गृहमंत्र्यांचा पायजमा विसरला म्हणून विमानाला 3200 किलोमीटरचा प्रवास करायला लागला

सध्या काही महत्त्वाच्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची जय्यत तयारी सुरु आहेत. अश्यात माध्यमांमध्ये या निवडणुकीच्या बातम्या तर येतचं असतात, पण त्या सोबतचं अनेक नेते मंडळीचे, मंत्र्यांचे इंटरेस्टिंग किस्से सुद्धा तितकेच रंगलेले असतात.

असाच एक किस्सा आहे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री प्रकाशचंद्र सेठी यांचा. जो आजही राजकीय कॉरिडॉरमध्ये चर्चेत असतो. पण त्याआधी त्यांच्या राजकीय प्रवासावर थोडी नजर टाकू.

प्रकाश चंद्र सेठी यांच्या राजकीय प्रवासाची सुरूवात नगराध्यक्षपदापासून सुरू झालेली. पुढे ते आमदारही झाले. या दरम्यान राज्यसभा खासदार त्र्यंबक दामोदर पुस्तके यांचे निधन झाझाले होते त्यानंतर पोटनिवडणुकीत उमेदवाराचा शोध लागला. विंध्य प्रदेशचे खंबीर नेते अवधेश प्रताप सिंग यांचा तो काळ होता. कोणत्यातरी नेत्याला राज्यसभेवर पाठवावं लागणारं होतं. त्या काळात काँग्रेसचा एकचं रूल होता की काय एकाही नेत्याला दोनदा राज्यसभेवर पाठवायचं नाही.

त्यामुळे अवधेश प्रताप सिंह यांचे नाव कापले आणि सेठीजींचे नशीब चमकले. सेठी दिल्लीत काय गेले, ते नेहरू सरकारमध्ये उपमंत्रीही झाले. सेठी मोठ्या नेत्यांच्या जवळचे झाले, मग शास्त्री असो वा इंदिरा, प्रकाशचंद्र सेठी प्रत्येक पंतप्रधानांसाठी खास होते.

याचचं उदाहरण द्यायचं म्हणजे प्रकाशचंद्र सेठी यांना खुद्द इंदिरा गांधींनी मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीवर बसवलं होतं.

म्हणजे झालं काय मध्य प्रदेशमध्ये विधानसभा निवडणुका पार पडलेल्या निवडणुकीत कॉंग्रेस हा सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आलेला. त्यामुळे मुख्यमंत्रीपदी काँग्रेस नेत्याची वर्णी लागणार होती.

अनेक नेते मुख्यमंत्रिपदासाठी आपलं नावं जाहीर होण्याची वाट पाहत होते. पण, अचानक इंदिरा गांधींनी अशा व्यक्तींचं नाव घेतलेलं, जे एेकूण सगळ्यांच आश्चर्य वाटलं.

ते म्हणजे प्रकाशचंद्र सेठी. इंदिरा गांधींच्या तोंडून ही घोषणा ऐकून एकाही आमदाराने आनंद व्यक्त केला नाही की साध्या टाळ्या सुद्धा वाजवल्या नाहीत. पण, प्रकाश चंद्र सेठी मुख्यमंत्री झाले.

पुढे 1980 – 81 चा काळ असेल. आधीचं दोन वेळा मध्ये प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेले प्रकाश चंद्र सेठी आता देशाच्या गृहमंत्री पदाचा कारभार पहात होते. या दरम्यान गुलाम नबी आझाद यांच शमीम देव आझाद यांच्याशी लग्न होतं. या लग्न सोहळ्याला उपस्थित राहण्यासाठी देशभरातील दिग्गज नेते श्रीनगरला पोहोचले होते. या दिग्गज पाहूण्यांच्या यादीत प्रकाशचंद्र सेठी याचं सुद्धा नावं होत.

प्रकाशचंद्र गुलाम नबी यांच्या लग्नात सहभागी होण्यासाठी सरकारी विमानाने श्रीनगरला गेले होते. आपल्या टाईम टेबल नुसार रात्रीच लग्नाला उपस्थित राहून त्यांना भोपाळला परतायचे होते, पण नेमकी अशी परिस्थिती निर्माण झाली की, प्रकाशचंद्र यांना रात्रभर श्रीनगरमध्ये राहावे लागले.

आता प्रकाशचंद्र यांनी राहण्याचा निर्णय घेतला खरा पण मंत्री साहेबांना संध्याकाळी आठवलं की, रात्री घालायला पायजमाचं नाहीये आणि त्याच्याशिवाय त्यांना झोप काही येत नव्हती. त्यानंतर त्यांनी हा प्रकार त्यांच्या कर्मचाऱ्यांना सांगितला.

आता मंत्र्यांचा आदेश म्हंटल्यावर विचार करत बसायला कोणाला वेळ होता. त्यामुळं पायजमा घेण्यासाठी सरकारी विमानं 1600 किमी दूर भोपाळला पाठवलं. आता ज्याप्रमाणं माहिती मिळाली त्यानुसार विमानातून त्यांचा पायजमा रात्री 9.30 वाजता श्रीनगरला पोहोचला, त्यानंतर सेठीजींनी पायजमा घातला आणि ते झोपी गेले.

हवा करणाऱ्या सेठी यांची राजकीय भरारी सुरूचं होती, दरम्यान 1989 मध्ये लोकसभा निवडणुक होती. सेठी इंदूरच्या लोकसभा मतदारसंघातून रिंगणात उतरले होते, परंतु सुमित्रा महाजन यांच्याकडून निवडणुकीत त्यांचा पराभव झाला. त्यानंतर ते हळूहळू राजकारणापासून दूर झाले.

हे ही वाच भिडू :

 

Leave A Reply

Your email address will not be published.