चंद्राच्या उत्तर ध्रुवावर पहिला देश ठरण्याच्या भारताच्या प्रयत्नांना रशियाने आव्हान दिलं आहे.

तुम्ही लहान असताना अनेक वेळा तुमच्या आजीने, आईने चंद्रावरचं गाणं गायलं असेल, किंवा मग अनेक कवींनी चंद्र थेट आपल्या कवितेत उतरवला असेल, एवढचं काय तर तुमच्या मित्राने त्याच्या प्रियसीला थेट चंद्राचीचं उपमा दिली असेल नाही तर चंद्रच आणून देतो अशी काही वचनं दिली असतील. पण, चंद्र कधी एवढा जवळून पाहिला नसेल. शनिवारी चांद्रयान 3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना चंद्राचे फोटो काढले आहेत. चंद्राचान-३ च्या माध्यमातून लॅन्डीगं नंतर चंद्राचा पहिला फोटो इस्रोने शेअर केलाय. चांद्रयान 3 मोहिमेतील अत्यंत महत्वाचा टप्पा पार पडला आहे. यावेळी चंद्राची पहिली झलक पहायला मिळाली आहे. या चांद्रयानाने शनिवारी संध्याकाळी पृथ्वीच्या कक्षेतून बाहेर पडून चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलाय. चंद्राच्या कक्षेत जाताच चांद्रयानाने इस्रोला महत्त्वाचा मॅसेज दिला आहे. त्यामुळे संपूर्ण भारतात आनंदोत्सव केला जात आहे. चंद्रयान-३ कुठ पर्यंत पोहचलं आहे? आणि त्याचा पुढचा प्रवास कसा असणार आहे? हेच जाणून घेऊया

चंद्रयान ३ हे १४ जुलैला २ वाजून ३५ मिनटांनी लाँन्च करण्यात आलं. त्यानंतर २ वाजून ४६ मिनिटं ३९ सेकंदाने बूस्टर आणि पेलोड रॉकेटपासून वेगळे करण्यात आलं. ३ हजार ६०० किमीच्या प्रतितास वेगाने ते चंद्राच्या दिशेने निघालं. एक एक एक कक्षा पार करत असताना, त्याचा वेगही वाढलेला होता. १५ आणि १६ जुलैला चंद्रयान ३ ने पहिली कक्षा पूर्ण केली. दुसऱ्या कक्षेत चंद्रयानं १८ ते ३१ जुलै दरम्यान पोहचलं.

३१ जुलै ते १ ऑगस्ट दरम्यान चंद्रयानाने मध्यरात्री पृथ्वीची कक्षा सोडली आणि चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला. कोणत्याही अडथळ्यांशिवाय, कोणत्याही अडचणीशिवाय चांद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहोचलं. चंद्राच्या कक्षेत पोहोचल्यानंतर यानाने एक महत्त्वाचा मॅसेज पाठवला आहे. मला चंद्राचं गुरुत्वाकर्षण जाणवत आहे, असा मॅसेज यानाकडून इस्रोला देण्यात आला. त्याअगोदर चंद्रयान चंद्राच्या कक्षेत पोहचण्याचा २३६ की.मी वर असताना २५ मिनटं चंद्रायानाचं इंजिन सुरू करण्यात आलं होतं. यामुळे यानाला अधिक वेग मिळाला आणि त्याने चंद्राच्या कक्षा पार करायला सुरवात केली.

रोबोट सारखे असणारे यंत्र लँडर आणि रोव्हर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणार आणि तेथे 14 दिवस प्रयोग करणार आहेत. त्यात भुकंप आणि चंद्रावरील मातीचा आभ्यास करणार आहेत.आता चंद्र यानाने चंद्राचे फोटो पाठवले आहेत आणि आता यानाचा पुढचा प्रवास सुरू होणार आहे.

आता यानाचा पुढचा प्रवास कसा असणार आहे आणि हे यान कधी आपलं टार्गेट पुर्ण करणार आहे, हे जाणून घेऊ…

आता ५ ऑगस्टपासून ते २३ ऑगस्टपर्यंत चंद्रयान 3 चा स्पीड सातत्त्याने कमी होणार आहे. रविवारी रात्री ११ वाजता चांद्रयान 3 ने परिघ कमी केला आहे. रविवारी ही प्रक्रिया सुरू केल्यानंतर १७ ऑगस्टपर्यंत आणखी तीन ऑपरेशन होतील. त्यानंतर रोवर प्रज्ञानसह लँडिंग मॉड्यूल विक्रम यानाच्या प्रोपल्शन मॉड्यूलपासून वेगळा होईल. त्यांतर लँडर डी-आर्बिटिंगची प्रक्रिया सुरू होणार असल्याचं इस्रोने म्हटलं आहे. २३ ऑगस्टला ५ वाजून ४७ मिनटांनी चंद्रयानाची लॅंडींग दक्षिण ध्रुवावर केली जाईल.

