पंजाबमध्ये आता काँग्रेस आणि आदमी पार्टीत जोरदार ‘मीम-वॉर’ पेटलंय
राजकीय पुढाऱ्यांएवढा आयक्यू कदाचितच कोणचा असेल. शिक्षण कमी असू दे की जास्त यांच्या बुद्धीपुढं भल्याभल्यांचा टिकाव लागत नाही. तुमचे कितीही बदल होऊ द्या राजकीय नेते बदल सहज स्वीकारतात मग ते पार्टी बदलणं असू दे की दुसरे बदल. आता हेच बघा की कोरोनाच्या पार्श्वभूमीवर येणाऱ्या ५राज्यांतील निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं प्रचारावर काही बंधनं घातली आहेत.
त्यामध्ये राजकीय पक्षांना मोठ्या मोठ्या रॅली घेता येणार नाही हे त्यातलंच एक होतं.
पण हा पण बदल पक्षांनी बरोबर उचलला. राजकीय पक्षांनी मग डिजिटल प्रचार करायला सुरवात केलीय. सोशल मीडियावर प्रचार करत असताना देखील तरुणाईचं लक्ष वळवण्यासाठी पक्ष नवनवीन आयडिया शोधून काढतायत. मीम पोस्ट करणं हे त्यातलाच एक.
आम आदमी पार्टीने त्यांचे पंजाबचे मुख्यमंत्री पदाचे उमेदवार भगवान मान याची घोषणा एका हटके पद्धतीनं केली.
Punjab's next CM is in the house!#AAPdaCM pic.twitter.com/E2EIcxwVep
— AAP (@AamAadmiParty) January 18, 2022
आम आदमी पक्षाच्या विडिओमध्ये काँग्रेसच्या चन्नी आणि सिद्धू या भांडणांबरोबरच आम आदमी पार्टीनं भगवान मान यांची जबरदस्त एंट्री दाखवली. ‘हे बेबी’ या पिक्चरमधल्या ‘मस्त कलंदर’ या गाण्यावर आम आदमी पार्टीने कॉमेडियन भगवान मान यांना एकदम करेक्ट लाँच केलं. अपेक्षेप्रमाणं व्हिडिओ जोरदार चालला.
मात्र क्रिएटिव्हिटी दाखवायच्या नादात आम आदमी पार्टीने सोशल मीडियावर बोलणीही खालली.
विद्या बालनला खुर्चीची उपमा देऊन केलेलं ‘वूमन ऑब्जेक्टिफिकेशन’ इंटरनेटवरच्या व्होक ( woke) जनतेनं बरोबर ओळखलं.
आता आम आदमी पार्टीने केलेल्या ट्रोलिंगमुळं मात्र काँग्रेस चांगलीच दुखावली होती.
एवढी की टेक्नॉलॉजिचा उपयोग करण्यात मागे आहे असा आरोप होत असेलल्या काँग्रेसने डायरेक्ट अव्हेंजर्सच्या थीमवरचा व्हिडिओ पंजाब काँग्रेसच्या ऑफिशियल ट्विटर हॅन्डलवरून टाकला.
We will do whatever it takes to redeem our beloved state from the clutches of evil forces working against the interest of Punjab and its people. #CongressHiAyegi pic.twitter.com/6lVxqkN4VC
— Punjab Congress (@INCPunjab) January 24, 2022
मुख्यमंत्री चरणजित सिंग चन्नी यांना थॉर दाखवण्यात आलंय तर पंजाब काँग्रेस प्रमुख नवज्योत सिंग सिद्धू (कॅप्टन अमेरिका) आणि राहुल गांधी (ब्रूस बॅनर) दाखवण्यात आलं. चन्नी यांच्यासोबत पंजाब काँग्रेसचे माजी प्रमुख सुनील जाखड आहेत, ज्यांना ग्रूट म्हणून दाखवण्यात आले आहे.
३४-सेकंदाची क्लिप चन्नी यांनी खलनायकांना फेकून दिल्याने संपते, ज्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपचे प्रमुख अरविंद केजरीवाल, अकाली दलाचे प्रमुख सुखबीर सिंग बादल आणि माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांचा समावेश आहे.
आता ह्या क्लिप मध्ये तुम्ही अजून एक गोष्ट नोटीस केली असेल तर चन्नी यांनी आपणच कसे पंजाब काँग्रेसमध्ये एक नंबर आहोत हे दाखवून देत एकाच व्हिडिओतून विरोधी पक्ष आणि पक्षांतर्गत विरोधक यांच्यावर निशाण साधला आहे.
बाकी विषय निघालाच आहे तर छत्तीसगढ काँग्रेसचं ट्विटर अकाउंटपण लै वांड मीम टाकत असतंय. आपले मुंबई आणि पुणे पोलिसांचे ट्विटर अकाउंट ही जबरदस्त मीम टाकून कायदा समजावतात. आता कॅम्पेन कसं चालतंय हे माहित नाही पण राजकारण ही हलक्या-फुलक्या पद्धतीनं करता येतंय हे दिसणं खरंच स्वागतार्ह्य गोष्ट आहे.
हे ही वाच भिडू :
- हे खतरनाक मीम्स आले आणि लॉकडाऊन असूनही २०२१ भारी गेलं ….
- किंग बॉबीचे मिम्स फेमस करण्यामागे पाकिस्तानी चाहत्याचा हात आहे
- दोन भाषांच्या अस्तित्वाच्या लढ्यात पंजाब- हरियाणाचं विभाजन करण्यात आलं