त्या एका घटनेनंतर खेळाडू भूपत संपला अन् दरोडेखोर भूपतसिंगचा उदय झाला

स्वातंत्र्यपूर्व काळातील हि घटना. ज्यावेळी राजेरजवाडे यांचं शासन चालायचं. त्याचकाळात गरिबांना लुटण्याचा इंग्रजांचं सूत्र चालूच होतं. इतकंच नाही तर आपल्या स्वार्थापोटी लुटालुटीच्या कामात इंग्रजांना मदत करत होते. देशभरात केवळ लूटमार आणि सामान्य नागरिकांच्या जीवाचे हाल चालले होते.

अशा काळात गुजरातचे शासक गायकवाड परिवाराच्या राजाला एक चिठ्ठी मिळते आणि त्यात लिहिलेलं असतं,

महालात काम करणाऱ्या सर्व ४२ नोकरांना त्यांच्या निवृत्तीच्या काळात ५-५ बिघे जमीन देण्यात यावी आणि याची जाहीर सूचना संपूर्ण शहरात दिली जावी.

जर असं काही घडलं नाही तर राजपरिवाराची एक एक करून हत्या केली जाईल.

हि धमकी दिली होती दरोडेखोर भूपती सिंग चौहानने.

हा दरोडेखोर भूपत सिंग तोच होता ज्याने वडोदरा ते दिल्ली पर्यंत इंग्रज आणि राजेशाही लोकांना धाकात ठेवलं होतं. पण पुढे चुकून ते पाकिस्तानच्या सीमेपल्याड गेले आणि परत भारतात कधी परतलेच नाही. कोण होता हा भूपत सिंग ? जाणून घेऊया.

भूपतसिंग हा गुजरातच्या काठियावाडमधील वांगनीया राजाच्या दरबारात नोकर म्हणून काम करायचा. तो खेळात कायम पुढे असायचा. त्याच्या पाळण्याचा वेग इतका होता कि तो वाऱ्यासोबत गप्पा मारतो अशा चर्चा चालायच्या. भूपतसिंग खेळामुळे राजाच्या दरबारातील महत्वाचा माणूस बनला होता. तलवारबाजी, भालाफेक अशा खेळात तो निपुण होता.

तिथे त्याचा मित्र होता राणा.  त्याच्या बहिणीसोबत त्या लोकांनी बलात्कार केला ज्यांच्यासोबत भूपतची जुनी दुष्मनी होती. ज्यावेळी राणा त्या लोकांचा बदला घेण्यासाठी गेला तेव्हा राणाला त्या लोकांनी चोप दिला. राणाला वाचवण्यासाठी भूपती गेला खरा पण खोट्या तक्रारी विरोधकांनी देऊन त्यालाच बलात्काराच्या प्रकरणात अडकवलं. त्याला जेलात डांबण्यात आलं. 

हीच ती घटना होती ज्यामुळे खेळाडू भूपत संपला आणि दरोडेखोर भूपतचा उदय झाला. जेलमधून तो फरार झळा आणि सूड घेऊ लागला. बाहेर पडल्या पडल्या त्याने त्या बलात्कार करणाऱ्या टोळीच्या म्होरक्याला गारद केलं. हळूहळू त्याने त्याची टोळी वाढवली. हा भूपत असा डाकू होता ज्याने २१-२१ अशा दोन टोळ्या तयार केल्या होत्या. त्यांचे वेगवेगळे सरदार होते पण सगळे भूपतच्या आदेशात राहायचे.

भूपत हा गरिबांचा रॉबिनहूड म्हणून समोर आला होता. ज्यादा व्याजदर लावून शेतकऱ्यांना आणि सामान्य नागरिकांना लुटणाऱ्या सावकरांवर त्याने जरब बसवली. त्याच्याविरुद्ध इंग्रजांना तक्रार करणाऱ्या लोकांना तो ठार करत नसे फक्त त्याचे कान आणि नाक कापून सोडून देत असे. आणि वरून भूपत त्याला धमकी देत कि जर तू आत्महत्या केली तर तुझ्या परिवाराला ठार करण्यात येत. हा प्रकार यासाठी होता कि जेणेकरून लोकांमध्ये त्याच्या कृत्याचा संदेश जावा. 

महिलांसाठी तो कायम आदर राखायचा. त्यांच्यावर कधी जुलूम , जबरदस्ती तो करत नसायचा. पोलिसांना त्याने बऱ्याचदा हुलकावणी दिली होती. ब्रिटिश आर्मी तर त्याला शोधून शोधून थकली होती. शेवटी देश स्वातंत्र्य झाल्यावर भूपतला न पकडताच इंग्रजांना जावा लागलं होत. पण इथून पुढे भूपतसिंगचे कारनामे वाढतच राहिले.

त्याच्या धाकाने तत्कालीन राष्ट्र्पतीने आदेश काढला होता कि, जोवर भूपतला पोलीस पकडत नाही तोवर पोलिसांना २५% पगार कपात राहील.

पण हे ऐकून उलट भूपतीने थेट राष्ट्र्पतीलाच धमकी पाठवली कि पोलिसांना पूर्ण वेतन देण्यात यावे. पोलिसाना पूर्ण वेतन मिळू लागले.

जंगलात, डोंगरदऱ्यात राहून तो त्याचे साम्राज्य वाढवत राहिला. पशुपक्ष्यांचे आवाज त्याला अवगत होते. जंगलात ज्यावेळी त्याला पोलीस पकडण्यासाठीं जात तेव्हा त्याच्या आवाजाच्या कलेने तो वाचत असे आणि पोलिसांची टीम त्याच्या तावडीत सापडत असे. 

६० च्या दशकात डाकू भूपत सिंग पाकिस्तानात गेला. पाकिस्तानी सेनेने त्याला घुसखोरी आणि हेरगिरीच्या आरोपात जेलात टाकलं. पाकिस्तानात गेल्यावर तो काही परत भारतात आलाच नाही. सुटका झाल्यावर तिथेच त्याने धर्मांतर केलं आणि एका मुस्लिम मुलीशी लग्न केलं आणि आमीन नाव धारण केलं. १९९६ साली त्याचं निधन झालं.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.