छोट्या महागुरूंनी आपल्या डान्समधून भारत-चीन युद्धावेळी मदत केलेली..!!!

1962 साली भारत चीन युद्ध झालं. त्यापूर्वी म्हणजे 1961 साली शम्मी कपूर यांचा जंगली सिनेमा रिलीज झाला होता. हा सिनेमा तुफान चालला, पण त्याहून चाललं ते या सिनेमातलं याहू हे गाणं.. 

शम्मी कपूर याहू चाहे कोई मुझे जंगली कहैं म्हणत या सिनेमात तुफान नाचले होते. साहजिक त्यांच्या डान्सने अबालवृद्धांवर जादू केलेली. कॉलेजची मुलं याच गाण्यावर पोरींनी पटवण्याचा प्रयत्न करायची.

तेव्हाचा काळ हा हिप्पी संस्कृतीला कुठेतरी मोकळीक करुन देणारा होता. आपल्या याच जंगली पणाला बाहेर काढणार हे गाणं आहे असा विचार तरुणाईंच्या मनात होता. त्यातूनच हे गाणं तूफान चाललं. 

जसं या गाण्याचं वेड मोठ्यांना होतं तसच लहान मुलांना देखील या गाण्याचं वेड लागलं.

यातच शरद पिळगावकर यांचा चार वर्षांचा मुलगा सचिन पिळगावकर होता. घरी एखादा पाहूणा आला की शरद पिळगावकर याहू चं रेकॉर्डिंग लावायचे. ४ वर्षांचा सचिन त्यावर तुफान डान्स करायचा. 

त्यानंतरचे वर्ष आले ते भारत चीन युद्ध घेवून. या युद्धात भारताचा लाजिरवाणा पराभव झाला होता. सैन्याला मदत करण्यासाठी सिनेसृष्टी देखील समोर आली होती. वेगवेगळ्या क्षेत्रातील लोकं आपआपल्या परीने शक्य ती मदत करत होते. अशातच सिनेमातल्या काही दिग्गज मंडळींनी चीन युद्धात भारताला मदत करण्यासाठी एक कार्यक्रम बांधला होता. 

या कार्यक्रमात ऐ मेरे वतन के लोगों या गाण्याचा समावेश करण्यात आला होता.

सोबतच वेगवेगळ्या कलाकरांचे वेगवेगळे कार्यक्रम ठेवण्यात आले होते. त्यामुळे लोकांचे मनोरंजन पण होत होते व कार्यक्रमातून पैसे देखील मिळत होते. हे सर्व मिळालेले पैसे देशाच्या मदतीसाठी जात असत. 

याच कार्यक्रमात अवघ्या ४ वर्षांच्या सचिनला याहू गाण्यावर डान्स करण्याचा चान्स देण्यात आला. ४ वर्षांचा सचिनने या कार्यक्रमातून जादू केली. शम्मी कपूरप्रमाणेच तो तुफान नाचायचा. त्याच्या डान्समुळे इतर कार्यक्रम मागे पडले व सचिनची जादू चालू झाली. सचिन डान्स करू लागला की प्रेक्षकांतून नोटा, चिल्लर स्टेजवर पडायच्या. लोकं गर्दीतून वाट काढत यायचे आणि छोट्या सचिनला पैशाच्या नोटांचा हार घालायचे. 

या कार्यक्रमामुळे मिळालेले सर्व पैसे भारत चीन युद्धात भारताच्या मदतीसाठी गेले.

पण सचिनसाठी देखील हा कार्यक्रम माईलस्टोन ठरला. कारण याच डान्समुळे हा मार्ग ऐकला या सिनेमात त्याला बालकलाकाराचा रोल मिळाला. महाराष्ट्र शासनाकडून सचिनला या भूमिकेसाठी सर्वोत्कृष्ठ बालकलाकार म्हणून पारितोषिक देण्यात आलं. पुढे १९६७ साली सचिनला मजली दिदि साठी राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. देशपातळीवर सचिनला बालकलाकार म्हणून गौरवण्यात आलं.

ज्या शम्मी कपूरच्या गाण्यामुळे सचिनला हे यश मिळालं त्याचं शम्मी कपूर सोबत ब्रह्मचारी सिनेमात डान्स करण्याचा चान्स सचिनला मिळाला. भारत चीन युद्धापासून सुरू झालेला त्याचा हा प्रवास आजही अखंड चालू आहे. 

हे ही वाच भिडू 

Leave A Reply

Your email address will not be published.