… दिवसाला सरासरी साडेसातशे हिंदूंना बांगलादेश सोडून जावं लागतं

बांगलादेशची राजधानी ढाका येथील इस्कॉन राधाकांता मंदिराची गुरुवारी संध्याकाळी तोडफोड करण्यात आली. संध्याकाळी भक्त बुद्ध पौर्णिमा उत्सवाची तयारी करत असताना, श्री राधाकांता मंदिराच्या आवारात २०० लोकांचा जमाव घुसला आणि त्यांच्यावर हल्ला केला. पण बांगलादेशातील लोकांसाठी हिंदूंसाठी ही नित्याची बाब झाली आहे. गेल्या ऑक्टोबरमध्ये पण बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्यांक्यांवर हल्ले झाले होते.

दुर्गापूजा उत्सवादरम्यान बांगलादेशातील हिंदू अल्पसंख्याकांवर झालेल्या हल्ल्यात सहा ठार आणि अनेक जखमी झाले होते.

मात्र, मुस्लिमबहुल बांगलादेशात धार्मिक हिंसाचाराच्या ह्या पहिल्याच घटना नाहीयेत.

बांग्लादेशी मानवाधिकार संघटना ऐन ओ सालिश केंद्र (ASK) नुसार २०१३ पासून, बांगलादेशात अशा प्रकारचे किमान ३६०० हल्ले झाले आहेत.

बांगलादेशच्या १७० दशलक्ष लोकसंख्येपैकी ८.५ टक्के हिंदू आहेत, तर मुस्लिमांची संख्या ९० टक्के इतकी आहे. सरकारी आकडेवारीनुसार १९४७ मध्ये फाळणीच्या वेळी हिंदूंची लोकसंख्या सुमारे ३० टक्के होती. ११९८० च्या दशकात हिंदू लोकसंख्या १३.५ टक्के होती.

ढाका विद्यापीठातील अर्थशास्त्रज्ञ आणि प्राध्यापक, अबुल बरकत यांनी केलेल्या संशोधनानुसार बांगलादेशातून दररोज ७५० हिंदूंचे स्थलांतर होते.

त्यापैकी बहुतेक जण सुरक्षित भविष्य आणि चांगल्या आर्थिक परिस्थितीच्या आशेने भारताचा रस्ता धरतात.

आणि  या

“हल्ल्यामागील कारण म्हणजे अल्पसंख्याकांना त्यांच्या घरातून हाकलून लावणे, बांगलादेशातील अल्पसंख्याक लोकसंख्या कमी करणे”

असं राणा दासगुप्ता जे बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिल (BHBCUC) चे सरचिटणीस आहेत ते  DWशी बोलताना सांगतात.

या हल्यांमागची प्रमुख कारणं बघितली तर

पाहिलं म्हणजे तिथलं सरकार ‘कडी निंदा’ करतं पण जमिनीवर आरोपी मोकळेच असतात. 

या हल्यानमागील पॅटर्न ठरलेला असतो. पाहिलं फेसबुकवर काहीतरी पोस्ट केले जातं आणि मग अल्पसंख्यांकांनी  ‘इस्लामचा अपमान’ केला असा प्रचार केला जातो आणि नंतर लोकांचा एक गट धार्मिक अल्पसंख्याक राहत असलेल्या  ठिकाणी हल्ला करतो. यानंतर सत्ताधारी अवामी लीग पक्ष हल्ल्यानंतर धार्मिक कट्टरपंथीयांना दोषी ठरवतो आणि दोषींवर कारवाई करण्याचे वचनही देतो. परंतु नंतर काहीही होत नाही आणि हल्ल्यांसाठी कोणालाही शिक्षा होत नाही.

शेख हसिनांचा अवामी लीग सत्तेत आल्यानंतर आपल्यावरील हल्ले कमी होतील अशी हिंदू समजला अशा होती पण तसं काहीच होताना दिसत नाही.

दुसरं म्हणजे जमात-ए-इस्लामची भूमिका

बांगलादेशातील सर्वात मोठा इस्लामी पक्ष असलेल्या जमात-ए-इस्लामच्या समर्थकांनी हिंदूंवरील हल्ल्यांमध्ये मोठी भूमिका बजावली आहे. काही वर्षांपूर्वी या पक्षाच्या सदस्यांना १९७१ च्या पाकिस्तानसोबतच्या युद्धात केलेल्या युद्धगुन्ह्यांसाठी तुरुंगात टाकण्यात आल्याने हा पक्ष राजकीयदृष्ट्या फारसा सक्रिय झालेला नाही. मात्र अजूनही धार्मिक कट्टरतावाद जोपासण्यात जमात-ए-इस्लाम आघाडीवर असते.

तिसरं ..

राज्य आणि धर्म या संदर्भात स्पष्ट भूमिकेच्या अभावामुळे बांगलादेशात वाढलेला कट्टरतावाद 

बांगलादेशने १९७१ मध्ये स्वतःला धर्मनिरपेक्ष राज्य घोषित केले होते. रहमान नंतर आलेल्या लष्करी हुकूमशहा हुसेन मुहम्मद इरशाद यांनी १९८८ मध्ये इस्लामला राज्य धर्म म्हणून घोषित करत एक पाऊल पुढे टाकले. या लष्करी राजवटींनी त्यांच्या  घटनाबाह्यपणे बळकवलेल्या सत्तेला कायदेशीर मान्यता देण्यासाठी धर्माचा आधार घेण्यास सुरवात केली होती.

१९९१ नंतरच्या लोकशाही राजवटींनीही  राजकारण आणि संधीसाधूपणाचा मार्ग अवलंबत बहुसंख्यांक मुस्लिम समाजाचे तुष्टीकरण चालूच ठेवले. बांगलादेशचा १९७५ पासूनचा इतिहास स्पष्ट करतो की धार्मिक कट्टरतावाद दीर्घकाळापासून बांग्लादेशच्या राजकारणात किंगमेकर ठरत आहे. सोप्या भाषेत सांगायचे तर राज्यकारभारात वाढलेला इस्लामचा हस्तक्षेप आणि धर्मनिरपेक्षतेला नाकारणं यामुळे  कट्टरतावाद वाढण्यास मदत झाली.

आणि  कितीही नाही म्हटलं तर भारतातल्या घटनांचा बांगलादेशावर पडणारा परिणाम 

गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, जेव्हा बांगलादेशात हिंदूंच्या विरोधात दंगली उसळल्या, तेव्हा पंतप्रधान शेख हसीना यांनी भारतावर जातीयवाद वाढल्याचा आरोप केला आणि सांगितले की बांगलादेशातील हिंदूंवरील हल्ल्यांमागे भारतातील अल्पसंख्याकांवर (मुस्लिम) अत्याचार हेही एक कारण आहे. भारतातीळ मुस्लिम अल्पसंख्याकांवर अन्याय झाल्यास अनेकवेळा बांगलादेशमध्ये त्याचं भांडवल करून हिंदूंविरोधात द्वेष पसरवला जातो.

भारताचे बांगलादेशच्या स्वत्रंत संग्रामातील योगदान असू दे की दोन्ही देशांना जोडणारी सुमधुर बांगला कि दोन्ही देशांचे राष्ट्रगीत लिहणारे रवींद्रनाथ टागोर. या सगळ्या गोष्टी आता मागे पडत असून आर्थिक प्रगती साधणाऱ्या बांगलादेशात कट्टरतावादीही वाढत आहे हे आजचं सत्य आहे.

हे ही वाच भिडू :

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.