पा रंजितने आंबडेकरवाद पिक्चरमध्ये मांडला आणि पिक्चर सुपरहिटसुद्धा करून दाखवले

वेडी झालीस का? देवाच्या अंगावर चढतेस?

मुलीला बुद्धांच्या चढलेलं पाहून चिढलेला बाप जोरात आवाज देतो. त्यावर मुलीने दिलेला उत्तर थक्क करणारं होतं.

 “बुद्धाने सांगितले आहे की देव नाही, तुम्ही त्याला देव का म्हणता?”

पा रंजित यांची नवीन शॉर्टफिल्म असेलला धम्मम या शॉर्टफिल्ममधला हा प्रसंग. एका बाजूला सनातन  धर्माकडून बुद्धांना विष्णूचा अवतार मानून बुद्धाचं दैवतीकर होत असल्याचा आरोप असताना पा रणजित यांनी आपलं म्हणणं कोणताही गोंगाट नं करता अगदी ठळकपणे मांडलेलं दिसतं.

अट्टकठी, मद्रास, कबाली, काला,सरपट्टा परमबारै या सर्व पिक्चरमधून पा रंजित यांनी दलित आयडेंटिटीला एका वेगळ्या लेव्हलला नेऊन ठेवल्याचं दिसतं.

आणि ते पण ठसठशीतपणे लोकांच्या मनावर बिंबवून. एवढं कि पा रंजित यांच्याबाबद्दल लिहताना शोषित आणि दलित हे शब्द एकत्र वापरण्यासही हात कचरतो. कारण पा रणजित यांच्या पिक्चरमध्ये जी दलित आयडेंटिटी दिसते ती लढवैय्यी आणि स्वाभिमानी.

लहानपणापासून जी जातीयवादी व्यवस्था पहिली होती त्या व्यवस्थेविरुद्धचा उठाव पा रंजित यांच्या प्रत्येक चित्रपटातून दिसतो. तमिळ चित्रपटसृष्टीत प्रवेश करण्यापूर्वी  पा रंजित यांनी आपल्या वंचित लोकांना पडद्यावर लुळे-पांगळे, गुंड, दारूबाज आणि गावाच्या हसण्याच्या विषय अशा रीतीने दाखवतना पहिले होते.

2006 मध्ये जेव्हा त्याने इंडस्ट्रीत पाऊल ठेवले तेव्हा देखील रंजित यांना त्यांची पार्श्वभूमी आणि त्यांची  ओळख आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे ते दलित आहे याबद्दल बोलू नका असे सांगण्यात आले होते. 

मात्र दलित समाजाच्या होणाऱ्या स्टिरियोटिपिकल आणि चुकीच्या वर्णनामुळे ते संतापले होते. यामुळेच त्यांनी आपल्या लोकांच्या, आपल्या समाजाच्या, आपण पाहिलेल्या गोष्टी पडद्यावर आणण्यासाठी त्यांनी दिग्दर्शिकाच्या खुर्चीत बसण्याचा निर्णय घेतला.

आज पा रंजित पडद्यावर ज्या स्टोरी सांगतात त्याला त्यांनी लहानपानपासून सोसलेल्या जातीभेदाचाही पदर आहे.

१९८२ मध्ये जन्मलेल्या रंजीत यांचं बालपण गेलं चेन्नईच्या झोपडपट्टीत. त्यांचं घरही एमजीआर मुखमंत्री असताना चालू झालेल्या एका सरकारी स्कीमध्ये बांधून देण्यात आलं होतं. शहरात असल्याने गाव खेड्यात जसा जातिभेद सहन करावा लागतो तसा इथं करावा लागत नाही असा एक सर्वसामान्य समज असतो. मात्र रंजित सांगतात दुकानदारांनी त्यांना त्यांच्या हातात कधीच सुट्टे पैसे का दिले नाहीत ? त्यानं नेहमी पिण्यासाठी वेगळे पाणी का दिले गेले? हे प्रश्न मात्र त्यांना नेहमी सतावत होते. 

