संगीतकार मदन मोहन यांची शेवटची इच्छा २९ वर्षानंतर वीर झारा सिनेमातून पूर्ण झाली…

बॉलिवूडची खासियत म्हणजे गाणी. बॉलीवूडला अनेक उच्च प्रतीचे संगीतकार लाभले. आपल्या संगीताने बॉलीवूडला एक नवीन संजीवनी प्राप्त झाली. अशाच एका म्युझिक डिरेक्टरचा आजचा किस्सा ज्याने बॉलीवूडला दिलेली गाणी आजही मैलाचा दगड मानली जातात आणि त्याने तयार केलेली गाणी आजसुद्धा तितकीच क्लासिक मानली जातात.

संगीतकार मदन मोहन

मदन मोहन यांची कारकिर्दसुद्धा कुठल्या फिल्मी स्टोरीपेक्षा कमी नाही. एका बाजूला युद्धाच्या मैदानात दुष्मनांवर गर्जणारी बंदूक आणि दुसरीकडे संगीत क्षेत्रात मनाला एका वेगळ्या विश्वात नेणारी गाणी, या दोन्ही गोष्टी वेगळ्या असल्या तरी या दोन्हींचा सुंदर मिलाप घडवून आणला होता तो संगीतकार मदन मोहन यांनी.

मदन मोहन यांनी देशाच्या सेवेखातर सीमेवर जाऊन अगोदर आपलं काम केलं आणि जेव्हा ते परत फिरले तेव्हा संगीतरूपी खजिना त्यांनी बॉलीवूडला बहाल केला. संगीत क्षेत्रात येण्याअगोदर मदन मोहन हे सैन्यात लेफ्टनंट पदावर होते. मदन मोहन यांचा जन्म मूळचा बगदादचा जिथं त्यांचे वडील चुन्नीलाल कोहली इराकी पोलिसांमध्ये नोकरीला होते. 

भारतात परतल्यावर मदन मोहन यांच्या वडिलांनी त्यांना आजी आजोबाकडे ठेवलं आणि ते व्यापार करण्यासाठी वेगवेगळ्या ठिकाणी फिरू लागले. ब्रिटिशांकडून रायबहादूर हि पदवी चुन्नीलाल कोहली यांना मिळाली होती, पण त्यांची मुळात इच्छाच नव्हती कि त्यांचा मुलगा संगीत क्षेत्रात जावा. पण मदन मोहन यांचा रस्ताच वेगळा होता.

आर्मीमध्ये मदन मोहन यांचं मन लागलं नाही म्हणून ते संगीताकडे वळले. वडिलांची असणारी ओळख त्यांना कामा आली आणि त्यांनी बॉलिवूडमध्ये आपली एंट्री नोंदवली.

आपकी नजरो ने समजा, झुमका गिरा रे, लग गले, कर चले हम फिदा अशा अनेक अजरामर संगीतरचना त्यांनी केल्या. बॉलिवूडमध्ये आपल्या शैलीचं संगीतपर्व मदन मोहन यांनी सुरु केलं.

मदन मोहन यांनी जवळपास बरेच जॉनर हाताळले पण त्यांची एक इच्छा अपुरी राहिली होती. त्यांची इच्छा होती कि त्यांनी तयार केलेल्या गाण्यावर अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी एकत्र नाचावेत. यासाठी त्यांनी दोन तीन गाणे वेगळे बनवून ठेवलेले होते. पण तसा योग आलाच नाही. १४ जुलै १९७५ रोजी मदन मोहन यांचं निधन झालं. 

मदन मोहन यांची अपूर्ण इच्छा पूर्ण झाली ती वीर झारा या सिनेमातून. मदन मोहन यांचे सुपुत्र संजीव कोहली याना माहिती होतं कि आपल्या वडिलांची बरीच गाणी लोकांपर्यंत पोहचायची बाकी आहेत. संजीव कोहलीला संधी मिळाली तेव्हा त्याने दिग्दर्शक यश चोप्रा यांना ती गाणी ऐकवली, यश चोप्रा यांना गाणी आवडली आणि त्यांनी वीर झारा या  सिनेमात वापरायची ठरवली.

जेव्हा वीर झारा हा सिनेमा प्रदर्शित झाला तेव्हा यात अमिताभ बच्चन आणि हेमा मालिनी ‘ लो आ गयी लोहडी वे ‘ या गाण्यावर नाचत होते.  सिल्व्हर स्क्रीनवर हे गाणं संजीव कोहली यांनी पाहिलं तेव्हा त्यांनी वडील मदन मोहन यांना अभिवादन केलं. मदन मोहन यांचं स्वप्न अशा प्रकारे पूर्ण करून बॉलीवूडने त्यांना एक प्रकारे श्रद्धांजली वाहिली होती. 

आजसुद्धा मदन मोहन यांची गाणी क्लासिक हिट आहेत, अजूनही रियालिटी शोजमध्ये हि गाणी गायली, वाजवली जातात. बॉलीवूडला एक अजरामर संगीत पर्वणी बहाल करून मदन मोहन यांनी संगीत क्षेत्रात आपली  सोडली आहे कि ती कुणालाही हटवता येणार नाही.

हे हि वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.