप्त दलित गटाचे, भारतीय बहुजन परिवर्तन पार्टीचे आरएलडी मध्ये विलीनीकरण करत जाहीर सभा घेतली होती. तेंव्हा त्यांनी चरणसिंग यांचेही खूप कौतुक केले, ज्यांचे विचार अनेक प्रकारे बाबासाहेब आंबेडकरांसारखेच असल्याचा दावा त्यांनी केला होता. 

उल्लेखनीय आहे की, RLD गेल्या काही महिन्यांपासून पश्चिम उत्तर प्रदेशातील अनेक भागांमध्ये बहुजन उदय अभियान राबवत आहे. हे विशेषत: मुझफ्फरनगरमध्ये घडत आहे जेव्हा पक्षाचे नेते आणि कार्यकर्ते दलित गावे, परिसर आणि घरांना भेटी देत ​​आहेत आणि योगी आदित्यनाथ यांच्या नेतृत्वाखालील भाजप सरकार पाडण्यासाठी दोन्ही समुदायांनी एकत्र येण्याची आवाहन करत आहेत. 

पश्चिमी उत्तर प्रदेश में जाटों और मुसलमानों के बीच पारंपरिक दुश्मनी को खत्म करने के लिए मोदी सरकार के खिलाफ किसान के सफल आंदोलन के साथ, आरएलडी इस क्षेत्र में भी दलितों के साथ संबंधों को सुधारने के लिए अपने रास्ते से हट रहा है.

उत्तर प्रदेशातील पश्चिम भागातील जाट आणि मुस्लिमांमधील पारंपारिक वैर संपवण्यासाठी तसेच  RLD या प्रदेशातील दलितांशी संबंध सुधारण्याच्या मार्गावर आहे.

या प्रदेशातील एकूण लोकसंख्येच्या १७ टक्के हि लोकसंख्या हि जाट समुदायाची आहे. या जाट समुदायाचा पश्चिम भागातल्या १०० पेक्षा जास्त जागांवर प्रभाव आहे. तर याच प्रदेशात एकूण लोकसंख्येच्या २५ टक्के हे मुस्लिम आहेत आणि २० टक्के दलित आहेत. त्यामुळे हे तिन्ही गट एकत्र आले तर, आगामी निवडणूक निवडणूक गट एकत्र आल्यास या प्रदेशात एक ‘महायुती’ होऊ शकते.

हे हि वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.