ऍनिमेशनमध्ये करिअर करण्यासाठी त्यांनी मद्रास फाइन आर्ट्स कॉलेजमध्ये प्रवेश घेतला परंतु त्यांचा मोठा भाऊ प्रभू जो एका दलित संघटनेशी संबंधित वकील होता त्याचा त्यांच्यावर खूप प्रभाव पडला.

2006 मध्‍ये थंगपणसामी नावच्‍या चित्रपटात त्यांनी सहाय्यक दिग्दर्शक म्‍हणून त्‍याची सुरूवात झाली. 

त्याचवेळी त्यांची ओळख निर्माते सी.व्ही.शी कुमार यांच्याशी झाली. त्यांनीच  2012 मध्ये रंजित यांचा पहिला चित्रपट,अट्टाकथीची निर्मिती केली होती. पुढे स्टुडिओ ग्रीन जे तमिळ या प्रोडक्शन हाऊसने चित्रपटाचे वितरण हक्क विकत घेतले तेव्हा हा चित्रपट आणखीनच भव्यदिव्य झाला. अट्टाकथी आखि तामिळ सिनेसृष्टीतील राजकीय विषयावरील मास्टरपीस म्हणून ओळखला जातो. पुढे स्टुडिओ ग्रीनने त्यांचा चित्रपट मद्रास देखील तयार केला आणि इथूनच सुरु झाला तामिळ सिनेमातला एक धगधगता प्रवास.

पुढे पा रंजित यांनी सुपरस्टार रजनीकांत यांच्याबरोबर कबाली आणि काला हे दोन हिट सिनेमे केले.

या सिनेमातुन सामाजिक विषमतेचा प्रश्न मांडलेला होताच पण त्याचवेळी हे पिक्चर बॉक्सऑफिसवर हिट देखील होते. दलितांचा विषय मांडला आहे म्हणून क्रिटिक्स चॉईस पुरस्कार देण्यात यावा या कॅटॅगरीतील ते पिक्चर नव्हते तर अगदी मुख्य धारेतील सिनेमे असावेत अगदी तसे ते सिनेमे होते. 

डिप विषय आणि तरीही बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ यांचा सुवर्णमध्य कसा साधता आला याचं उत्तर स्वतः पा रंजित यांनीच दिलं आहे. 

“जर माझा चित्रपट माझी भाषा बोलला तर तो लोकांपर्यंत पोहोचणार नाही. लोकप्रिय चित्रपट निर्मात्याला प्रथम प्रेक्षकांशी जोडून घ्यावं लागेल आणि त्यांना सांगावे लागेल की तो त्यांच्यापेक्षा वेगळा नाही. माझी भाषा, चित्रपट, पात्रे ही आजपर्यंत प्रेक्षकांचं ज्यानं मनोरंजन झालं आहे त्याच्याशी जुळतीच असली पाहिजेट” असं पा रणजित यांनी इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या एका मुलाखतीत सांगितलं आहे.

याचा अर्थ असाही होतो कि त्यांना एकदा दुसरा प्रवाह निर्माण करण्याऐवजी मेन स्ट्रीममध्येच क्रांतिकारी काम करायचं आहे.

 “मला एक नुसता दलित चित्रपट निर्माता म्हणून ओळख निर्माण करायची नाहीये.” 

असं पा रणजित अगदी स्पष्टपणे सांगतात.

म्हणूनच पारंजित यांचा रजनीकांत बुद्ध विहाराच्या बॅकग्राऊंडने एंट्री घेतो. तर सरपट्टा पारंबराई मध्ये बुद्ध आणि आंबेडकरांची प्रतिमा दिसते. तर कालामध्ये पेरियार आणि महात्मा फुले यांचे पुतळे दिसतात.

