सिनेमात डमी घेवून राज कपूरने राजकुमारचा बदला घेतला होता..

राज कपूर आणि राज कुमार. दोन्ही पण बाप माणसं. एक घराणेशाहीचा बाप आणि दूसरा ॲटिट्यूडचा बाप. कपूर खानदानाचा फिल्मसृष्टीवर दबदबा होता. त्यांची फिल्म नकारण्याचं धाडस तेव्हाही कोणी करत नव्हतं.

पण दूसरीकडे राज कुमार होता. पाकीस्तानच्या बॉम्बच्या मिसाईल खिश्यात घालून फिरणारा हा माणूस व्यक्तिगत आयुष्यात देखील तितकाच स्वॅग घेवून फिरायचा.. 

राज कुमारचे अनेक किस्से आहेत म्हणजे एकदा बच्चनचा सुट बघुन त्याने बच्चनला विचारलेलं की अशा सुटचं कापड कुठे मिळेल. बच्चनने पत्ता दिला आणि सांगितलं ते चांगल शिवतात. त्यावर राजकुमार म्हणाला, मला असाच रुमाल पाहीजे. एकदा तो बप्पी रहरीचं सोनं पाहून त्याला मंगळसुत्र कुठाय म्हणून विचारत होता तर एकदा आपल्या कुत्र्याला स्क्रिप्ट पसंत नाही म्हणून त्याने पिक्चर नाकारलेला. 

तर असा हा राज कुमार. दूसरीकडे राज कपूर मेरा नाम जोकरची तयारी करत होता. या सिनेमासाठी मनोज कुमार, धर्मेंद्र आणि राज कुमारने गेस्ट रोल करावा अशी त्याची इच्छा होती. 

त्यासाठी त्याने सर्वात पहिला फोन लावला तो मनोज कुमारला. मनोज कुमार तेव्हा सिनेमाच्या शुटमध्ये बिझी होता. त्याला फोन केल्यानंतर मनोज कुमारने रॉन्ग नंबर म्हणून फोन ठेवून दिला. राज कपूरने देखील हा विषय सोडून दिला.. 

पण झालं अस की काही दिवसातच जयकिशन यांच्या स्टुडिओत या दोघांची भेट झाली. या भेटीत राज कपूरने आपला फोन रॉन्ग नंबर म्हणून तू ठेवून दिलेली आठवण मनोज कुमारला सांगितली. मनोज कुमार म्हणाला, माझा खरच गैरसमज झाला होता. राज कपूरची माफी मागून तो सिनेमात गेस्ट रोल करायला तयार झाला.इकडे धर्मेंद्र देखील तयार होता.

अशीच विचारणा राज कपुरने राजकुमारला केली.

पण राजकुमार बाराचा. त्याला हा कमीपणा वाटला. बर माणसाने इतक्यावर थांबायचं कनाय. राजकुमारने फालतू पिक्चर, फालतू माणूस म्हणून राज कपूरला कमीपणा दाखवण्यास सुरवात केली. त्यातही गेस्ट रोल सारखा छोटासा रोल दिल्याबद्दल त्याची कानउघाडणी सुरू केली. राज कपूरने प्रतिउत्तर द्यायला सुरवात केल्यानंतर राजकुमारने तु माझ्याकडे रोल घेवून आलेलास मी तुझ्याकडं कामासाठी आलेलो नाही म्हणत परत पानउताराला सुरूच ठेवला. ही भांडण विकोपाला चालली… 

पण समोरचा माणूस पण काय साधा नव्हता न. तो राज “कपूर” होता.  आपल्या स्टाईलने याची जिरवायची हे ठरवून त्याने कामकाज सुरू केलं.. 

मेरा नाम जोकर सिनेमाच्या कहेता हे जोकर सारा जमाना आधी हकीकत आधा फसाना या गाण्याच्या चष्मा उतारो फिर देखो यारों दुनिया नई हैं, चेहरा पुराना… 

Screenshot 2021 02 11 at 12.51.59 PM
हा सीन पहा. या गाण्यात राजकुमारचा डमी वापरण्यात आला.

या लाईनमध्ये समोर हा चेहरा येतो. इथे राज कपुरने राजकुमारचा डमी वापरला होता. बरोबर एकाच वाक्याला हा चेहरा घेवून जागा दाखवून देण्याचं काम कपूरने केलेलं होतं. 

हे गाणं इथे पाहू शकता. 

https://youtu.be/DeRDKvfDenk

हे ही वाच भिडू,

1 Comment
  1. Dione says

    “सिनेमात डमी घेऊन राज कपूरने राजकुमारचा बदला घेतला” या लेखामध्ये व्याकरण चुका आहेत. कृपया दर्जा सांभाळावा.

Leave A Reply

Your email address will not be published.