मारुतीराव परबांची लेक संपूर्ण भारतात गुड्डी मारुती म्हणून फेमस झाली…

९०’ज च्या सिनेमांचा विषयच वेगळा होता. मेलॅडियस गाणी, भरपूर हाणामारी, हिरो हिरोईनची जब्राट जोडी आणि कॉमेडी. तेव्हा हिरोईनच्या सोबतीला एक मैत्रीण असायची बघा जी भरपूर कॉमेडी करून सिनेमातला कॉमेडी सिन खाऊन टाकायची आणि हिरो हिरोईनच मार्केटसुद्धा ओढून घ्यायची. आजचा किस्सा त्याच कॉमेडी मैत्रिणीचा जी देखण्या हिरोईनसोबत असायची.

आजचा किस्सा आहे एकेकाळच्या कॉमेडीच्या क्वीनला रिप्लेस करणाऱ्या ताहिरा परबचा. ज्यांना आपण प्रेमाने गुड्डी मारुती म्हणून ओळखतो. ४ एप्रिल १९५९ साली जन्मलेल्या ताहिरा परब यांचे वडील मारुती परब हे स्वतः एक प्रोड्युसर, डायरेक्टर आणि ऍक्टर होते. आई कमल परब यासुद्धा अभिनेत्री म्हणून प्रसिद्ध होत्या. 

गुड्डी मारुती यांना आपण बऱ्याच सिनेमामधून कॉमेडी करताना पाहिलं असेल त्यापैकी शोला और शबनम, बीवी नंबर वन, चमत्कार, खिलाडी आणि अशा अनेक सिनेमांमध्ये.

हि यादी खूप मोठी आहे. गुड्डी मारुती यांचं खरं नाव ताहिरा परब पण त्यांचं गुड्डी मारुती हे नाव पडण्यामागे मजेदार कारण आहे.

ताहिरा परब यांचे वडील मारुती परब हे इंडस्ट्रीतले एक नामवंत निर्माते, ऍक्टर आणि डायरेक्टर होते ,त्यांनी दिग्दर्शित केलेल्या सिनेमांमध्ये हम सब चोर हे, बागी शेहजादा, कहि आर कही पार, सब उस्ताद हे अशा सिनेमांचा समावेश होता. त्यावेळी ताहिरा आपल्या वडिलांसोबत सिनेमाची शूटिंग पाहायला जात असे. एकदा तिथे एक सिनेमा बनत होता ज्याचं नाव होतं जान हाजीर हें, ज्यात एका बाळ कलाकाराची गरज होती त्यावेळी छोट्या ताहिराला तो रोल मिळाला.

ताहिरा यांचं घरचं नाव गुड्डी होतं, त्यामुळे पिच्चरच्या क्रेडिटमध्ये त्यांचं नाव गुड्डी असच ठेवण्यात आलं. मनमोहन देसाई हे ताहिराचं नाव बदलायचा विचार करत होते. त्यांना गुड्डी हे नाव आवडलं होतं, पण जेव्हा कोणी विचारत कि गुड्डी कोण ? मारुतीजींची मुलगी. यावरून त्यांचं नाव पडलं गुड्डी मारुती.

वयाच्या १४ व्या वर्षी सौ दिन सास के या सिनेमात त्यांनी काम केलं. त्याकाळात प्रीती गांगुली या विनोदी रोल तुफ्फान करायच्या पण या सिनेमाच्या वेळी त्यांनी वजन कमी केलं आणि सिनेमात गाणी होतं मोटी पल्ले पे गयी. त्यामुळे डिरेक्टरने गुड्डी मारुतीला या सिनेमात निवडलं.

त्यांच्या जाड शरीराने त्यांना अनेक विनोदी रोल मिळवून दिले. त्यांच्या वडिलांचं निधन झाल्यावर गुड्डी मारुतीने घरची सगळी जबाबदारी उचलली. अनेक लोकांनी गुड्डी मारुतीला सांगितलं कि तू हिरोईन बन पण गुड्डी मारुतीने प्रिया गांगुलीला बघूनच निर्णय घेतला होता कि हिरोईन बनायचं नाही. कारण प्रिया गांगुलीने वजन कमी करून हिरोईन होण्याचं ठरवलं आणि ती बॉलिवूडमधून बाहेर फेकली गेली. 

मारुती परब यांचं निधन झालं तरी इंडस्ट्रीत त्यांचे बरेच मित्र होते त्यांनी गुड्डी मारुतीला सिनेमानं मध्ये भरपूर संधी दिल्या. जेव्हा गुड्डी मारुती शाळेत जात असे तेव्हा लोकं त्यांच्या जाड शरीरावरुन त्यांची चेष्टा करायचे. तेव्हा गुड्डी मारुती शाळेतल्या मुलांना बेदम मारायची. पण वडिलांनी बजावल कि,

गुड्डी तू सिनेमाची हिरोईन नाही तर तू कॉमेडियन आहे, यासाठी गरज आहे कि तू आधी स्वतःवर हस म्हणजे तुला लोकांना हसवता येईल.

जोवर गुड्डी मारुती सिनेमांमध्ये काम करत होती तोवर कुठल्याही प्रोड्युसरने तिला वजन कमी करण्यास सांगितलं नाही. पुढे एका व्यवसायिकाबरोबर गुड्डी मारुतीने लग्न केलं. सिनेमांनंतर गुड्डी मारुती टेलिव्हिजनकडे वळल्या आणि मालिकांमध्ये दिसू लागल्या.

पेहलाज निहलानी, डेव्हिड धवन, अभिनव कुमार सारख्या दिग्गज दिग्दर्शकांसोबत काम केलं. मोठमोठ्या अभिनेत्यांसोबत ती दिसून आली, मोठ्या हिरोईन्सची ती मैत्रीण म्हणून दिसून आली. बॉलिवूडमध्ये त्यांनी आपल्या कॉमेडीची एक जबरदस्त छाप सोडली जी अजूनही कोणाला मोडता आलेली नाही. 

टूनटून, प्रिया गांगुली यांनी जो कॉमेडीचा ट्रेंड सुरु केला होता तो गुड्डी मारुतीने उत्तमरीत्या पुढे आणला आणि इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवला.

हे हि वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.