मोगलीचं टायटल सॉंग विशाल भारद्वाजला बॉलिवूडमध्ये मोठा ब्रेक देऊन गेलं…..

ज्यावेळी एखादा सिनेमा चांगला गाजतो तेव्हा त्यातल्या हिरो हिरोईनची आणि त्यांच्या अभिनयाची चर्चा जास्त होते पण त्यामागे असलेल्या डायरेक्टरचं तितकं कौतुक होत नाही, पण आता यात बरीच प्रगती झाली आहे आज डिरेक्टर लोकांना चांगले दिवस आलेलं आहेत. आजचा किस्सा अशा एका डिरेक्टरचा जो खरंतर म्युझिक डिरेक्टर बनायला आला पण पुढे भारताच्या सिनेमा क्षेत्रातला मोठा दिग्दर्शक बनला.

विशाल भारद्वाज हे नाव सिनेमा रिलेटेड लोकं सोडली तर इतर जास्त लोकांना माहिती नसेल, पण त्याचे सिनेमे बऱ्याच लोकांनी पाहिलेले असेल, त्याची गाणी ऐकलेली असेल. ४ ऑगस्ट १९६५ साली विशाल भारद्वाजचा जन्म उत्तर प्रदेशात झाला. सुरवातीला विशाल भारद्वाज क्रिकेटमध्ये जाणार होता पण अंगठ्याला झालेल्या दुखापतीमुळे तो गाण्याकडे वळला. 

वयाच्या १७ व्या वर्षी विशाल भारद्वाजने संगीत बनवायला सुरवात केली होती. घरी वडिलांचा संगीताकडे ओढा होता आणि ते संगीत क्षेत्रात कार्यरतसुद्धा होते. वडिलांनी उषा खन्ना यांच्याशी विशाल भारद्वाजला भेटवून दिलं. पुढे उषा खन्नाने १९८५ साली विशाल भारद्वाजचं संगीत एका सिनेमात वापरलं होतं.

पण विशाल भारद्वाजला खऱ्या अर्थाने ब्रेक मिळाला तो मोगली या मालिकेमुळे. मोगली हि मालिका प्रत्येकाच्या मनाच्या अगदी जवळची. तर या जंगल बुक सिरियलच टायटल काय असावं यावर चर्चा चालू होती. दिल्लीमधून विशाल भारद्वाज नुकतेच मुंबईला शिफ्ट झाले होते. स्ट्रगल करत असताना एनएफडीसीने जंगल बुक सिरीयल तयार करण्याचं काम सुरु केलं होतं. 

या सिरियलच टायटल अगोदर दुसरं कोणीतरी करत होतं, पण ऐन शेवटच्या वेळी अगोदरच्या म्युझिक डिरेक्टरने या सिरियलच टायटल ट्रॅक करण्यास मनाई केली. मग यावर उपाय म्हणून गुलजार यांनी थेट विशाल भारद्वाजला बोलावून घेतलं आणि सांगितलं कि या सिरियलचं टायटल ट्रॅक आपण करतोय पण ते गाणं उद्याच रेकॉर्ड होणार आणि पुढच्या दिवशी मालिका टीव्हीवर दिसणार आहे.

रविवारच्या दिवशी विशाल भारद्वाज गुलजारांच्या घरी गेले. विशाल भारद्वाजांनी काही ट्यून त्यांना ऐकवल्या आणि लगेचच गुलजारांनी त्यावर ओळी लिहिल्या. त्यात ओळी होत्या

जंगल जंगल बात चली है पता चला है

चड्डी पेहनके फुल खिला है फुल खिला है….

गाणं रेकॉर्ड झालं आणि रिलीजसुद्धा झालं.

हे गाणं विजय भारद्वाजला मोठं यश देऊन गेलं. गुलजार-विशाल भारद्वाज या जोडीने एक धमाल गाणं मालिकाविश्वाला दिलं होतं. आजही जर आपण नीट बघितलं तर मोगलीचं टायटल ट्रॅक अजूनही ताज आणि लोकांच्या पसंतीचं आहे. 

हे गाणं इतकं गाजलं होतं कि २६ जानेवारीला जी परेड असते आणि एक एक झलक दाखवली जाते त्यात एक झाँकी हि चड्डी पेहनके फुल खिला है या गाण्याची सुद्धा होती. हे त्या काळचं नॅशनल अँथम बनलं होतं. या गाण्यानंतर विशाल भारद्वाजचं नाव झालं आणि पुढे गुलजारांनी त्यांना माचीस या सिनेमासाठी संगीतकार म्हणून निवडलं.

पुढे विशाल भारद्वाजने ओमकारा, मकबूल, हैदर, डेढ इश्किया असे अनेक जबरदस्त सिनेमे बनवले. नंतर आला हॉलीवूडमधला जंगलबुक सिनेमा. २३ वर्षानंतर पुन्हा हे गाणं वाजायला लागलं. हे गाणं जेव्हा री रिकॉर्ड केलं तेव्हा सुद्धा विशाल भारद्वाज यांच्याकडे एकच दिवस होता. एका दिवसात हे गाणं पुन्हा शुट करण्यात आलं. पुन्हा या गाण्याला लोकांकडून चांगली पसंती मिळाली होती.

बॉलिवूडमध्ये म्युझिक करायला आलेला विशाल भारद्वाज आज एक उत्कृष्ट संगीतकार तर आहेच शिवाय बेस्ट दिग्दर्शकसुद्धा आहे.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.