जगात असा एकमेव माणूस आहे ज्याची कबर चंद्रावर आहे….

चंद्रावर आजवर बारा लोकांनी मूनवॉक केलेला आहे. निल आर्मस्ट्राँग हा पहिला माणूस होता ज्याने चंद्रावर पहिलं पाऊल ठेवलं. पण एक माणूस असा आहे जो कधी चंद्रावर गेला नाही पण त्याची कबर ही थेट चंद्रावर बांधण्यात आली आहे.

चंद्रावर ज्याची कबर बांधण्यात आली आहे त्या माणसाचं नाव आहे युजीन शुमेकर ( eugene shoemaker ).

ते अमेरिकेत भूविज्ञान शास्त्रज्ञ होते. युजीन शुमेकर यांना अमेरिकेचे माजी राष्ट्रपती जॉर्ज वॉकर बुश यांनी राष्ट्रीय पदक देऊन सन्मानित केलं होतं. भूगोल बद्दल त्यांना जास्त आकर्षक होतं. भूगोलाबद्दल त्यांना अनेक चमत्कारिक माहिती ज्ञात होती.

युजीन शुमेकर हे चंद्रावर जाण्याचं स्वप्न बाळगून होते. हे चंद्रावर जाण्याचं त्यांना इतकं वेड होतं की त्यांनी नासाच्या काही परीक्षाही दिल्या होत्या पण शारीरिक कमतरता असल्याने त्यांना प्रवेश नाकारण्यात आला होता. शुमेकर यांनी चंद्राच्या खड्ड्यांचा, घाटांचा आणि टेकड्यांचा अभ्यास केला होता त्याचा शोध घेऊन आणि त्यांचं नामकरण सुद्धा त्यांनी केलं होतं. त्यांनी अवकाशात असलेल्या धूमकेतूच्या नोंदी ठेवलेल्या होत्या आणि ते आवडीने लोकांना त्याबद्दल सांगत असत.

युजीन शुमेकर यांच्या या विपुल संशोधनामुळे एका धुमकेतूच नाव त्यांच्या नावावरून ठेवण्यात आलेलं होतं. 1997 साली ते एका धुमकेतूचा शोध आणि अभ्यास करत असताना त्यांच्या कारला अपघात झाला आणि त्यांचं निधन झालं. युजीन शुमेकर यांना श्रद्धांजली देण्यासाठी त्यांच्या एका जुन्या विद्यार्थ्याने शुमेकर यांच्या अस्थी चंद्रावर पोहचवण्यासाठी नासाशी संपर्क केला होता.

नासाने या गोष्टीला होकार केला तेही प्रायोगिक तत्त्वावर. 1998 मध्ये आपल्या लुनार प्रोस्पेक्टर मिशनच्या माध्यमातून युजीन शुमेकर यांच्या अस्थी चंद्रावर नेण्यात आल्या आणि तिथंच त्यांची कबर बांधण्यात आली. हा अनोखा पराक्रम करणारे युजीन शुमाकुर पहिले आणि शेवटचे व्यक्ती ठरले.

हे सोडाच पण काही साय फाय मुव्हीज बघून अनेकांनी हा अस्थी पाठवण्याचा खेळ केला पण अवकाशात गेल्यावर पृथ्वीच्या 2 ऱ्या कक्षेपर्यंतचं जाऊ शकल्या आणि वातावरण बदलामुळे त्या खाक झाल्या.

हे ही वाच भिडू :

Leave A Reply

Your email address will not be published.