नित्यनेमाने आषाढी वारी आणि मतांसाठी मुस्लिम तुष्टीकरण, दिग्गीराजा कोणाला समजतच नाहीत

आषाढी वारी हा महाराष्ट्रासाठी आस्थेचा विषय आहे. दरवर्षी लाखो वारकरी राज्यांच्या कानाकोपऱ्यापासून पंढरपूरला पायी वारी निम्मित्त येत असतात. महारष्ट्रातील अनेक राजकारणी दरवेळी वारीत सहभागी होत असतात. मात्र कॉंग्रेसचे सरचिटणीस दिग्विजय सिंह हे राज्याबाहेरील एकमेव राजकारणी आहेत जे की आषाढी एकादशी निम्मित पंढरपूरला येत असतात.   

मागच्या २७ वर्षांपासून दिग्विजय सिंह हे आषाढी निम्मित पंढरपूर येत असतात.  पांडुरंगावर आपली आस्था असल्याचे त्यांनी वेळोवेळी सांगीतले आहे. याचबरोबर पुण्यात आल्यावर दिग्विजय सिंह आळंदी सुद्धा जातात.

मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री असतांना शासकीय पूजेचा मान

राज्यातील अनेक मुख्यमंत्री आणि मंत्र्यांनी आषाढी एकादशी निम्मित विठ्ठलाची शासकीय पूजा केली आहे. अशात मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री दिग्विजय सिंह यांना देखील या शासकीय पूजेचा मान मिळाला आहे.

दिग्विजय सिंह यांनी १९९४ मध्ये  राज्याचे तत्कालीन पाटबंधारे मंत्री पद्मसिंह पाटील यांच्या सोबत पूजा केली होती. तर १९९७  साली राज्याचे मुख्य सचिव दिनेश अफजलपुरकर यांच्याही शासकीय पूजा करण्याचा मान  दिग्विजय सिंह यांना मिळाला आहे.

आपल्या आस्थेसाठी गेली अनेकवर्ष आषाढी एकादशी निम्मित पंढरपूरला येणारी दिग्विजय सिंह मात्र, राजकारणासाठी मुस्लिमांचे लांगूलचालन करतात असा आरोप त्यांच्यावर नेहमी लावण्यात येतो.

जर कॉंग्रेसची भूमिका म्हणायला गेला तर पहिल्या पासूनच सेक्युलर राहिली आहे. हिंदू-मुस्लिमांमध्ये कधीही भेदभाव केला गेला नाही. मात्र अशावेळी दिग्विजय सिंह मतांसाठी मुस्लीम धार्जिणे भूमिका घेतल असल्याचे बोलण्यात येते.

शनिवारी सोशल मिडीयावरील क्लब हाउसच्या चॅटची एक ऑडीओ क्लीप व्हायरल झाली. ‘कॉंग्रेस पक्ष सत्तेत आला तर जम्मू काश्मिर मध्ये अनुच्छेद-३७० रद्द करण्याचा पुर्नविचार केला जाईल’ असा या ऑडीओ क्लीप मध्ये  दिग्विजय सिंह म्हणत असल्याचा आढळून येत आहे.

या क्लब हाउस मध्ये एक पाकिस्तानच्या पत्रकार सुद्धा उपस्थित होता असा आरोप भाजपच्या वतीने करण्यात येत आहे. या आरोपात किती तथ्य आहे हे भाजपला माहित. जर आरोप खरच असतील तर दिग्विजय सिंह पुन्हा एकदा वादात सापडले हे मात्र नक्की. 

यामुळे दिग्विजय सिंह यांच्यावर पुन्हा एकदा मतांसाठी मुस्लीम धार्जिणे भूमिका घेतल्याचे बोलण्यात येते. यापूर्वी त्यांनी असाच प्रकारचे वक्तव्य केले होते. मात्र अडचणीत आल्यावर आपण असं काही बोललोच नाही असं ते सांगतात.

मागील काही वर्षात राष्ट्रीय पातळीवरच्या राजकारणात दिग्विजय सिंह यांनी काही स्टेटमेंट केले ज्यामुळे त्यांची मुस्लिम धार्जिणी भूमिका बनवण्यात आली.