आपली विचारधारा पोहचवण्यासाठी सिनेमात वापरणात आलेली प्रतीकात्मकता हे पा रंजित यांच्या पिक्चरचा सर्वात मोठं वैशिष्ट म्हटलं तरी चालेल. जे फक्त वंचितांच्या आयकॉनच्या फ्रेम पिक्चरच्या फ्रेममध्ये आणण्यापुरती मर्यादित नाहीये.

कालामध्ये पा रंजित यांनी रंगांचा प्रतीकात्मक वापर अतिशय काळजीपूर्वक वापर  केलेला दिसतो. 

काला पिक्चरमध्ये काळा म्हणजे काहीतरी खालच्या दर्जाचं आणि पांढरा म्हणजे उच्च या वर्षानुवर्षे चालत आलेल्या आपल्या समाजातील समजावर त्यांनी जोरदार प्रहार केलेला दिसतो. कालाच्या क्लायमॅक्स सीनमध्ये निळा, काळा आणि लाल हे तीन कलर एकत्र येतात.

आंबेडकरवाद (निळा) आणि पेरियार (काळा) आणि डाव्या (लाल) या तीन विचारसरणींच्या जुलमी राजवटीचा पराभव करण्यासाठी या तीन विचारधारांनी एकत्र येणं गरजेचं आहे हे स्टेटमेंट पा रंजित यांनी एक शब्दही नं काढता स्क्रीनवर दाखवलेलं दिसतं.

अजून एक उदाहरण द्यायचं झाल्यास रंजित यांच्या पिक्चरमधील सिनोमॅटोग्राफीचं देता येइल. 

रंजीत यांच्या चित्रपटातील कॅमेरा अनेकदा डोळ्याच्या लेव्हलला चालतो. आम्ही हिरोच्या बरोबरीने आहोत कधीकधी त्यांच्या मागे किंवा त्यांच्या बाजूने देखील असू मात्र त्याचवेळी आम्ही त्याच्या बरोबरीचेच आहोत असं यातून पा रंजित यांना दाखवून द्यायचं असतं. आंबेडकरांनी व्यक्ती पूजा लोकशाहीसाठी कशी धोकादायक आहे सांगून ठेवलंय आणि पा रंजित यांनी ते आंबेडकरांच्या इतर विचारांसारखंच ते सत्यात उतरवलंय.

लोकांपर्यंत पोहोचणे आणि त्यांच्याशी त्यांच्याच भाषेत बोलणे या कल्पनेतुन रंजीत आता पुस्तके, लघुपट, संगीत, पत्रकारिता, चित्रपट महोत्सव या विविध माध्यमांत उतरणयस सुरवात केली आहे. यामधून आंबाडेकरवाद मेनस्ट्रीम करण्याचा त्यांचा प्रयत्न असतो. वंचित घटकातून आलेल्या मुलांसाठी पा रंजित चेन्नईमध्ये एक लायब्रेरी देखील चालवतात. दलित साहित्य आणि सिनेमा यांच्यातील दरी भरून काढणाऱ्या  सहाय्यक दिग्दर्शकांसाठी ती आज एक हक्काची जागा आहे.

पा रंजित यांच्या या अभियानाचा फायदा घेऊन पुढे आलेलं एक नाव म्हणजे  रॅपर अरिवू .

जो रंजित यांनी चालू केलेल्या  ‘द कास्टेलेस कलेक्टिव्ह’ या बँडचे सदस्य आहे. रॅपर अरिवूची अजून एक ओळख म्हणजे त्याच्या एन्जॉय एन्जामी या गाण्याला यूट्यूबवर ४३१ मिलियन हिट्स आहेत. 

आणि या अरिवूच्याच शब्दात पा रणजित यांची फिलॉसॉफी सांगायची झाल्यास ती अशी  आहे  “मी कोणालाही लोकांना समान वागणूक देण्यास भाग पाडू शकत नाही, मी त्यांना फक्त ते असमान असल्याची जाणीव करून देऊ शकतो.”

हे ही वाच भिडू :

 

 

 

 

Leave A Reply

Your email address will not be published.