१९७१ च्या युद्धात पाकच्या नौसेनेला समुद्राचा तळ दाखवणारा महाराष्ट्राचा हिरो : कॅप्टन सामंत.

१९७१ च्या युद्धातल्या भारतीय सैन्याच्या पराक्रमाच्या कथा आपण अनेकदा वाचल्या आहेत. या युद्धात भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या नौसेनेला कराची मध्ये जावून अस्मान दाखवलं होतं ते देखील आपण बोलभिडूवर वाचलं असेल. याच युद्धातले एक शूरवीर सैनिक म्हणजे कॅप्टन एम.एन.सामंत.

महाराष्ट्राच्या या वीरपुत्राचं बांग्लादेशच्या मुक्तीसंग्रामात मोठं योगदान होतं. त्यांच्या पराक्रमाची आणि संघर्षाची ही गाथा.

कॅप्टन मोहन सामंत हे मुळचे महाराष्ट्राच्या सिंधदुर्ग जिल्हातील. लहानपणापासून छत्रपती शिवरायांच्या पराक्रमाच्या कथा ऐकत मोठे झालेले. सिंधुदुर्गाची निर्मिती, आरमार या सगळ्याचा परिणाम म्हणून हिंदवी स्वराज्याने दर्यावर राज्य केलं होतं. मोहन सामंत यांना देखील भारतभूसाठी हेच करायचं होतं.

भारतीय नौसेनेत ते अधिकारी बनले. १९६९ साली त्याची भारतीय नौसेनेच्या करंज या पाणबुडीवर अधिकारी म्हणून नेमणूक झाली.

ते साल होतं १९७१ चं.

बांग्लादेश फाळणीचा प्रश्न धगधगत होता. तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी बांग्लादेशला मदत करण्याचं ठरवलं होतं. भारत पाकिस्तान युद्धाची घोषणा झाली होती.

युद्धास सुरवात व्हायची होती. आज बांग्लादेश म्हणून ओळखला जाणारा देश त्या काळात पुर्व पाकिस्तान होता.

पुर्व पाकिस्तानातल्या बंगालच्या उपसागरात पाकिस्तानची नौसेना पुर्व पाकिस्तानचं संरक्षण करण्यासाठी सज्ज होती. युद्धाचा ज्वर पेटत होता आणि याच काळात पुर्व पाकिस्तानवर हल्ला करण्यासाठी सज्ज असणाऱ्या INS करंज या पाणबुडीवर कॅप्टन सामंत अधिकारी म्हणून जबाबदारी पहात होते.

युद्धास सुरवात झाली आणि पाकिस्तानच्या नौसेनेला काही कळण्याच्या आतच कॅप्टन सामंत यांच्या नेतृत्वाखाली INS करंज या पाणबुडीने पाकच्या मोंगला आणि खुलना बंदरावर हल्ला केला.

पहिल्या टप्यामध्ये खुलना बंदर टार्गेट करण्यात आलं होतं. पहिल्याच हल्यात  पाकिस्तानच्या नौसेनेचं प्रचंड नुकसान झालं. कॅप्टन सामतं यांच्या सैन्याची फत्ते झाली.

मोंगला बंदर उडवल्यानंतर त्यांनी आपला मोर्चा खुलना या बंदराकडं वळवला.

खुलना बंदरावर पाकिस्तान नौसेनेची मोठी तुकडी होती. त्या दिशेने जाण्याची वाट देखील जिकीरीची होती. खुलना बंदरावर हल्ला करणं अवघड होतं. असं असताना देखील कॅप्टन सामंत यांनी या बंदरावर हल्ला करण्याची जबाबदारी पार पाडली आणि ती यशस्वी केली.

खुलना बंदरावर हल्ला करण्यात आल्यानंतर दोन्ही बाजूच्या सैन्याकडून जोरदार युद्धास सुरवात झाली. मात्र अचानकपणे पाकिस्तानच्या हवाई दलाने भारतीय नौसेनेवर हल्ला केला. या हल्ल्यात भारतीय नौसेनेबरोबर सहभागी झालेल्या बांग्लादेशच्या दोन बोटी देखील नेस्तानाबुत झाल्या.

आकाशातून पाकिस्तानच्या हवाई दलाचा हल्ला सुरू होता. तर समोरून पाकिस्तानच्या नौसेनेचा हल्ला सुरू होता. दोन्ही बाजूने होणाऱ्या या हल्यात कॅप्टन सामंत यांच्यासह भारतीय सैन्य अडकलं होतं.

मात्र अशावेळी त्यांनी हार न मानता धैर्यानं या परिस्थितीला तोंड दिलं. नेस्तनाबुत झालेल्या बांग्लादेशच्या बोटीतील सैन्य वाचवण्याच श्रेय देखील कॅप्टन सामंत यांना जातं. अखेर या यु्द्धात भारतीय नौसेनेनं पाकिस्तानच्या नौसेनेला नेस्तानाबुत करून विजय मिळवला होता.

यु्द्ध संपल्यानंतर या युद्धात अतुलनीय, धाडसी आणि उत्तुंग अशी कामगिरी केल्याबद्दल,

कॅप्टन सामंत यांना मानाचं महावीर चक्र देऊन सन्मानित करण्यात आले.

बांग्लादेशची निर्मिती झाल्यानंतर कॅप्टन सामंत यांनी बांग्लादेशची नौसेना उभारण्यात सुद्धा महत्वाची भुमिका निभावली असल्याचं सांगण्यात येतं. त्यांना काही काळ तिथल्या नौसेनाप्रमुख पदाची जबाबदारी निभावावी लागली होती.

कॅप्टन एन.एम.सामंत यांच २०मार्च २०१९ रोजी मुंबई मध्ये वयाच्या ८९ व्या वर्षी निधन झालं. 

हे ही वाच भिडू. 

Leave A Reply

Your email address will not be published.