भाजप, बजरंग दल आयएसआय साठी काम करते

दिग्विजय सिंह यांनी २०१९ मध्ये पत्रकार परिषद घेत भाजपचे नेते आणि बजरंग दलचे सदस्य पैसे घेवून आयएसआय साठी हेरेगिरी करतात असा आरोप केला होता.

बजरंग दलाचे काही सदस्य आणि भाजपचे पदाधिकारी जे कि आज पण पाकिस्तानची गुप्तचर संघटना आयएसआय साठी काम करतात. भाजपच्या कार्यकाळात त्यांना जामिनावर सोडण्यात आल्याचा आरोप सुद्धा दिग्विजय सिंह यांनी केला होता.

 हिदुंची कट्टरता ही मुस्लिम कट्टरता सारखी  हानिकारक असल्याचे सांगितले होते.

करकरे यांच्या जीवाला हिंदू संघटनांपासून धोका

डिसेंबर २०१० मध्ये एका कार्यक्रमात दिग्विजय सिंह यांनी सांगितले होते कि, मुंबई वरील २६/११ च्या हल्ल्याच्या काही तासापूर्वी एटीएस प्रमुख हेमंत करकरे यांच्याशी माझ बोलन झाले होते. त्यावेळी करकरे यांनी सांगितले होते कि, मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात हिंदू आतंकवाद्याना पकडल्याने माझ्या जीवाला दक्षिण भारतातील हिंदू संघटनांन पासून धोका आहे. असा दावा दिग्विजय सिंह यांनी भर सभेत केला होता.

यावरून मोठा वाद निर्माण झाला होता. हेमंत करकरे यांच्या पत्नी कविता करकरे यांनी हा दावा फेटाळून लावला होता.

आतंकवाद्यांचा उल्लेख आदरार्थी

पाकिस्तानी दहशतवादी संघटना भारत कशा प्रकारे अशांत राहील यासाठी प्रयत्न करत असतात.  दिग्विजय सिंह यांनी मुंबई वरील दहशतवादी हल्लाच्या मास्टरमाइंड लष्कर-ए-तोयबाचा प्रमुख हाफिज सईद याचा उल्लेख हाफिज साहेब असा केला होता.

९/११ हल्ल्याच्या कर्ताधर्ता ओसामा बिन लादेन याच्या हत्येनंतर अमेरिकेच्या सैन्याने त्याला जलसमाधी दिली होती. यावर दिग्विजय सिंह यांनी आक्षेप घेत अमेरिकेचे वागण चुकीचे असल्याचे सांगितले होते. त्याच वेळी ओसामा बिन लादेन याचा ओसामाजी असा आदरार्थी उल्लेख केला होता.

आतंकवाद्यांचा उल्लेख आदरार्थी केल्याने त्यांच्यावर बरीच टीका झाली होती.

बाटला हाउस एनकाउंन्टर फेक असल्याचा दावा

२००८ मध्ये दिल्लीत बॉम्बस्फोट झाले होते. यात इंडियन मुजाहिद्दीने घडवून आणल्याचे समोर आले होते.

दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली होती कि, इंडियन मुजाहिद्दीनचे ५ दहशतवादी बाटला हाउस येथे लपून बसले आहे. १३ सप्टेबर २००८ दिल्ली पोलीस आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली होती. त्यात ५ दहशतवाद्यांचा  एनकाउंन्टर करण्यात आला होता.

बाटला हाउस एनकाउंन्टर हा फेक असल्याचा दावा दिग्विजय सिंह केला होता. या एनकाउंन्टर मध्ये आतंकवाद्याच्या डोक्याला ५ गोळ्या लागल्या होत्या. डोक्याला ५ गोळ्या कशा लागू शकतात असा प्रश्न उपस्थित करून दिग्विजय सिंह यांनी  बाटला हाउस एनकाउंन्टर फेक असल्याचा दावा केला होता. त्यावेळी केंद्रात कॉंग्रेसचे सरकार होते.

मध्यप्रदेश आणि राष्ट्रीय राजकारणात आपल्या उलट्या चालीसाठी फेमस असणारे दिग्गीराजा एका बाजूला आषाढीची वारी देखील करतात आणि दुसरीकडे मुस्लिम धार्जिणी भूमिकादेखील मांडतात. त्यांची खेळी अजून कोणाला समजलेली नाही.

हे ही वाच भिडू 

 

Leave A Reply

Your email address will not be published.