एका टॅक्सीवाल्याचा फोन आला आणि अँटिलीयाच्या बाहेरच वातावरण टाईट झाल.

अंबानीचं नाव सतत चर्चेत असतं. आणि ते नाव चर्चेत यायला तस ही काही कारण लागत नाही बघा. या नावभोवती कसं एक वलय आहे.

मध्यंतरी अंबानीच्या घराबाहेर सोफ्टक सापडली आणि त्या वाझेचा बेक्कार बाजार उठला होता. त्यामुळं पोलीस यंत्रणा अंबानीचं नाव आलं की कशा सावधान होतात. आता येणाऱ्या दिवसात ही कोणाचा तरी बाजार उठण्याची चिन्ह आहेत.


कारण ही तसंच आहे.

आज मुंबई पोलिसांच्या चौकीत एक फोन खाणाणला…एका टॅक्सीवाल्याचा फोन होता तो. त्या फोनमुळ अँटिलीयाच्या बाहेरच वातावरण एकदम टाईट झालय.

सविस्तर वृत्तानुसार, मुंबई पोलिसांच्या कंट्रोल रूममध्ये ८ नोव्हेंबर रोजी एका टॅक्सी चालकान फोन केला. त्यानं एक सोफ्टक अशी बातमी पोलिसांना दिली.

त्याला पोलिसांनी लागलीच आझाद मैदान पोलीस चौकीवर बोलवून घेतलं. तिथं गेल्यावर पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवून घेतला.

त्या जबाबात त्यानं सांगितलं की,

त्याच्या टॅक्सीमध्ये दोन पर्यटक बसले होते. गाडीत गप्पा हाणता हाणता त्यांनी त्या टॅक्सीवाल्याला उद्योजक मुकेश अंबानींच्या घराचा पत्ता विचारला. अंबानीचं नाव घेतल्यावर टॅक्सीवाला बावचळला. त्यानं जरा लक्षपूर्वक या दोघांकडे पाहिलं. तर एक भली मोठी बॅग त्यांच्याकडे होती.

टॅक्सीवाल्याच्या डोक्यात जुना घटनाक्रम फिरला. त्याला आठवलं

याच वर्षी २५ फेब्रुवारी रोजी एक बेवारस स्कॉर्पिओ गाडी अँटिलियाबाहेर आढळून आली होती. ज्यामुळ चांगलीच खळबळ उडाली होती. त्यानंतर पोलिसांना तपासामध्ये या गाडीत जिलेटीनच्या कांड्या आणि धमकी देणारं एक पत्र मिळालं होतं. या गाडीत आढळलेल्या नकली नंबर प्लेट्सपैकी एक नंबर प्लेट अंबानींच्या मालकीच्या गाडीची होती. नंतर ही गाडी ठाण्यातील मनसुख हिरेन या व्यक्तीची असल्याचं समजलं. मात्र ही व्यक्ती ५ मार्च रोजी ठाण्यातील खाडीमध्ये मृतावस्थेत आढळून आली होती.

म्हणून टॅक्सीवाल्याने या दोघांच्या हालचाली टिपल्या. तर या दोन व्यक्ती संशयास्पदरित्या फिरत असल्याच त्याला आढळलं. मग अजिबात वेळ न दवडता त्याने पोलिसांना इन्फॉर्म केलं. यावर पोलिसांनी अंटालिया बाहेरची सिक्युरिटी टाईट केलीय.

या घटनेवर पोलीस म्हणतायत, 

टॅक्सीवाल्याने ही माहिती दिल्यानंतर या प्रकरणामध्ये आम्ही माहिती पडताळून पाहत आहोत. सुरक्षेच्या कारणास्तव आम्ही मोठ्या प्रमाणात अनेक ठिकाणी बॅरीकेड्स लावले आहेत. आम्ही या ठिकाणी कसून तपास करत आहोत. आता बघूया काय होतंय ते.

आता चुकून जर समजा हे संशयित खरंच जर पर्यटक असतील आणि पेपरात, मॅगझीन मध्ये जर अंबानीच्या घराचं वर्णन वाचलं असेल, आणि ते बघायची त्यांना इच्छाच झाली असेल आणि म्हणून त्यांनी त्या टॅक्सीवाल्याला माहिती विचारली असेल तर मग मात्र अवघडाय राव…

त्या टॅक्सीवाल्याच…

हे ही वाच भिडू

Leave A Reply

Your email address will not be published.