माजी मुख्यमंत्र्यांच्या सुटकेनंतर हरियानातलं राजकीय चित्र पालटणार असल्याचं बोललं जातंय

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओमप्रकाश चौटाला लवकरच जेलमधून बाहेर पडणार आहेत. तिहार जेल प्रशासनानं चौटाला यांचे वकील अमित साहनी यांना याबाबत माहिती दिली. त्यानुसार ओमप्रकाश चौटाला   यांनी आपली शिक्षा पूर्ण केलीये आणि त्यांना स्पेशल परमिशनचा अधिकार असल्याचं तिहार जेल प्रशासनानं  म्हटलंय.

चौटाला यांची  शिक्षा पूर्ण झाल्याच्या बातमीनंतर इंडियन नॅशनल लोक दलाच्या नेते आणि कार्यकर्त्यांत अर्थातच  उत्साहाचं वातावरण पाहायला मिळतंय. दरम्यान, चौटाला यांच्या सुटकेच्या चर्चेनंतर हरियाणाचे राजकीय वातावरण तापलंय आणि यातूनच राज्याच्या राजकीय समीकरणात बदल होणार असल्याची शक्यता वर्तवली जातेय.

जेबीटी घोटाळ्यामुळं झाली होती अटक 

१९९९- २००० साली १८ जिल्ह्यांत ३२०६ ज्युनियर बसिक ट्रेंड (जेबीटी) शिक्षकांची भरती करण्यात आली होती.  यावेळी  भरतीतील निकषांकडे दुर्लक्ष करून मनासारख्या उमेदवारांच्या  भरती प्रकरणी   चौटाला यांच्याबरोबर  ५५ जणांवर आरोप करण्यात आले होते. याप्रकरणी सीबीआयच्या विशेष कोर्टाचे न्यायाधीश विनोद कुमार यांनी शिक्षक भरती घोटाळ्यात दोषी ठरलेल्या ५५ लोकांपैकी १० जणांना शिक्षा सुनावली होती. 

यात १० वर्षांची शिक्षा सुनावणाऱ्यांमध्ये  ओमप्रकाश चौटाला, त्याचा मोठा मुलगा अजय चौटाला आणि आयएएस अधिकारी संजीव कुमार, चौटाला यांचे माजी विशेष अधिकारी विद्याधर आणि तत्कालीन आमदार शेरसिंह बादशमी  त्यांचा समावेश होता. तर बाकी आरोपींमधल्या एकाला ५ वर्षाची तर बाकीच्यांना ४-४ वर्षाची शिक्षा सुन्यावण्यात आली होती.

ओमप्रकाश चौटाला जेलमधून सुटताच राजकीय हालचालींना वेग येणार 

ओमप्रकाश चौटाला जेलमधून सुटण्याआधीच हरियाणाच्या राजकारणात खळबळ उडालीये. त्याच्या सुटकेनंतर राज्यात नवीन राजकीय समीकरण तयार होणार असल्याचं बोललं जातंय. काही दिवसांपूर्वीच काँग्रेस आणि ईएनडीएलच्या जवळीकतेचे अंदाज बांधले जात होते, त्यात आता चौटाला यांच्या मैदानात उतरल्यानंतर हे चित्र आणखी स्पष्ट होण्याची अपेक्षा आहे.  

दरम्यान, शेतकरी आंदोलनाच्या समर्थनार्थ ओमप्रकाश चौटाला यांचा मुलगा  अभय सिंह चौटालाने विधानसभेच्या सदस्यपदाचा राजीनामा दिलाय. पण  राज्याच्या शेतकऱ्यांवर आपली मजबू पकड असल्या कारणानं आता ईएनडीएलला आणखी सॉफ्ट कॉर्नर मिळणार असल्याचं बोललं जातंय.

दुसरीकडे ओमप्रकाश चौटाला यांच्या सुटकेमुळे त्यांचा मुलगा अजय सिंह चौटाला आणि नातू दुष्‍यंत चौटाला यांच्यात नवा वाद सुरु होणार असल्याचं दिसतंय.

मध्यंतरी झालं असं होत कि,  चौटाला जेव्हा जेलमध्ये होते, तेव्हा त्यांच्या कुटुंबात वाद निर्माण झाला होता.  ज्यामुळे त्यांचा नातू दुष्यंत चौटालाने ईएनडीएलमधून बाहेर पडत जननायक जनता पार्टी स्थापन केली होती.

त्यानंतर  गेल्या विधानसभा निवडणुकीत या पक्षानं चांगलं प्रदर्शन करत ११ जागांवर विजय मिळवला होता.  आणि दुष्यंत चौटाला यांनी भाजपशी हातमिळवणी केली होती. दुष्यंत   यांना राज्य सरकारमध्ये उपमुख्यमंत्री पदाची जबाबदारी सुद्दा देण्यात आलीये.

असं असलं तरी, आपल्या आजोबांच्या सुटकेवर दुष्यंत यांनी आनंद व्यक्त केलाय.  त्यांनी म्हंटल कि, ‘तिहाड जेल प्रशासनानं ई- मेल पाठवलाय, ज्यात हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांच्या सुटकेविषयी बोललं गेलय. या बातमीमुळं मी फार आनंदी आहे.  दुष्‍यंत यांनी म्हंटल  कि, ‘त्यांचे दादा ओम प्रकाश चौटाला आणि डॉ अजय सिंह चौटाला यांना एक कट रचून शिक्षा सुनावली गेली होती.  आता त्यांची शिक्षा पूर्ण झाल्यानंतर त्यांच्या सुटकेच्या बॅटमुळे मी फार आनंदी आहे.’

शिक्षा पूर्ण करायला अजून सहा महिने बाकी

१६ जानेवारी २०१३ ला चौटाला यांना अटक करण्यात आली होती.  आदेशानुसार त्यांना १० वर्षांची शिक्षा होती. परंतु, दिल्ली सरकारनं कोरोना परिस्थितीचा विचार करता सुप्रीम कोर्टाच्या आदेशावर जेलच्या नियमात बदल केले.

त्याअंतर्गत चांगल्या  वागणुकीबरोबरच ज्या कैद्यांची  १० वर्षांची शिक्षा पूर्ण होतेय अश्या कैद्याच्या शिक्षेत सहा महिन्यांची सूट देण्यात येणार आहे.  त्यानुसार चौटाला यांनी नियमित सूट मिळून साडे नऊ वर्षांची शिक्षा पूर्ण केलीये. त्यामुळे त्यांना ६ महिन्याआधीच सोडण्यात येतेय. 

दरम्यान, ओमप्रकाश चौटाला सध्या जामिनावर बाहेर आहेत.  सुटकेसाठी त्यांना आधी तिहार तुरुंगात यावे लागेल आणि तेथून कागदोपत्री कामकाज पूर्ण केल्यावर, शिक्षा पूर्ण करण्याच्या आदेशासोबतच सुटकेचे आदेशही दिले जातील.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.