वर्णद्वेषाचा लढा हा विषय ज्या ज्या वेळी निघतो तेव्हा रॉबर्ट मुगाबेचं नावं अगत्याने घेतलं जातं.

पाश्चात्य देशांमधला वर्णद्वेष हा काय आपल्यासाठी नवीन विषय नाही. मागीलवर्षी वर्णद्वेषाने जगभरात उसळलेली आंदोलने,दंगली हे आपण सोशल मिडीयावर #blacklivesmatter या hashtagच्या अंतर्गत बघतच होतो. जॉर्ज फ्लोइडच्या मृत्यूने समाजमन ढवळून निघालं. इतका पराकोटीचा वर्णद्वेष अमेरिकेसारख्या प्रगत समजल्या जाणार्या देशाने बाळगावा ह्या प्रकाराने अमेरिकेतील श्वेतवर्णीय लोकांवर टीकेची झोड उठली होती. सोशल माध्यमांनी हा मुद्दा चांगलाच उचलून धरला.

आज या केसचा निकाल लागला. जॉर्ज फ्लॉईडच्या हत्या प्रकरणात न्यायालयाने माजी पोलीस अधिकारी डेरेक शॉविन यांना 22 वर्ष 6 महिन्यांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. 

कृष्णवर्णीय लोकांवर अन्याय झाला अस खूप वेळा घडून गेलंय. महात्मा गांधी, नेल्सन मंडेला ह्यांसारख्या मोठ्या लोकांनादेखील वर्णद्वेषाला सामोरे जावं लागल आहे.

वर्णद्वेषाचा लढा हा विषय ज्या ज्या वेळी निघतो तेव्हा रॉबर्ट मुगाबे यांचं नावं अगत्याने घेतलं जातं.

झिम्बाब्वे सारख्या विकसनशील देशातून महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करून पदव्युत्तर शिक्षणासाठी अमेरिकेत ते गेल्यावर त्यांना कृष्णवर्णीय असल्याने त्यांच्यावर होणारा अन्याय लक्षात आला. अमेरिकेत वर्णद्वेषाविरोधात त्यांनी आंदोलन उभारले. आंदोलनाची वाढती गर्दी आणि कृष्णवर्णीयांची एकजूट बघून अमेरिकन प्रशासनाने त्यांना दहा वर्षाच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. हे प्रकरण त्यांच्या कारकिर्दीला वळण देणारं ठरलं.

कारावास भोगत असताना त्यांच्या चार वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आणि त्याच्या अंत्यसंस्काराला जाण्याची परवानगी ब्रिटीश सरकारने न दिल्यामुळे त्यांचा रोष श्वेतवर्णीय लोकांवर अधिकच वाढला.

तुरुंगवासातून सुटका होऊन ते मायदेशी परतले आणि त्यांची लोकप्रियता त्यांना राजकारणात खेचून आणणारी ठरली. पुढे त्यांना झिम्बाब्वेच्या राजकारणातला सगळ्यात शक्तिशाली आणि तडफदार नेता समजलं जाऊ लागलं. झिम्बाब्वेची स्थापना ते २०१७पर्यंत ते तिथले पंतप्रधान होते. अशी कारकीर्द असणारे ते एकमेव नेते आहेत. वर्णद्वेषाचा प्रभाव त्यांच्या कारकीर्दीच आकर्षण ठरलं.

त्यांच्या भाषणाची खासियत म्हणजे त्यांना लोकांची नाडी अचूक ओळखता यायची,विरोधकांवर व्यंग करून त्यांची भाषणे जनमानसात लोकप्रिय होती. त्यांची भाषणे ही अत्यंद वादग्रस्त आणि लोकांमध्ये द्वेष निर्माण करणारी आहेत असा ठपका विरोधकांनी त्यांच्यावर ठेवला.

शेतीसंदर्भात असलेला वर्णद्वेष लक्षात घेता त्यांनी महत्वाचे नियम केले. झिम्बाब्वेतील शेतीवर सगळ्यात आधी इथल्या स्थानिक लोकांचा अधिकार आहे. श्वेतवर्णीय हे आमच्या देशाचे नागरिक नसून त्यांनी इथे आपली दादागिरी चालवू नये. आफ्रिका ही आफ्रिकन लोकांची आहे, झिम्बाब्वे ही झिम्बाब्वेच्या लोकांची आहे, श्वेतवर्णीय इथे द्वितीय नागरिक म्हणून राहतील. गोऱ्या शेतकर्यांना मारहाण करणाऱ्या लोकांवर कारवाई करू नये.

जागतिक स्तरांवर त्यांच्या वर्णद्वेषाच्या लढ्याचा जयजयकार झाला. त्यांची अनेक विधाने गाजली आणि बऱ्याच लोकांना ती पटलीसुद्धा. त्यातील काही महत्वाची आपण जाणून घेऊ.

* वर्णद्वेष हा तोपर्यंत संपणार नाही जोपर्यंत पांढर्या गाड्यांची चाके ही काळ्या रंगाची आहेत.

* जर लोक अजूनही निषेधासाठी काळा आणि शांततेसाठी पांढरा रंग वापरत असतील तर वर्णद्वेष तसाच टिकून राहील,तो कधीच संपणार नाही.

* लोक अद्यापही विवाहसोहळ्यात पांढरे कपडे आणि अंत्यसंस्कारात काळे कपडे परिधान करत असेल तर वर्णद्वेष सहजपणे संपणार नाही.

* आजही आपण जर प्रथम पांढरे कपडे धुवत असू आणि नंतर इतर रंगाचे तर वर्णद्वेष संपेल ह्याची फक्त आपण स्वप्न पाहू शकतो.

त्यांच सगळ्यात जास्त गाजलेलं विधान वर्णद्वेषी लोकांसाठी रोकठोक प्रत्युत्तर आहे ते म्हणजे :

* मला फरक पडत नाही तुम्ही कितीही कृष्णवर्णीय लोकांवर अन्याय करता, पण जोपर्यंत माझी टॉयलेट सीट पांढरी आहे आणि तिथले टिशू हे पांढऱ्या रंगाचे आहेत, तोपर्यंत मला काळजी नाही, मी ठीक आहे.
* माझ्या विनोदानी जर तुमच्या भावना दुखावल्या असतील तर सॉरी :
नवीन विनोद सुचताच पुन्हा भावना दुखवायला सज्ज होईनच.

पंतप्रधान पदावरून पायउतार होताना त्यांनी भाषणात सांगितल की,

“ माझा राजीनामा देण्याचा निर्णय माझ्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे. झिम्बाब्वेच्या जनतेच्या हितासाठी असलेली राष्ट्रीय सुरक्षा ,शांतता आणि स्थैर्य ह्याविषयी मला चिंता आहे पण शांततापूर्ण आणि अहिंसक शक्तीचे स्थान सुनिश्चित करण्याची माझी इच्छा निर्माण झाली आहे.

मुगाबे जितके लोकप्रिय ठरले तितकेच वादग्रस्त सुद्धा ठरले पण वर्णद्वेषाचा लढा त्यांच्याशिवाय अपूर्ण आहे. कडवट आणि बेधडक मुगाबे जागतिक स्तरावर महत्वाचे आहेत हे वेळोवेळी पटत राह्त.

हे हि वाच भिडू.

Leave A Reply

Your email address will not be published.