आठवलेंनी काढलेल्या चुकांमधून कळतंय की दस्तुरखुद्द थरूरांचंपण इंग्लिश चुकू शकतंय

रामदास आठवले आणि शशी थरूर हे राजकारणाव्यतिरिक्त त्यांच्या इतर कलागुणांमुळं देखील फेमस आहेत. शशी थरूर यांच्या ब्रिटिशांनापण लाजवेल अशा इंग्लिशचे आणि रामदास आठवले यांच्या कवितांचे लाखो फॅन्स आहेत. हे दोघंही आपल्या या कलांचं सादरीकरण वेळोवेळी संसदेत करतंच असतात. आता मात्र हे दोघं एकमेकांपुढे आलेत आणि रामदास आठवले यांनी शशी थरूर यांचा इंग्लिशचा क्लास घेतला आहे.

त्याचा झालं असं की मोदी सरकारच्या बजेटवर टीका करताना शशी थरूर यांनी एक ट्विट केलं.

त्यामध्ये केंद्रीय वित्तमंत्री निर्मला सीतारामन ह्या अर्थसंकल्पाबाबतच्या प्रश्नांना उत्तरं देताना दिसत आहेत. तर त्याच वेळी त्यांच्या मागे बसलेल्या रामदास आठवले यांच्या चेहऱ्यावरील भावांवरून शशी थरूर यांनी अर्थसंकल्पावर शशी थरूर यांनी कोपरखळी हाणली. ते म्हणाले की, अर्थमंत्र्यांनी सुमारे दोन तास ‘Bydget debate’ वर rly(reply) दिल्यानंतरही रामदास आठवलेंच्या चेहऱ्यावरील स्तब्ध आणि अविश्वसनीय भाव सांगतात की, ट्रेजरी बेंचसुद्धा वित्तमंत्र्यांकडून अर्थव्यवस्था आणि अर्थसंकल्पाबाबत केलेल्या दाव्यांवर विश्वास ठेवू शकत नाहीत.

आता शशी थरूर यांनी डिवचल्यावर रामदास आठवले हे शांत बसले नाहीत.

त्यांनी शशी थरूर यांच्या budget ची bydget आणि reply ची rly अशी झालेली स्पेल्लिंग मिस्टेक बरोबर पकडली. एवढयावरच नं थांबता आठवले यांनी  लिहिले की, प्रिय शशी थरूर जी विनाकारण दावे आणि विधाने करताना चुका होणं साहजिक आहे.

 

मग जुगलबंदी चालूच राहिली आणि शशी थरूर यांनी रामदास आठवले यांना रिप्लाय दिला. 

मी माझी चूक मान्य करतो. निष्काळजीपूर्वक केलेलं टायपिंग हे चुकीच्या इंग्लिशपेक्षा मोठं पाप आहे असं म्हटलं आहे. पण त्याचबरोबर तुमच्या या इंग्लिशच्या क्लासचा जेएनयू मधल्या कोणाला तरी जास्त फायदा होऊ शकतो असं म्हणत त्यांनी  जेएनयूच्या नवीन कुलगुरूंनाही टोला हाणला.

पण आता शशी थरूर यांच्या सारख्याकडून इंग्लिश कसं काय चुकू शकतं असं जर तुम्हाला वाटत असेल तर त्यांची ही पहिलीच वेळ नाहीये. या आधी ही त्यांची ग्रामर आणि स्पेल्लिंग मिस्टेक या दोन्ही प्रकारच्या चुका चर्चेचा विषय झाल्या होत्या.

आता ह्याच ट्ववीटमध्ये बघा शशी भाऊंनी umpires च्या ऐवजी empires लिहलंय.

एवढचं नाही तर शशी थरूर यांचं चुकीचं ग्रामर पण एकदा पकडण्यात आलं होतं.

 

सुहेल सेठनं त्यावेळी शशी थरूर यांची मिस्टेक पकडली होती. आता शशी थरूर नेहमीच अशा चुका करत नाहीत. तसेच त्यांच्या तोडीचं इंग्लिश भारतातल्या खूप कमी जणांना जमतंय. त्यामुळं या प्रसंगातून घेण्याची एकंच गोष्ट म्हणजे इंग्लिश काय आपली भाषा नाहीये आणि शशी थरूर यांच्यासारखी लोकंपण इंग्लिशमध्ये चुकू शकतात.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.