जर सॉफ्ट लँडिंग अर्थात मिशन यशस्वी झाले तर अमेरिका, रशिया आणि चीननंतर भारत असे करणारा चौथा देश ठरेल. अमेरिका आणि रशिया या दोन्ही देशांनी चंद्रावर यशस्वीरीत्या उतरण्यापूर्वी अनेक अंतराळयान क्रॅश झाले होते. २०१३ मध्ये चांग ई- 5 मिशनच्या पहिल्याच प्रयत्नात यशस्वी झालेला चीन हा एकमेव देश आहे.

मिशन फक्त दक्षिण ध्रुवावरच पाठवण्याचं कारण म्हणजे या भागात सुर्याचा प्रकाश कधीच पोहचत नाही. त्या भागात मायनस २०० अंश सेल्सिअस एवढं तापमान राहतं. त्यामुळे शास्त्रज्ञांचा अंदाज आहे की त्या भागात पाणी हे बर्फाच्या स्वरूपात असु शकतं. आणि यामुळे या ठिकाणी ही लॅंडीग करण्यात येणार आहे.

आता प्रश्न उरतो तर या मिशन मधुन भारताला काय फायदा होऊ शकतो.

या मिशनद्वारे भारत जगाला सांगू शकतो की चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करण्याची आणि तेथे रोव्हर चालवण्याची क्षमता भारतात आहे. यामुळे भारतावरील जगाचा विश्वास वाढेल ज्यामुळे व्यवसाय वाढण्यास मदत होईल. भारताने आपल्या हेवी लिफ्ट लॉन्च व्हेईकल LVM3-M4 वरून चांद्रयान प्रक्षेपित केलं आहे. भारताने यातून आपली क्षमताही जगाला दाखवून दिली आहे.

असं जरी असलं तरी आता चंद्राच्या उत्तर ध्रुवावर पहिला देश ठरण्याच्या भारताच्या प्रयत्नांना रशियाने आव्हान दिलं आहे.

भारताच्या चांद्रयान 3 नंतर आता रशियाही चंद्रावर उतरण्याच्या तयारीत आहे. रशियाच्या एका अधिकाऱ्याने सोमवारी सांगितले की, रशिया ११ ऑगस्ट रोजी चंद्रावर मिशन लुना-25 लाँच करू शकतं. रशियाने यापूर्वी १९७६ मध्ये मिशन लुना-24 चंद्रावर उतरवलं होतं. भारताने १४ जुलै रोजी चांद्रयान-3 लाँच केले आहे. ते 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरेल. त्याच वेळी रशियाचे लुना-25 या आधी चंद्रावर उतरू शकतं. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर हे यान उतरवण्याचा रशियाचा प्लॅन आहे. रशियाच्या एजन्सीने सांगितलं की लुना-25 पाच दिवसांत चंद्रावर पोहोचेल. यानंतर, ते ५-७ दिवस चंद्राच्या कक्षेत राहील. यानंतर ते चंद्रावर उतरेल. म्हणजेच चंद्रावर उतरण्याची वेळ जवळपास सारखीच असेल किंवा आपले चांद्रयान-3 चंद्रावर उतरेल, त्याच्या काही तास हे आधी उतरेल. यामुळे भारताला एक प्रकारे रशियाने आव्हानच दिलं आहे.

५ ऑगस्ट रोजी संध्याकाळी ७ वाजून १५ मिनिटांनी चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केलाय. लूनार ऑर्बिट इंजेक्शनच्या माध्यमातून चांद्रयान 3 चंद्राच्या कक्षेत आणण्याची प्रोसेस  यशस्वीरीत्या पार पाडली आहे. चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करताना चंद्राचे फोटो काढले आहेत. फोटो आणि 45 सेकंदचा व्हिडिओ इस्रोने ट्विटर हँडलवर शेअर केला आहे. आता सर्वांनाचं उत्सूकता लागली आहे, ते चंद्रयान-३ मोहीम यशस्वी होण्याची. येत्या २३ ऑगस्ट रोजी ही उत्सुकता नक्कीच संपणार आहे.

हे ही वाच भिडू,

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.