जेव्हा माईक टायसन म्हणाला होता की मी धारावीच्या मुलांना भेटायला आलोय,सलमानला नाही…

माईक टायसन हे नाव न ऐकलेले फार कमी लोकं सापडतील. स्पोर्ट्स जॉनरच्या लोकांना माहितीच असेल की माईक टायसन काय चीज आहे ते. भले भले बहाद्दर एका ठोश्यात गारद करणारा बॉक्सर म्हणजे माईक टायसन. जगातला टॉप रँकिंगचा माईक टायसन एकदा मुंबईत आला होता आणि इथं तो भारतीय मीडियावर आणि सलमान खानवर घसरला होता, काय किस्सा होता जाणून घेऊया.

सप्टेंबर 2018 साल होतं. मुंबईत मिक्स मार्शल लीगचं आयोजन करण्यात आलेलं होतं. या लीगच्या लॉंचिंगसाठी खास माईक टायसन आला होता या प्रवासात तो बऱ्याच लोकांना भेटला आणि भारतात त्याची असलेली क्रेझ त्यानं अनुभवली. मुंबईत आल्यावर तो त्याच्या चाहत्यांना भेटण्यासाठी उत्सुक तर होताच शिवाय त्याला विशेषकरून धारावीला भेट द्यायची होती, तिथल्या लहान मुलांसोबत त्याला बोलायचं होतं. धारावी ही आशियातली सगळ्यात मोठी झोपडपट्टी मानली जाते तिथे खेळाचं प्रमाण काय आहे, तिथली मुलं जागतिकीकरणाच्या युगात कुठं पोहचली आहेत असं सगळं त्याला माहिती करून घ्यायचं होतं.

एक पत्रकार परिषद सुद्धा माईक टायसनसाठी आयोजित करण्यात आलेली होती. त्यात माईक टायसन म्हणाला होता की

सर्वात यशस्वी लढवय्ये झोपडपट्ट्यांमधून आले आहेत. सध्याचे सर्व आघाडीचे लढवय्ये झोपडपट्टीतील आहेत, मला वाटते की तुम्ही जितके गरीब तितके चांगले बॉक्सर आहात तो पुढे म्हणाला. “मी एक स्लमडॉग आहे. मी झोपडपट्टीत वाढलो. मला झोपडपट्टीतून बाहेर पडण्याची महत्त्वाकांक्षा होती आणि म्हणूनच मी येथे आलो आहे.

आता हा झाला एक भाग व दुसरीकडे अशा अफवा पसरल्या होत्या की माईक टायसनचं स्वागत करायला बॉलिवूडचा सगळ्यात मोठा सुपरस्टार सलमान खान येणार आहे. सलमान आणि माईक एकाच फ्रेममध्ये असणे हे किती आश्चर्यकारक चित्र असेल याबद्दल लोक बोलू लागले. मग त्या पत्रकार परिषदेमध्ये माईक टायसनला प्रश्न विचारण्यात आला की तो दबंग फेम स्टारला भेटण्यासाठी आणि त्याच्यासाठी आयोजित केलेल्या “ग्रँड पार्टी” मध्ये जाण्यास उत्सुक आहे का आणि यावर माईक टायसनने एकदम जबऱ्या उत्तर दिलं होतं

“मी झोपडपट्टीत जात आहे. त्याला सांगा, मी झोपडपट्टीत जात आहे, मी पार्टीला जात नाही,” मी धारावीच्या मुलांना भेटायला आलोय, सलमान खानला नाही.

काही दिवसांनंतर, टायसनने धारावीतील काळा किल्ला मराठी शाळेला भेट दिली जिथे तो कोण आहे याची कल्पना नसलेल्या विद्यार्थ्यांनी त्याचे स्वागत केले परंतु त्याच्या उपस्थितीने वातावरणात उत्साह निर्माण झाला. तो कोण होता हे मात्र शिक्षकांना माहीत होते.

माईक टायसन हा असाच माणूस आहे. फ्रँक, प्रामाणिक आणि एखादी व्यक्ती जी एखाद्या मोठ्या फिल्म स्टारने किंवा आकर्षक स्वागत पार्टीने प्रभावित होऊ शकत नाही. शून्यातून आलेल्या मुलांना भेटण्यासाठी तो तिथे आला होता, जसे त्याने केले आणि त्याला हवे ते मिळाले.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.