घरच्यांच्या विरोधापायी पायलट होता आल नाही, मग ती १० चार्टर्ड विमानांची मालकीन झाली

एका ४ वर्षाच्या मुलीने आपल्याला मोठं होऊन पायलट व्हायचे आहे असे सांगितले होते. मात्र, मुली पायलट बनत नाहीत असे तिला घरांच्यानी सांगितले होते. एव्हिएशन इंडस्ट्री ही पुरुषाची मक्तेदारी समजली जाते. आजही महिला पायलटचे प्रमाण नगण्य आहे. 

पुढे जाऊन ती मुलगी पायलट तर बनली नाही मात्र आता तिच्या कंपनीच्या मालकीचे १० चार्टर्ड विमान असून  उद्योजक नेते, अभिनेते तिच्याकडून ही विमाने भाड्याने घेतात. 

कनिका टेकरीवाल असे या तरुणीचे नाव असून अवघ्या २४ व्या वर्षी चार्टर्ड विमान भाड्याने देणारी कंपनी स्थापन केली होती.

कनिका ही मारवाडी फॅमिलीतुन येते. मारवाडी लोकांच्या रक्तातच व्यवसाय असतो. कनिकाच्या बाबतीत अपवाद होता. तिला बिझनेस करण्याऐवजी पायलट व्हायचे होते. मात्र, घरच्यांनी त्याला विरोध केला. मुली पायलट होत नाही. तू या सगळ्या भानगडीत वेळ घालवू नकोस असा सल्ला दिला होता.

त्यामुळे कनिकाने पायलट बनण्याचे आपले स्वप्न मागे ठेवले आणि आर्ट डिझाइंग करू लागली.

१२ वी नंतर कनिकाने २००५ मध्ये कनिकाने भोपाळ सोडून मुंबई गाठली आर्ट डिझाईनच्या कॉलेजला ऍडमिशन घेतले.  कॉलेज सुरु असतांना एका कंपनीसाठी डिझाईनिंगच काम करू लागली होती. मात्र, तिने विमान, हेलिकॉप्टर बद्दलचे आपले प्रेम कमी होऊ दिले नाही.

कामानिम्मित कनिका मुंबईतील एका मोठ्या बिल्डरच्या ऑफिस मध्ये गेली होती. त्या बिल्डरला कनिकाने तुमच्या हेलिपॅडची जागा चुकल्याचे सांगितले. त्यांनी ते चुकल्याचे मान्य केले. डिझाइनींगच काम करणाऱ्या १७ वर्षांच्या मुलीला एव्हिएशन मधलं इतकं कसं समजते असा प्रश्न त्या बिल्डरला पडला होता.

तेव्हा कनिकाने सांगितले की, विमान, हेलिकॉप्टरयाची प्रचंड आवड असून मी त्या संदर्भांत प्रचंड वाचन केलं आहे.

त्या बिल्डरने कनिकाला ऑफर दिली की, तू बिझनेस प्लॅन करून दे आपण एव्हिएशन कंपनी सुरू करु.  त्यासाठी कनिकाला १ महिन्याची मुदत देण्यात आली होती. मात्र, तिने फक्त १२ दिवसातच  बिझनेस प्लॅन बिल्डरला दिला.पुढे त्या बिल्डरने स्वतःची एव्हिएशन कंपनी सुरु केली. कनिका बिल्डरच्या त्या कंपनीत २ ते ३ वर्ष कामाला होती. 

त्यानंतर कनिका एमबीए करण्यासाठी लंडनला निघून गेली. लंडनवरून परत आल्यानंतर कनिकाने स्वतःची एव्हिएशन कंपनी सुरु करण्यासाठी हालचाली सुरु केल्या. मात्र, नियतीला हे मान्य नव्हते असेच म्हणावे लागले. भारतात परत आल्यावर तिला कॅन्सर झाल्याचे कळाले. त्यामुळे तिचे सगळे काम थांबले. कनिकाने एक वर्षात कॅन्सरवर मात केली. आणि कामाला लागली 

कनिकाला ओला, उबर सारख्या कंपन्यांच्या मॉडेलचा वापर करून चार्टर्ड विमानाचा व्यवसाय सुरु करायचा होता. 

विमान वाहतूक उद्योगात काम केल्याचा अनुभव कनिकाकडे होता. हे सगळं सुरु करतांना कनिकाकडे फक्त ५ हजार ६०० रुपये होते. पहिल्यांदा कनिकाने चार्टर विमान बुक करण्यासाठी एक ॲप तयार केले.चार्टर्ड विमान असणाऱ्या श्रीमंत माणसे, कंपन्या सोबत संपर्क केला. आणि आपली संकल्पना सांगितली. त्या ॲप मध्ये या चार्टर्ड विमानांना ऍड केले. ज्या कोणाला चार्टर्ड विमान भाड्याने हवे होते त्यांना ते ॲपच्या माध्यमातून बुक करता येत होते. 

 २०१४ मध्ये कनिकाने जेट सेट गो’ कंपनीची स्थापन केली

देशातील उद्योजक, नेते, अभिनेते सारख्या मोठ्या लोकांसाठी ही कंपनी सुरु केली होती. या लोकांना कामानिम्मित एका दिवसात ४ ते ५ शहरांना भेटी द्यावा लागतात. त्यांना चार्टर्ड विमान बुक करून देण्याचे काम कनिका करू लागली होती. व्यवसाय चालविण्यासाठी तिने अगोदर काही ग्राहकांकडून आगाऊ रक्कम घेतली आणि विमान कंपन्यांकडून क्रेडिट घेतले होते. 

एका क्लिकवर लोकांना चार्टर्ड विमान बुक करता येऊ लागल्याने त्यांचे ग्राहक खूष होऊ लागले होते. तर दुसरीकडे चार्टर्ड विमानांना चांगले भाडे मिळू लागले होते. कार प्रमाणे फोन वर प्रायव्हेट जेट बुक करता येऊ लागले होते.  

कनिका झालेल्या फायद्यातील काही टक्के विमान मालकांना देऊ लागली होती. तर दुसरीकडे  ग्राहकांना लक्झरी सेवा देण्यात येत होती. ग्राहक आणि मालक यांच्याकडून मागणी वाढत होती.  

दिल्ली, मुंबई, चैन्नई, हैद्राबाद येथे कंपनीचे ऑफिस असून तिथे २०० पेक्षा जास्त कर्मचारी कामाला आहेत. २०२०-२१ मध्ये जेट सेट गो कंपनीच्या माध्यमातून चार्टड विमानाची ६ हजार उड्डाणे झाली आणि त्यात १ लाख लोकांनी प्रवास केला

याबाबत बोलतांना कनिका म्हणते की,

उद्योगपती, नेते, अभिनेते यांच्याशी बोलतांना जाणवले की, चार्टर्ड विमान बुक करणे अवघड काम होते. तर दुसरीकडे चार्टर्ड विमान मालक व्यवस्थान करता येत नव्हते, दिवसेंदिवस खर्च वाढत होता, येणारे पैसे कमी होते त्यामुळे मालक ही विमाने विकण्याची तयारी करू लागली होती. या सगळ्यांना एकत्र घेत जेट सेट गो नावाची कंपनी सुरु केल्याचे कनिका सांगते. 

विविध प्रकारचे २८ चार्टर विमान आणि ४ हेलिकॉप्टरच्या माध्यमातून सेवा देते. यातील १० विमाने कनिकाच्या मालकीची आहेत. जेट सेट गो ही कंपनी ‘उबर ऑफ प्रायव्हेट जेट अँड हेलिकॉप्टर’ म्हणून ओळखली जाते.

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.